Home » हिंदू धर्मात अतिथी देवो भव: का म्हटले जाते?

हिंदू धर्मात अतिथी देवो भव: का म्हटले जाते?

by Team Gajawaja
0 comment
Atithi Devo Bhava
Share

तुम्हाला अतिथी देवो भव: चा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? खरंतर याचा अर्थ सर्वांनाच माहिती असतो. तर आपल्याकडे आलेले पाहुणे हे देवासमान असतात असे आपल्याला लहानपणापासूनच शिकवले-सांगितले जाते. त्याचसोबत भारतात पर्यटनाला चालना मिळण्यासाठी ही अतिथी देवो भव: म्हटले जाते. हे वाक्य केवळ एक स्लोगन किंवा पर्यटनाला चालना देणारी गोष्ट नाही. तर याचा संबंध हिंदू धर्मात फार जुन्या काळाशी आहे.(Atithi Devo Bhava)

अतिथी हा शब्द अशा कारणास्तव आला की, पाहुण्यांची येण्याची वेळ ना तारीख ही निश्चित नसते. त्याचसोबत त्यांच्या जाण्याची वेळ आणि तारीख ही नसते. या वाक्याचा असा अर्थ काढला जाऊ शकतो की, घरात आलेल्या पाहुण्यांची सेवा आणि आदर केला पाहिजे. आपल्या घरात आलेल्या पाहुण्यांची काळजी ही घेतली पाहिजे.

उपनिषदांमध्ये ही अतिथी देवो भवाचे वर्णन
तैत्तिरीयोपनिषद शिक्षावल्ली उपनिशिदाच्या ११ व्या खंडात अतिथी देवो भव: चे वर्णन करण्यात आले आहे. यामध्ये मातृ देवो भव:, पितृ देवो भव: असे ही म्हटले आहे. म्हणजेच धर्मानुसार माता, पिता, शिक्षक आणि अतिथी हे सर्वजण देवासमान आहेत. त्यांचा आदर केला पाहिजे.

अतिथी देवो भव: संदर्भातील पौराणिक कथा
अतिथी देवो भव: संबंधित काही पौराणिक कथा प्रचलित आहेत. परंतु सर्वाधिक प्रचलित आहे ती, कृष्ण आणि सुदामाची. सुदाम दरिद्र अवस्थेत श्रीकृष्ण द्वारका नगरी पोहचले होते आणि त्यांच्या महलाजवळ आले. त्यावेळी श्रीकृष्ण अनवाणी पायांनी धावत सुदामाकडे गेले आणि त्यांना बसण्यासाठी आसन देत त्यांचा सत्कार केला. सुदामाची सेवा करत श्रीकृष्णाने त्यांनी काही न मागताच सर्वकाही दिले. रातोरात सुदामाची झोपडी ही एका महलाप्रमाणे झाली. त्यांचे आयुष्य बदलले.

असेच रामायणात ही शबरीला अतिथीच्या सत्काराच्या भावनेने प्रेरित केले. ज्यांनी आपल्या घरी आलेल्या अतिथीला आंबड बोर खायला दिली नाहीत आणि सर्वांनी सर्व बोर ही काढून श्री रामांना दिली. श्री रामांनी शबरीची उष्ठी बोर खात तिचा मान राखला आणि आपल्या धर्माचे पालन केले.(Atithi Devo Bhava)

हे देखील वाचा- राम-जानकी यांची मुर्ती साडे ६ कोटी वर्षापूर्वीच्या खडकापासून का बनवण्यात येणार?

अशा प्रकारच्या काही कथा आपल्याला ग्रंथांमध्ये मिळतात. त्यामुळेच अतिथीचा सन्मान करणे फार गरजेचे आहे. भारतात घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार हा वेळोवेळी उत्तम केला जातो. कधीच त्यांचा अनादर केला जात नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.