Home » सामान्य लोकांच्या तुलनेत एथलीट्सचे हार्ट रेट कमी का असतात?

सामान्य लोकांच्या तुलनेत एथलीट्सचे हार्ट रेट कमी का असतात?

by Team Gajawaja
0 comment
Athletes Heart Rate
Share

तुम्ही काही वेळेस ऐकले असेल की, एथलीटसचे हार्ट रेट सामान्य लोकांच्या तुलनेत कमी असतात. सामान्यकरुन हार्ट रेट ६० ते ८० बीपीएम दरम्यान असतात. मात्र काही स्पोर्ट्स पर्सन किंवा एथलीटचे हार्टरेट ३०-४० बीपीएम पर्यंत पोहचतात. असे मानले जाते की, एथलीट्सचे कमी हार्ट रेट असणे म्हणजे त्यांची सामान्य हेल्थ असल्याचे दर्शवतात. जो पर्यंत एथलीटला चक्कर किंवा थकवा वाटत नाही तो पर्यंत ते हेल्थी असल्याचे मानले जातात. यामुळे त्यांच्या शरिराला कोणतेच नुकसान होत नाही. अशातच आता प्रश्न उपस्थितीत राहतो की, अखेर एथलीटचे हार्ट रेट्स सामान्यांपेक्षा कमी का असतात आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात त्याबद्दल अधिक.(Athletes Heart Rate)

सामान्यांच्या तुलनेत एथलीटचे हार्ट रेट कमी असणे सामान्य मानले जातात. एका हेल्थी यंग एथलीटचे हार्ट रेट ३० ते ४० बीपीएस असू शकतात. हेल्थलाइननुसार असे अशा कारणास्तव असते की, व्यायाम करुन करुन शरिरातील रक्तवाहिन्या या अधिक घट्ट होतात. त्यामुळेच हृदय अधिक प्रमाणात ब्लड पंप करु शकते. हृदय मजबूत असेल तर हार्ट रक्तवाहिन्यांना अधिक ऑक्सिजन देऊ शकतो. दरम्यान, व्यायामादरम्यान एका एथलीटचे हार्ट बीट १८० ते २०० बीपीएम पर्यंत पोहचू शकतात.

Athletes Heart Rate
Athletes Heart Rate

फिटनेसचा स्तर
सामान्य लोकांच्या तुलनेत एथलीट अधिक व्यायाम करतात. व्यायाम करण्यास्तव त्यांचे हृदय अधिक तंदुरुस्त होते. म्हणजेच एथलीटचे हार्ट प्रति मिनीट सामान्य लोकांच्या तुलनेत कमी वेळा धडधड करते.

औषधांचा परिणाम
काही एथलीट फिट आणि शरिर मेंटेन करण्यासाठी काही औषधांची मदत घेतात. अधिक औषध घेतल्याच्या कारणास्तव त्यांच्या हार्ट रेटवर ही परिणाम होतो. औषधांमुळे हार्ट रेट कमी किंवा अधिक होऊ शकतो. खासकरुन बीटा ब्लॉकर्स मेडिसिन हार्टची गती धिमी करु शकते.

हे देखील वाचा- Cryptocurrency मध्ये गुंतवणूक करत असाल तर व्हा सावध, अॅपच्या माध्यमातून अशा पद्धतीने होतेय नागरिकांची फसवणूक

वयाचा प्रभाव
एथलीट हे तरुण वयातच फिट राहण्यासाठी फार मेहनत करतात. ज्यामुळे त्यांची उर्जा आणि स्टामिना अन्य लोकांपेक्षा अधिक मजबूत असतो. एक नॉन-एथलीट पर्सन फिजिकल अॅक्टिव्हिटी करत नसल्याने वयाच्या आधीच ते कमकुवत होतात. ज्यामुळे त्यांचे हार्ट रेट हे कमकुवत होऊ शकते.(Athletes Heart Rate)

किती असतो आइडियल हार्ट रेट
प्रत्येकाचा हार्ट रेट हा वेगवेगळा असतो. ९० ते १२६ बीपीएम सामान्य हार्ट रेटच्या कॅटेगरीत येतो. तर काही एथलीट्सचा हार्ट रेट कमी असतो जो ३०-४० बीपीएम पर्यंत जाऊ शकतो. मात्र व्यायामादरम्यान १८० ते २०० दरम्यान ही पोहचू शकतो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.