हल्ली सर्वच गोष्टींमध्ये महागाई एवढी वाढली आहे की तुम्ही कितीही पैसे कमवले तरीही ते पुरवता पुरवता नाकी नऊ येतात. तुम्हीही परिस्थितीतून जात असाल ना? अशा वेळी आपल्या गरजा पुरवण्यासाठी बऱ्याचदा कर्ज काढले जाते आणि उरलेले आयुष्य ते घेतलेले कर्ज फेडण्यात जाते. कोणत्याही व्यक्तीला कर्ज, उधारी या गोष्टींमध्ये पडायचे नसते पण अनेकदा समोर पर्याय नसतो तेव्हा याच पर्यायाची निवड केली जाते. मात्र अनेकदा कर्जाचे ओझे वाढतच जाते किती ही आणि कही केल तरी आयुष्यात आलेल्या पैशाच्या अडचणी कमी व्हायच नाव घेत नाही. इच्छा असूनही व्यक्ती कर्जबाजारी होतो. लाख प्रयत्न करूनही कर्जमुक्ती होत नसेल तर काही वेळा टोकाचे पाऊल ही उचलले जाते. मात्र हा काही उपाय नाही. तुम्ही सुद्धा या समस्येतून जात असाल तर ज्योतिषशास्त्रात यावर काही उपाय सांगितले गेलेले आहेत त्याचा उपयोग नक्की करा.(Astrology Tips)

कर्ज मुक्तीसाठी ज्योतिष उपाय:
– शिवलिंगावर रोज लाल रंगाची फुले अर्पण केल्याने ही कर्जमुक्ती होते. यासाठी सकाळी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर लाल रंगाची फुले अर्पण करावीत आणि जल अर्पण ही करावे. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि कर्जाशी संबंधित समस्येपासून मुक्त होण्यास मदत होते.
– जमीन- मालमत्तेशी संबंधित कोणावर कर्ज असेल तर हनुमानाची पूजा केली तर त्याचा परिणाम लवकर दिसून येतात. मंगळवार आणि शनिवार हे दिवस हनुमानजींच्या पूजेसाठी विशेष आहेत. या दोन दिवशी हनुमानजींना पिवळे सिंदूर लावून हनुमान चालीसा म्हणावी. यामुळे तुमचे कर्ज लवकर कमी होण्यास मदत होईल.

– कर्ज मुक्ती मिळवण्यासाठी धनाची देवी लक्ष्मी ची पूजा करेला विसरु नका. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी देवी पुढे दिवा लावून ‘ॐ श्रीं ह्रीं कमाले कमलाये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः’ या मंत्राचा जप करावा.आणि लक्ष्मी ची आरती करावी. यामुळे धनाची देवी लक्ष्मी तुम्हाला कर्जातून मुक्त करण्यासाठी नक्की मदत करेल.(Astrology Tips)
– कर्ज मुक्तीसाठी रात्री एका भांड्यात बार्ली म्हणजेच जव भरून तुमच्या डोक्याजवळ ठेवून झोपा आणि दुसऱ्या दुसऱ्या दिवशी आंघोळ केल्यानंतर गरिबांमध्ये ते वाटून घ्या. त्यामुळे कर्ज तर कमी होईलच, शिवाय तुमची आर्थिक परिस्थितीही सुधरण्यास मदत होईल.
(हे देखील वाचा: पायात किंवा हातात काळा धागा का बांधतात? जाणून घ्या काय असतात धागा बांधण्याचे नियम)
– अस म्हणतात की माशांना पीठाचे गोळे तसेच पक्षांना दाणे दिल्यानेही कर्ज मुक्ती होण्यास मदत होते.
– प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या बुधवारी ऋणहर्ता गणेश स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने कर्जमुक्ती लवकर होते.
लक्षात घ्या कोणतीही गोष्ट तुमच्या मेहनतीशिवाय आणि प्रयत्नांशिवाय कधीही पूर्ण होत नाही त्यामुळे तुम्ही ते करायच आहे. त्याच्या जोडीला वरील उपाय केवळ करणे तुम्हाला समस्येपासून दूर करण्यास मदत करतील.
(डिस्क्लेमर: वरील माहिती पूर्णपणे खरी असल्याचा आम्ही कोणताही दावा करत नाही. हा लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे.)