सध्या सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर हे लोकप्रियतेच्या बाबतीत कोणत्याही बड्या सेलिब्रिटीला देखील टक्कर देऊ शकतात. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची कमालीची लोकप्रियता आहे. मराठी इन्फ्लुएन्सर सुद्धा यात मागे नाही. अनेक मराठी इन्फ्लुएन्सर सोशल मीडियावर कमालीचे गाजतात, त्यांना फॉलो करणारी मंडळी देखील लाखोंच्या घरात आहे. सध्या एक मराठी इन्फ्लुएन्सर कमालीचा गाजत आहे. मराठी सोशल मीडिया स्टार इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे माहित नाही असे लोकं शोधूनही सापडणार नाही. आपल्या कॉमेडी रिल्समधून अथर्व लोकांना भेटत असतो. त्याचे रिल्स देखील कायम व्हायरल होत असतात. सध्या हाच अथर्व एका वादात अडकला असून त्याच्यावर चहुबाजूनी टीका होत आहे. नक्की काय प्रकरण आहे, जाणून घेऊया. गणेशोत्सवानिमित्त अथर्वने एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमधून त्यानं हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला. मात्र, या व्हिडिओवरून बराच गोंधळ निर्माण झाला असून त्याला हा व्हिडिओ डिलीट करावा लागला आहे. (Todays Marathi Headline)
डिलिट व्हिडिओमध्ये काय होते?
गणेशोत्सवानिमित्त बनवलेल्या रीलमध्ये अथर्व गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करण्यासाठी एका मूर्तीकाराकडे जातो. कारखान्यातील अनेक मूर्त्यांपैकी त्याला एक मूर्ती आवडते आणि तो ती घेण्यासाठी निवडतो. तेव्हा मूर्तीकाराचा मुलगा ‘अब्बू’ हाक मारत तेथे येतो आणि ‘अम्मी ने आप के लिये खाना भेजा है’, असे सांगतो. आता अथर्व आपल्याकडून मूर्ती खरेदी करणार नाही असा मूर्तीकाराचा समज होतो. त्यामुळे, मूर्तीकार पुढेपण मूर्तीचे दुकान आहे, तुम्ही तिथूनही मूर्ती घेऊ शकतात असे म्हणतो. यावर अथर्व त्याला म्हणतो पण, मला येथून मूर्ती घेण्यास काहीच अडचण नाही. इथून मूर्ती घेतली तर चालेल तुम्हाला? असे मूर्तिकार पुन्हा त्याला विचारतो. त्यावर, तुमच्या कडूनच मूर्ती घ्यायची आहे असे म्हणत तो म्हणतो, “माझे वडील सांगतात की, आपण साखर व्हावे जी शेवयांची खीरही गोड बनवते आणि शीरखुर्माही. आपण वीट व्हावे जी मंदिरसुद्धा उभारते आणि मशिदसुद्धा”, आपण फुलं व्हावी जे हारातही वापरले जातात आणि चादर अर्पण करण्यासाठी वापरले जातात. असे म्हणताना अथर्व दिसतो. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने हिंदू-मुस्लीम ऐक्याचा, धर्मिक द्वेष न करण्याचा संदेश दिला आहे. (Latest Marathi News)
अथर्व सुदामेच माफीनामा
अथर्व सुदामेनंसोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत माफी मागितली. व्हिडिओमध्ये अथर्व माफी मागत म्हणतोय की, ‘काल मी एक माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ टाकली होती, ती मी डिलीट केलीये. बरेच लोक नाराज झाले, त्यांना ती व्हिडिओ आवडली नाही. तर, माझा अजिबात असा उद्देश नव्हता की, कोणाला दुखवायचं, कोणाच्या भावना दुखवायच्या. मी आतापर्यंत खूप व्हिडिओ असे केले आहेत जे आपल्या हिंदू सणांवर आहेत, मराठी संस्कृतीवर आहेत मराठी भाषेवर आहेत.’ (Top Trending News)
==============
हे देखील वाचा : Chennai : या मंदिरात आहे, भगवान श्रीकृष्णाचे पार्थसारथी रुप !`
============
‘मला असं वाटत नाही की, माझ्याएवढं कोणत्याही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने आपल्या या सणांवर, संस्कृतीवर व्हिडिओ केले आहेत. त्यामुळे माझ्या मनात अजिबातच असा कोणता उद्देश नव्हता की, कोणाला दुखवावं किंवा काय. पण तरीही, जर तुम्ही दुखावला असाल तर माफी मागतो.’ असं अथर्वने पुढे म्हटलं आहे. मात्र अथर्वच्या या व्हिडिओनंतर त्याच्यावर सर्वच टीका करत त्याला ट्रोल करत आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics