Home » भारतीय वंशाच्या अरुणा मिलर बनल्या अमेरिकेतील मैरीलँन्डच्या लेफ्टिनेंट गर्वनर

भारतीय वंशाच्या अरुणा मिलर बनल्या अमेरिकेतील मैरीलँन्डच्या लेफ्टिनेंट गर्वनर

by Team Gajawaja
0 comment
Aruna Miller
Share

अमेरिकेत भारतीय वंशाच्या अरुणा मिलर (Aruna Miller) या मैरीलँन्डच्या लेफ्टिनेंट गवर्नर म्हणून निवडल्या गेल्या आहेत. हे पद मिळवणाऱ्या पहिल्या अप्रवासीआहेत. यापूर्वी त्या ट्रांन्सपोर्ट डिपार्टमेंटमध्ये नोकरी करायच्या. त्यांनी डेमोक्रेटिकच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि विजय मिळवला होता. भारतात जन्मलेल्या अरुणा यांनी लेफ्टिनेंट गर्वनरचा कार्यभार सांभाळण्यापूर्वी श्रीमद्भवत् गीतेवर हात ठेवून पदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली. त्या मैरीलँन्डच्या १० व्या गर्वनर म्हणून निवडल्या गेल्या आहेत. अरुणा यानी त्यांच्या या यशाचे श्रेय हे आपल्या परिवाराला दिले आहे.

कोण आहेत अरुणा मिलर?
५८ वर्षीय अरुणा मिलर यांचा जन्म हैदराबाद मध्ये ६ नोव्हेंबरल १९६४ रोजी झाला होता. त्या केवळ सात वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांच्या आई-वडिलांनी भारत सोडत USA मध्ये आले. अरुणा यांचे वडिल मॅकेनिकल इंजिनिअर होते. युएसमध्येच अरुणा यांचे बालपण गेले. १९८९ मध्ये अरुणा मिलर यांनी मिसौरी विज्ञान आणि प्रौद्योगिकी विवि मधून सिविल इंजिनिअरिंग मध्ये ग्रॅज्युएशन केले होते. त्यानंतर त्यांनी ट्रांन्सपोर्ट डिपार्टमेंटमध्ये नोकरी केली.

Aruna Miller
Aruna Miller

हाउस ऑफ डेलीगेटमध्ये पूर्ण केले दोन कार्यकाळ
१९७२ मध्ये परिवारासह अमेरिकेत निघून गेलेल्या अरुणा मिलर यांनी सन २००० मध्येच तेथील नागरिकता मिळवली. २०१०ते २०१८ पर्यंत त्या हाउस ऑफ डेलीगेट मध्ये राहिल्या. त्यांनी तेथे आपले दोन कार्यकाळ पूर्ण केले. अरुणा यांना भारतीय-अमेरिकेतील लोक खुप पसंद करतात.लेफ्टिनेंट गर्वनरच्या निवडणूकीत काही ट्रंम्प समर्थकांनी सुद्धा अरुणा यांना समर्थन दिले होते.

ट्रांन्सपोर्ट डिपार्टमेंटमध्ये नोकरी
मिलर (Aruna Miller) यांनी ट्रांन्सपोर्टेशन इंजिनिअरच्या रुपात कॅलिफोर्निया, वर्जिनिया आणि हवाई मध्ये काम केले. त्यानंतर त्या मैरीलँन्डमध्ये शिफ्ट झाल्या. येथे सुद्धा त्यांनी मोंटामरी कंट्री डिपार्टमेंट ऑफ ट्रांन्सपोर्टेशन मध्ये काम केले. अरुणा यांनी आपल्या कॉलेजमधीलच डेविड मिलर यांच्याशी लग्न केले. त्यांना तीन मुली आहेत.

हे देखील वाचा- ४० लाख फेक युजर बनवत जगातील मोठ्या बँकेला १४० कोटींना विकली कंपनी, सत्य ऐकून व्हाल हैराण

शपथविधी वेळी भावूक झाल्या मिलर
लेफ्टिनंट गर्वनरच्या पदावर शपथ घेताना अरुणा या भावूक झाल्या. त्यांनी भारत ते येथवरच्या प्रवासाबद्दल सांगितले. त्यावेळी त्या सांगत होत्या, शाळेच्या दिवसात माझ्या सारखे कोणीही दिसायचे नाही, इंग्लिश सुद्धा यायचे नाही. मी अन्य मुलांप्रमाणे कँन्टीनमध्ये खाणं खाल्ल तर उलटी केली. अरुणा मिलर यांनी असे म्हटले की, त्यावेळी त्यांनी आजीकडे जाण्याचा हट्ट ही केला होता. त्यानंतर असे समजले की, मी जशी आहे तशीच राहणार. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय हे परिवारालाच दिले आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.