Home » Astad Kale : ‘छावा’ वाईट चित्रपट; स्वतःच्याच फिल्मबद्दल आस्तादचं धक्कादायक मत!

Astad Kale : ‘छावा’ वाईट चित्रपट; स्वतःच्याच फिल्मबद्दल आस्तादचं धक्कादायक मत!

0 comment
astad kale
Share

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava) चित्रपट प्रदर्शित होऊन २ महिने उलटून गेले. अजूनही थिएटरमध्ये या चित्रपटाची जादू कायम असून सलमान खानच्या ‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपटालाही ‘छावा’ने मागे टाकलं आहे. परंतु, सनी देओलच्या ‘जाट’ (Jaat) चित्रपटानंतर छावाची कमाई कमी झाली असून अशात आता एका मराठी अभिनेत्याने चक्क छावा चित्रपट वाईट असल्याचं म्हटलं आहे. काय म्हणाला हा अभिनेता आणि तो कोण आहे जाणून घेऊयात…(Bollywood news)

‘छावा’ चित्रपटामध्ये विकी कौशलसह अनेक मराठी कलाकार झळकले होते. त्यापैकी एक म्हणजे आस्ताद काळे. या चित्रपटात त्याने सूर्याची भूमिका केली होती. मात्र, आता चित्रपट रिलीज होऊन दोन महिने झाल्यानंतर आणि चित्रपटाला घवघवीत यश मिळाल्यानंतर आस्तादने सोशल मिडियावर पोस्ट करत चित्रपटाचे त्याला न पटलेले मुद्दे मांडले आहेत. (Entertainment)

आस्तादने (Astad kale) त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “औरंगजेबाचे वय आणि आजारपण बघतात तो या वेगाने चालू शकेल? सोयराबाई राणी सरकारांचे अंत्यसंस्कार एका नदीकाठी? असं नाही व्हायचं हो! सोयराबाई राणी सरकार या परपुरुषासमोर बसून पान लावतायेत? आणि ते खातायत? हे कसं चालतं?

त्याने पुढे एका पोस्टमध्ये लिहलंय की, मी आता खरं बोलणार आहे…छावा. वाईट फिल्म आहे. फिल्म म्हणून वाईट आहे. इतिहास म्हणून बघायला गेलात तरी problematic आहे. सर्वतोपरी वाईट आहे. आणखी एका पोस्टमध्ये त्याने लिहिले की, मी आता खरं बोलणार आहे… हा कुठला इतिहास आहे? महाराणी सोयराबाई सरकारांनी छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाच्या मुलाला पत्र पाठवलं होतं????????!!!! काय पुरावे आहेत याचे????!!!!”. (Astad Kale)

दरम्याने एकीकडे चित्रपटाचं कौतुक होत असताना आता याच चित्रपटात काम केलेल्या मराठी कलाकाराने ‘छावा’ सारख्या चित्रपटावर आक्षेप घेतल्यामुळे नक्कीच नवा वाद निर्माण झाला आहे. आता यावर स्वत: दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर काही उत्तर देणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तसेच, छावा चित्रपटाची कथा शिवाजी सावंत (Shivaji sawant) यांच्या ‘छावा’ कादंबरीवर आधारित असल्यामुळे आता या विषयाला कोणतं वळण लागणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. (Chhaava movie latest news)

‘छावा’ (Chhaava) चित्रपटात विकी कौशल (Vicky Kaushal) याने छत्रपती संभाजी महाराजांची तर रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. तसेच, या चित्रपटात संतोष जुवेकर, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, किरण करमरकर, दिव्या दत्ता, अक्षय खन्ना, डायना पेंटी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार होते. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या छावाने आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर ६००.६ कोटींची कमाई केली आहे. (Chhaava movie box office collection)

=========

हे देखील वाचा : Sadanand Date : पहिला कसाब आता तहव्वूर राणा !

==========

तर, थिएटर गाजवल्यानंतर आता ‘छावा’ चित्रपट ११ एप्रिल २०२५ रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीवर रिलीज झाला आहे. त्यामुळे आता ‘छावा’ प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे. (Chhaava box office collection)

 

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.