Home » एशियातील पहिल्या कमर्शियल महिला पायटल म्हणून रेकॉर्ड करणाऱ्या ”इंद्राणी सिंह”

एशियातील पहिल्या कमर्शियल महिला पायटल म्हणून रेकॉर्ड करणाऱ्या ”इंद्राणी सिंह”

by Team Gajawaja
0 comment
Asia first women pilot
Share

एविएशन इंडस्ट्रीमध्ये २८ नोव्हेंबर १९९६ रोजी एका भारतीयाचे नाव दाखल झाले. ते नाव होते कॅप्टन इंद्राणी सिंह. अमेरिकन कंपनी बोईंगचे विमान एयरबस ए-३०० चे उड्डाण करत त्यांनी इतिहास रचला होता. असे करणाऱ्या त्या पहिल्याच महिल्या होत्या आणि एशियातील पहिली कमर्शियल महिला पायलट बनल्या. त्या विमानाच्या कमांडर सुद्धा होत्या. कॅप्टन इंद्राणी जगातील पहिल्या महिला आहेत ज्यांनी एयरबस ए-३०० च्या कमांडर राहिल्या होत्या.(Asia first women pilot)

बंगाल परिवारात जन्मलेल्या आणि दिल्लीत शिक्षण घेतलेल्या परिवाराने कधीच विचार केला नव्हता की, त्यांची मुलगी पायलट होईल. मात्र इंद्राणी यांनी कमी वयातच हे स्वप्न पाहिले होते. दिल्लीतील समर फिल्ड्स स्कूलमधून सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ऑल इंडिया ग्लाइडिंग क्लब मध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी इंडियन एयरलाइन्स मध्ये प्रवेश घेतला. तर १९८९ मध्ये त्यांना एयरबस ३२० ला चालवण्यासाठीच्या ट्रेनिंगसाठी फ्रांन्सला पाठवण्यात आले होते.

Asia first women pilot
Asia first women pilot

फ्रान्समध्ये ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर यशस्वीपणे एयरबस ३२० ने उड्डाण केले. अशा प्रकारे त्या ते उडवणाऱ्या जगातील पहिल्या महिला पायलट झाल्या. सर्वत्र त्यांचे कौतुक ही झाले. त्याचसोबत लहानपणापासून त्यांना शाळेत जाई पर्यंत गरिबांची मुलं दिसायची. त्यांना पाहून त्यांच्या शिक्षणाबद्दलचा प्रश्न नेहमीच उद्भवायचा. पायलट बनण्यानंतर सुद्धा त्यांनी त्याबद्दल विचार करणे सोडले नाही.

कॅप्टन इंद्राणी यांचे असे स्वप्न होते की, भारतात साक्षरता अधिक वाढवावी. त्यासाठी त्यांनी १९९६ मध्ये लिट्रेसी इंडियाच्या नावाने एनजीओची सुरुवात केली. या एनजीओचे काम आर्थिक रुपात कमकुवत असलेल्या लोकांना साक्षर होण्यास मदत करणे. त्या अशा म्हणतात की, हे माझे खासगी मिशन आहे. १९९६ मध्ये मी ५ मुलांपासून याची सुरुवात केली. आता आमचे उद्दिष्ट २५ हजार मुले आणि महिलांचे आहे.(Asia first women pilot)

हे देखील वाचा- होमी भाभांचा अपघात झाला नसता तर भारताकडे असती हजारो परमाणू हत्यारे

कॅप्टन इंद्राणी यांचा विवाह शाळेतील मित्र कॅप्टन कीरत सिंह ग्रेवाल यांच्याशी झाले. त्यांना एक मुलगा असून जो आज ही महिला आणि मुलांना शिक्षण देण्याचे अभियान चालवत आहे. समाजात बदल घडवणून आणण्यासाठी त्यांना वुमन्स अचीवर्स अवॉर्ड २००९ आणि इंटरनॅशनल काँग्रेस फॉर वुमन्स गॉडफ्रे फिलिप स्पेशल अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.