Home » Astrology : १ जानेवारीला ‘हे’ सोपे उपाय करून करा देवी लक्ष्मीचे स्वागत

Astrology : १ जानेवारीला ‘हे’ सोपे उपाय करून करा देवी लक्ष्मीचे स्वागत

by Jyotsna Kulkarni
0 comment
Astrology
Share

अवघ्या काही तासात २०२५ हे वर्ष संपूर्ण २०२६ या नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. २०२५ सालातील सर्वच चांगल्या वाईट आठवणी सोबत घेऊन आपण २०२६ या वर्षात प्रवेश करणार आहोत. २०२६ हे वर्ष आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मित्रपरिवारासाठी अतिशय उत्तम, सकारात्मक आणि यशस्वी असावे अशीच प्रत्येक जणं मनोमन प्रार्थना करत आहे. या नवीन वर्षात आपली सर्व स्वप्न, सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या अशी आशा बाळगून सर्वच २०२६ सालाचे स्वागत करण्यास सज्ज झाले आहे. हे वर्ष सगळ्यांनाच उत्तम जावे आणि प्रत्येकासाठी शुभ ठरावे यासाठी वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. (Astrology)

* वास्तुशास्त्रानुसार, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी ईशान्य दिशेला दिवा लावावा. ईशान्य ही दिशा सुख, समृद्धी, ज्ञान आणि सकारात्मकतेची मानली जाते. महादेव हे या दिशेचे अधिपती आहेत. या दिशेला दिवा लावल्याने सर्व दोष दूर होतील आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी येईल. ईशान्य कोपऱ्यात आणि पूर्व दिशेला दिवा लावावा. या दिशेला दिवा लावल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. (New Year)

* नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी किंबहुना दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावावा. जर घरी तुळस उपलब्ध नसेल तर मंदिरात जाऊन तुळशीचे रोप असेल तिथे दिवा लावावा. तुळशीजवळ दिवा लावल्याने सर्व सुखे मिळतात आणि वास्तुदोषही दूर होतात. तुळशीजवळ दिवा लावल्याने आर्थिक अडचणी येत नाहीत असे सांगितले जाते. (Marathi)

Astrology

* वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरूवात गरजूंना, गरिबांना दान करून करता येईल. यात तुम्ही अन्न, ब्लॅंकेट किंवा कपडे दान करू शकता. दानधर्म हे अत्यंत पुण्याचे काम मानले जाते. दानधर्म केल्याने शनी आणि राहूचे दोष कमी होतात. (Todays Marathi Headline)

* वर्षाच्या पहिल्या दिवशी ब्रम्हमुहूर्तावर उठावे. अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा चिमूटभर हळद मिक्स करा आणि या पाण्याने अंघोळ करावी. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा शरीराला मिळेल. अंघोळ झाल्यावर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावा. यासाठी कलशात पाणी, अक्षदा घ्या आणि सूर्याला नमस्कार करावा. यामुळे मान-सन्मानात वाढ होईल. (Marathi News)

* घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्याजवळ एक पाण्याने भरलेला तांब्या ठेवा. यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहाते. जेव्हा घरात बाहेरून जी काही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत असते, ती घराच्या उंबऱ्यावरच नष्ट होते. घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते, त्यामुळे वास्तुदोष देखील नष्ट होतो. (Top Marathi Headline)

* नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गणपती बाप्पाची मूर्ती घरात आणल्यास बाप्पा आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतील. वास्‍तुशास्त्रानुसार, मोरपिस घरात ठेवणे शुभ मानले जाते. नवीन वर्षाच्या विशेष प्रसंगी मोरपिस आपल्या घरात आणावे. हे मोरपिस मंदिरात, पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे घरात आणि कुटुंबात सकारात्मकता वाढते. (Marathi Latest News)

* हिंदू धर्मात कामधेनू गाईची मूर्ती अत्यंत शुभ मानली जाते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ही मूर्ती घरात आणल्यास घरात संपन्नता येते. नवीन वर्षाच्या शुभारंभी हत्तीची पांढऱ्या रंगाची मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जाते. (Top Trending Headline)

=========

New Year : सर्वात आधी कोणता देश करतो नवीन वर्षाचे स्वागत?

New Year : कोणत्या धर्मामध्ये नवीन वर्षाची सुरुवात कधी होते?

=========

* वास्तुनुसार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ चार मुखी पिठाचा दिवा लावा. तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा आणि देवी लक्ष्मी घरात येते. (Top Stories)

* वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरूवात गरजूंना, गरिबांना दान करून करता येईल. यात तुम्ही अन्न, ब्लॅंकेट किंवा कपडे दान करू शकता. दानधर्म हे अत्यंत पुण्याचे काम मानले जाते. दानधर्म केल्याने शनी आणि राहूचे दोष कमी होतात. (Social News)

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही आणि अंधश्रद्धेला बढावा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.