Astro tips for anger- राग येणे हा प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावात असते. परंतु लहान-लहान गोष्टींवरुन रागवणे हे योग्य नाही. रागात आपल्या हातून अशी काही चूक होते ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचे नव्हे तर आपलेच आपण नुकसान करुन घेतो. अतिराग आल्यानंतर आपण काय वागतोय किंवा करतोय ते बरोबर आहे की चुकीचे हे सुद्धा कळत नाही. अशी स्थिती आरोग्यासाठी घातक ठरु शकते. ज्या व्यक्तींना अधिक राग येतो त्यांना आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना करावा लागतोच. त्यामुळे तुम्हाला सुद्धा अधिक राग येत असेल तर ज्योतिष शास्रात त्यावर काही उपाय सांगितले आहेत. त्याचा वापर करुन तुम्ही तुमचा राग हा काही प्रमाणात शांत करु शकता.
-व्यक्तीला राग का येतो?
ज्योतिष शास्रानुसार राग येण्यामागील मुख्य कारण मंगळ, सूर्य, शनि, राहु आणि चंद्र ग्रह आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सुर्य आणि चंद्र, मंगळ ग्रह एकमेकांसोबत एखाद्या रुपात संबंध तयार करत असतील तर त्या व्यक्तिला अपेक्षेपेक्षा अधिक राग येतो. राग येणे हे अग्नि तत्वाचे द्योतक आहे. जेव्हा तो अग्नि तत्वातील अन्य राशीतील ग्रहांना मिळतो तेव्हा त्या व्यक्तीला अधिक राग येतो. ज्योतिष शास्रात असे ही सांगण्यात आले आहे की, ज्या लोकांचा मंगळ हा उत्तम नसतो त्यांच्यामध्ये राग आणि इगो खुप असतो.
हे देखील वाचा- कासव असलेली रिंग घालताना ‘या’ चुका करु नका, अन्यथा…

राग शांत करण्यासाठी ज्योतिष शास्रातील काही उपाय
-ज्योतिष शास्रातअसे मानले आहे की, चंदनाच्या वासाने राग शांत होण्यास मदत होऊ शकते. ज्या व्यक्तिला अधिक राग येतो त्याने आपल्या आजूबाजूला चंदनाचा वापर करावा. असे ही मानले जाते की, चंदनाचा वापरामुळे राहू दोष दूर होतो आणि राग ही शांत होते. या व्यतिरिक्त अधिक राग येणाऱ्या व्यक्तींनी चंद्राला अर्घ्य द्यावे. चंद्र हा शीतलतेचे प्रतीक आहे.
-ज्योतिष शास्रात सांगण्यात आलेल्या उपायांपैकी एक असा उपाय म्हणजे जमीनीला नमस्कार करावा. असे मानले जाते की, ज्या व्यक्तींना अधिक राग येतो त्यांनी सकाळी उठल्यानंतर प्रथम जमीनीला नमस्कार करावा. त्यानंतर आपला डावा पाय जमीनीवर ठेवावा.
-ज्या व्यक्तिंना आपला राग नियंत्रणात ठेवता येत नाही त्यांनी नेहमीच लक्षात ठेवावे की, सकाळी उठल्यानंतर कमीत कमी १५-२० मिनिटे कोणाशी ही कोणत्याच प्रकारची चर्चा करु नका.(Astro tips for anger)
त्यामुळे वरील ज्योतिष शास्रातील काही उपायांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कराच. पण आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. कारण तुमच्या एखाद्या शब्दाने अनेक वर्षांचे नाते अवघ्या काही काळात तुटण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे नेहमीच विचारपूर्वक बोला आणि आपल्या रागावर नियंत्रण करण्यास शिका.