Home » ‘दि केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सर्वत्र खळबळ

‘दि केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सर्वत्र खळबळ

by Team Gajawaja
0 comment
Movie Trailer
Share

‘दि केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. केरळमधील हिंदू कुटुंबातील मुलीचा थेट आयएसआयएस पर्यंतचा प्रवास. त्या मुलीची झालेली फरफट, कुटुंबाची ओढाताण नंतर एक भयाण सत्य पुढे येतं. ते म्हणजे अशी एकच मुलगी नाही तर केरळमधील हजारो मुली अशा धर्मपरिवर्तनातून परदेशात पाठवल्या गेल्या आहेत आणि त्यातील अनेक तरुणी अतिरेक्यांच्या वासनेला बळी पडल्या आहेत किंवा काहीजणी अतिरेकी प्रवाहात सामिल झाल्या आहेत.अशी कथा असलेल्या ‘दि केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि एकच खळबळ उडाली आहे.  केरळ राज्यात मोठ्या प्रमाणात धर्मपरिवर्तन होत असून यामध्ये हजारो तरुणींचा बळी दिला जात आहे, हे सांगणा-या या चित्रपटानं वाद होणार अशी चिन्हे आहेत. ‘कश्मिर फाईल्स’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आणि नंतरही काश्मिर फाईल्सवर काहींनी टीका केली होती आणि या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली होती.  तशीच मागणी आता ‘दि केरळ स्टोरी’ बाबत होत आहे. 5 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.  

‘दि केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र खळबळ उडाली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये 32,000 केरळी मुलींचे धर्मांतर करुन त्यांचा दहशतवाद्यांनी त्यांचा वापर केल्याचे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यापासून त्यावर बंदी घालण्याची मागणी होत होती. 5 मे रोजी प्रदर्शित होणा-या या चित्रपटात अदा शर्मा ही अभिनेत्री प्रमुख भूमिकेत आहे. केरळ राज्यातील मुली लव्ह जिहादला बळी पडून इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया ISIS मध्ये सामील झाल्याची धक्कादायक कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. या चित्रपटाचा टिझर नोव्हेंबर 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे.  केरळ राज्यातील या मोठ्य धर्मपरिवर्तनाचे वास्तव मांडणा-या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले आहे. तर विपुल अमृतलाल शाह हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

‘दि केरळ स्टोरी’चा ट्रेलर रिलीज झाल्यावर चित्रपटाचे खरे स्वरुप स्पष्ट झाले आहे. 2021 मध्ये आलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाप्रमाणे हा चित्रपटही बॉक्सऑफीसवर हिट ठरणार अशी चर्चा आहे. ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात काश्मिरी हिंदूंचे पलायन आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची कथा होती. तशाच पद्धतीनं ‘दि केरळ स्टोरी’ या चित्रपटात केरळमधील धर्मांतरणाचे वास्तव मांडण्यात आले आहे. केरळमधील मुलींचे ब्रेनवॉश करून त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडले जाते आणि नंतर त्यांना आयएसआयएस या दहशतवादी संघटनेत कसे सामील करण्यात येते, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात शालिनी उन्नीकृष्णन (अदा शर्मा) या केरळमधील हिंदू मुलीच्या परिचयाने होते. शालिनी तिच्या कुटुंबात आनंदी आहे. ही शालिनी शिक्षणासाठी अन्य ठिकाणी जाते आणि तिच्या मैत्रिणी तिला त्यांच्या धर्माचे महत्त्व सांगतात. ती पुढे एका तरुणाच्या प्रेमात पडते. लग्न करुन धर्म बदलते आणि तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ चालू होतो.  शालिनी नाव बदलून अन्य देशात तिच्या नव-यासोबत येते आणि तिला ISIS च्या हवाली करण्यात येते.  इथे तिच्यावर अनेक अत्याचार होतात. इथे ती फक्त एकटीच नसते तर अनेक तरुणींची अशीच कथा असते. ही शालिनी नंतर पोलीसांच्या ताब्यात येते आणि मग तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी जगापुढे येते. या ट्रेलरमध्ये धर्मांतर, लग्न आणि मानवी तस्करी दाखवण्यात आली आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून ‘दि केरळ स्टोरी’वर बंदी घालण्याची मागणी होत आहे. तमिळनाडूतील एका पत्रकाराने चित्रपटावर बंदी घालण्यासाठी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ, केरळचे मुख्यमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे याचिका केली आहे. चित्रपटाच्या माध्यमातून केरळची प्रतिमा मलीन करून तेथे धार्मिक भेदभाव पसरवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हणण्यात आले आहे.  मात्र चित्रपटाच्या टिमनं हा दावा फेटाळून लावला आहे. त्यांच्या मते चित्रपटाची कथा वास्तववादी आहे.  2016 मध्ये अशाचप्रकारे केरळमधून गायब झालेल्या तरुणींवर आधारीत ही कथा आहे.  

=========

हे देखील वाचा : अमृताने जेव्हा सैफला करिनासोबत पाहिले तेव्हा…

=========

एकूण ‘दि केरळ स्टोरी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर होणारे वाद पहाता हा चित्रपट ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटाच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा हा चित्रपट वादात सापडला,  मात्र तेवढाच गाजला. आताही फिल्मफेअरमध्ये त्याला सर्वाधिक नॉमिनेशन मिळाले आहेत. त्यामुळे 5 मे नंतर ‘दि केरळ स्टोरी’ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे स्पष्ट होणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.