असम- मेघालयाचा सीमा वाद (Assam-Meghalaya Border Dispute)पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.सीमेवर नुकताच हिंसाचार झाला. हिंसेत वन रक्षकांसह दोन राज्यातील ६ लोकांचा मृत्यू झाला आहे. मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराडा सांग यांनी मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. सीमेसंदर्भात हिंसा आणि वादाचे हे पहिलेच प्रकरण नव्हे. दोन्ही राज्यांमध्ये सीमेचा हा वाद ५० वर्ष जुना आहे. वाद मिटवण्यासठी यंदाच्या वर्षातच मार्च महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वकाही ठिक केले होते. असम आणि मेघालयाच्या दरम्यान वादाची सुरुवात ५० वर्षापूर्वी १९७२ मध्ये झाली जेव्हा मेघालयाला असम पासून वेगळे करण्यात आले होते.
असा सुरु झाला होता वाद?
मेघालय आणि असम हे एकमेकांपासून जवळजवळ ८८५ किमी लांब सीमेवर आहे. भारतात जेवढे राज्य वेगळे झाले आहेत त्यांचे गठन भाषेच्या आधारावर झाले. मात्र पुर्वोत्तर मध्ये राज्याचे गठन पर्वतांच्या स्थितीच्या आधारावर झाले. जेव्हा मेघालययाला असम पासून विभक्त करण्यात आले तेव्हा विभागणी झाली आणि गारो समुदायाची लोकसंख्येतून ती गेली. नंतर दोन समुदायातील लोकांमध्ये विकासावरुन खुप वाद सुरु झाला होता.
आता असे काही लोक आहेत जे असम मध्ये राहतात पण त्यांचे नाव मेघालयातील मतदार यादीत दाखल आहे. अशा काही मुद्यांवरुन लंगपीह येथे हिंसा झाला. १९७२ मध्ये जेव्हा दोन्ही राज्य वेगळी झाली तेव्हा येथे १२ क्षेत्रांमध्ये वाद सुरु झाला.
गेल्या वर्षातील हिंसाचारात ६ जवानांचा मृत्यू
असम पुनर्गठन अधिनियम १९७१ अंतर्गत असम हे मेघालयापासून विभक्त झाले. या कायद्याला आव्हान दिले गेले आणि वादाला तोंड फुटले. ५० वर्षांपासून सुरु झालेल्या वादाचे मोठे कारण असम जिल्ह्यातील कामरुप येथील लंगपीह जिल्ह्यालाला मनले गेले. लंगपीह हा एकेकाळी कामरुप जिल्ह्याचा हिस्सा होता. आता भले मेघालयाचा हिस्सा झाला असला तरी असम याला आपला सुद्धा हिस्सा मानतात. लंगपीहचा हिस्सा बहुतांश वेळा वादाचे कारण ठरला. जे मेघालयात आहे तरीही असम त्याला आपले मानतो.(Assam-Meghalaya Border Dispute)
हे देखील वाचा- जगभरात प्रत्येक वर्षाला १५ लाख लोकांचा वेळेआधीच होतो मृत्यू, वायू प्रदुषण ठरतेय कारण
दोन्ही राज्यांदरम्यानच्या वादाचा परिणाम तेथील विकासावर झाला. एका राज्यातील लोकांची नावे दुसऱ्या राज्यातील मतदार यादीत असणे, नकाशात आतापर्यंत बदल न होणे आणि वेळोवेळी जुने मुद्दे उकरुन काढण्यावरुन नेहमीच वाद होत राहिला. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, लंगपीहसह काही क्षेत्रातील हिंसाचाराच्या घटना झाल्या. येथे १२ वादग्रस्त क्षेत्रांमध्ये काही वेळा हिंसाचाराच्या घटना सुद्धा झाल्या आहेत. तर २०१० मध्ये लंगपीह मध्ये पोलिसांनी गोळीबार केला असता तेव्हा चार लोकांचा मृत्यू ही झाला होता. गेल्या वर्षात २६ जुलैला असम-मिझोराम सीमेवर आतापर्यंतचा सर्वाधिक भीषण हिंसाचार होत पोलिसांच्या सहा जवानांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही राज्यांतील जवळजवळ १०० नागरिक आणि सुरक्षारक्षक जखमी ही झाले होते.