ज्योतिष शास्रानुसार काही कामं अशी असतात जी सुर्यास्तानंतर करु नये. कारण ती कामे करणे म्हणजे अशुभ मानले जाते. शास्रात या वेळेला फार महत्वपूर्ण मानले आहे. आपण आपल्या आजी-आजोबांकडून किंवा वडिलोपार्जिक लोकांकडून ऐकले असेल की, काही कामे ही सुर्यास्तानंतर करु नयेत. जसे की, संध्याकाळच्या वेळी झोपू नये किंवा कचरा काढू नये. यामुळे लक्ष्मी नाराज होते. अशातच तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागतो. ज्योतिष शास्रानुसार, या वेळेत घरात देवी लक्ष्मी, देवी सरस्वती आणि देवी दुर्गा यांचे आगमन होत असते. त्यामुळे अशा काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यावश्यक असते. तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना ही करावा लागेल अशी समस्या ही उद्भवू शकते. म्हणूनच सूर्यास्तानंतर कशी कोणती कामे आहेत जी करणे टाळले पाहिजे.(Astro Tips)
-संध्याकाळच्या वेळेस झोपू नये
असे मानले जाते की, प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य वेळ ठरवण्यात आलेली असते. ज्योतिष शास्रानुसार असे सांगितले जाते की, संध्याकाळच्या वेळेस झोपू नये. कारण असे केल्याने वय कमी होते आणि काही आरोग्या संबंधित समस्यांचा ही सामना करावा लागतो. या व्यतिरिक्त घरात देवीचे आगमन होत असताना तुम्ही झोपलात तर ती प्रसन्न कशी होईल. तसेच संध्याकाळच्या वेळेस घराचा दरवाजा बंद ठेवू नये.
हे देखील वाचा- आषाढी एकादशीला निघते पंढरपूरची दिंडी यात्रा, जाणून घ्या याच्याशी संबंधित रंजक गोष्टी

-तुळशीवृंदावनला हात लावू नका
ज्या घरात तुळशीचे झाडं किंवा तुळशीवृंदावन असेल त्यांनी संध्याकाळच्या वेळेस त्याला हात लावणे टाळावे. कारण असे केल्यास देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते. खरंतर ज्या घरात तुळशीची दररोज पूजा केली जाते तेथे देवी लक्ष्मीची कृपा नेहमीच सदैव त्यांच्यावर असते. आणखी महत्वाचे म्हणजे, तुळशी जवळ संध्याकाळच्या वेळेस दिवा लावू शकता पण त्याला पाणी घालू नका.(Astro Tips)
-सूर्यास्तानंतर घरात किंवा अंगणात कचरा काढू नये
शास्रानुसार, सूर्यास्त आणि संध्याकाळच्या वेळेस केरकचरा काढू नये. असे मानले जाते की, या दरम्यान देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत असते. त्यामुळे अशा वेळी तुम्ही झाडू काढत असाल तर देवी घरातून निघून जाईल. परिणामी तुम्हाला आर्थिक समस्या आणि आर्थिक तंगीला सामोरे जावे लागेल.

-केस किंवा नखं कापणे
सूर्यास्तानंतर घरात केस किंवा नखं कापू नये. ऐवढेच नव्हे तर पुरुषांनी शेविंग करण्यापासून दूर रहावे. असे केल्याने घरात नकारात्मक उर्जा निर्माण होते. असे ही मानले जाते की, केसं किंवा नखं संध्याकाळच्या वेळेस कापल्यास आपल्या घरावर कर्ज वाढते.
-अन्न उघडे ठेवणे
सूर्यास्तानंतर भोजन किंवा पाणी उघडे ठेवू नये. या गोष्टी नेहमीच झाकून ठेवल्या पाहिजेत. परंतु उघडे ठेवल्यास घरात नकारात्मकता पसरते. परिणामी तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.