Astro Tips : तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या काहीजणांना त्यांनी कंबरेला काळा धागा बांधल्याचे पाहिले असेल. खासकरुन लहान मुलांच्या कंबरेला काळा धागा बांधला जातो. या काळ्या धाग्याला करगुटा असेही म्हटले जाते. पण काळा धागा कंबरेल्या बांधण्यामागील कारण माहितेय का? खरंतर बहुतांशजण मानतात की, कंबरेला काळा धागा बांधल्याने वाईट नजरेपासून तुम्ही दूर राहता. याशिवाय काळा धागा शरीराला सकारात्मक उर्जा देतो. याशिवाय कंबरेला काळा धागा बांधल्याने आरोग्यासंबंधितही काही फायदे होतात.
काळा धागा कंबरेला बांधण्याचे फायदे
काळा धागा कंबरेला बांधण्यामागे काही कारणे आणि धार्मिक मान्यताही आहे. या मधील पहिली गोष्ट अशी की, वाईट नजरेपासून तुम्ही दूर राहाता. आपले शरीर पंचतत्वांपासून तयार झालेले आहे. यामुळेच आपल्या शरीराला उर्जा मिळत राहते.
जेव्हा कधी एखाद्या व्यक्तीला वाईट नजर लागते तेव्हा या पंच तत्वांमधून मिळणारी सकारात्मक उर्जा आपल्यावर काहीच काम करू शकत नाही. यामुळे आरोग्यासंबंधित काही समस्यांचा सामना करावा लागतो. याच वाईट शक्तींपासून दूर राहण्यासाठी कंबरेला काळा धागा बांधला जातो.
वैद्यकीय लाभ
कंबरेला काळा धागा बांधल्याने पाठीच्या कण्यासंबंधित समस्या आणि कंबरेखालील हिस्स्यामध्ये निर्माण होणाऱ्या दुखण्यापासून तुम्ही दूर राहता.
वाईट नजरेपासून दूर राहता
कंबरेला काळा धागा बांधण्याची एक जुनी परंपरा आहे. खासकरुन लहान मुलांच्या कंबरेला काळा धागा बांधला जातो. वाईट नजरेपासून दूर राहण्यासाठी खरंतर काळा धागा कंबरेला बांधतात. याशिवाय शरीरात सकारात्मक उर्जा मिळते. (Astro Tips)
ज्योतिष लाभ
काळा धागा बांधल्याने भविष्यात काही लाभ होतात. यामुळे धनलाभ होण्यासह तुमच्या सर्व इच्छाही पूर्ण होतात. आजही बहुतांशजण आपल्या कंबरेला काळा धागा बांधतात. असे म्हटले जाते की, भगवान शनि देवाच्या पूजेदरम्यान शनि देव महाराजांच्या मंत्रांचा जाप करताना काळा धागा बांधल्याने व्यक्तीवर शनिदेवाची कृपा राहते.
(टीप : या लेखातील माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)