दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिवाळीनिमित्त एक मोठे अपील केले आहे. त्यानुसार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी असे म्हटले की, रुपयांच्या नोटांवर गणपती आणि देवी लक्ष्मीचा फोटो लावावा. पुढे त्यांनी असे ही म्हटले की, मी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांना अपील करतो की गणपती, देवी लक्ष्मी यांच्या फोटोसह गांधीजींचा सुद्धा फोटो लावावा.
अरविंद केजरीवाल यांनी असे ही सांगितले की, जर इंडोनेशिया त्यांच्या चलनाल गणपतीचा फोटो लावू शकतो, तर आपण सुद्धा हे करु शकतो. या संदर्भात अपील करण्यासाठी मी एक पत्र सुद्धा लिहिणार आहे. आपल्या देशाची आर्थिक स्थिती ठिक करण्यासह सर्वशक्तिमान अशा गणपतीचे सुद्धा आशीर्वाद असावेत.

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतीय चलनावर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो लावण्याबद्दल विचार करण्याचा आग्रह करणार असल्याचे ही केजरीवाल यांनी म्हटले आहे. जर आपल्या चलनावर गणपती आणि देवी लक्ष्मीचा फोटो असेल तर आपला देश समृद्ध होईल. नव्या चलनावर महात्मा गांधी यांच्या बाजूलाच लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो लावण्यात यावा. केजरीवाल यांनी फोटो लावण्यावरुन असे म्हटले की, देवी लक्ष्मी ही समृद्धीची देवी मानली जाते. तर गणपती हा सर्वांचे विघ्न दूर करतो. अशातच त्या दोघांचा फोटो नोटांवर असावा. तर आम आदमी पार्टीचे प्रमुख यांचे असे म्हणणे आहे की, आम्ही सर्व नोटा बदलण्यास सांगत नाहीत. पण ज्या नव्या नोटा छापल्या जातील त्यावर हळूहळू असे करावे.
हे देखील वाचा- CJI पदी दीर्घकाळ राहिल्याचा वडिलांचा रेकॉर्ड, मुलाला सुद्धा मिळणार सीजेआय पद
अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या या मागणीवर भाजपच्या काही नेतेमंडळींनी टीका केली आहे. त्यापैकी खासदार मनोज तिवारी यांनी असे म्हटले की, केजरीवाल यांनी हिंदूत्वाचे कार्ड खेळू नये. त्यांनी भक्त बनवण्याचा प्रयत्न करु नये. केजरीवाल फक्त मतांसाठी ढोंगीपणा करत आहेत. पुढे तिवारी यांनी म्हटले की,ही लोक फोटो हटवणारी लोक आहेत.
संबित पात्रा यांनी सुद्धा अरविंद केजरीवाल यांच्या मागणीवरुन त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी असे म्हटले की, अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसापूर्वीच पत्रकार परिषद घेत असे म्हटले होते की, चुकून ही जो कोणीही दिवाळी साजरी करेल त्याला तुरुंगात टाकू असे म्हणत होते. तेच आता अचानक लक्ष्मी आणि गणपतीच्या विषयी बोलत आहेत.
या व्यतिरिक्त काही दिवसांपूर्वीच अखिल भारत हिंदू महासभेने सुद्धा भारतीय चलनातील नोटांवर महात्मा गांधी यांच्या ऐवजी नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा फोटो लावण्याची मागणी केली होती. कारण स्वातंत्र्य संग्रामात त्यांचे सुद्धा योगदान फार मोठे होते.