भारताच्या कानाकोप-यात मंदिरे आहेत. यातील काही मंदिरे ही पौराणिक वारसा जपणारी मंदिरे आहेत. तामिळनाडू राज्यातही अशी अनेक मंदिरे आहेत. या मंदिरांमधील अरुलमिघु लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर हे प्रमुख मंदिर मानले जाते. हे नरसिंह स्वामी मंदिर वेल्लोर जिल्हातील रानीपेट शहरातील शोलिंगूर येथे आहे. चेन्नई, वेल्लोर, अरक्कोनम, रानीपेट आणि बेंगळुरू सारख्या प्रमुख शहरांशी जोडलेले शोलिंगूर, वर्षभर भगवान नरसिंहाच्या भक्तांनी गजबजलेले असते. (Tamil Nadu)
हजार वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. एका उंच टेकडीवर हे मंदिर असल्यानं धार्मिक पर्यटनासाठी या मंदिराला पहिली पसंती असते. मंदिरात जाण्यासाठी 1,305 पाय-या चढाव्या लागतात. मंदिरापर्यंत जाणारा हा प्रवास करतांना भाविक आसपासच्या निसर्ग सौंदर्यानं मोहीत होऊन जातात. पावसाळा सुरु झाला की या सर्व भागावर हिरवी चादर ओढल्यासारखे दिसते. निसर्गाचे हे अनोखे रुप बघण्यासाठी येथे मोठ्या संख्येनं भाविक येतात. भारतात अनेक मंदिरे आहेत, जिथे गेल्यावर आजार बरे झाल्याचा दावा करण्यात येतो. मात्र त्यातील अरुलमिघु लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर हे एकमेव मंदिर आहे, जिथे गेल्यावर मानसिक तणाव आपोआप कमी होत असल्याचे भाविक सांगतात. टेकडीवर असलेल्या या मंदिराचा देखावाच इतका अनोखा आहे, की या मंदिरापर्यंत जातांनाच आध्यात्मिक आनंद मिळतो आणि त्यातून मानसिक ताण आपोआप कमी होत जातो. (Social News)
तामिळनाडूमधील शोलिंगूर भागातील अरुलमिघु लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरा हे वैष्णव परंपरेतील प्रमुख मंदिर असल्याची माहिती आहे. अरुलमिघु लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर, हे शोलिंगूर मंदिर म्हणूनही ओळखले जाते. मंदिर हजार वर्ष जुने आहे. त्याची ख्याती भारतभर आहे. सध्या या सर्व भागात मोठ्याप्रमाणात वस्ती झाली आहे. तसेच तामिळनाडू मधील प्रमुख शहरांना शोलिंगूर हे जोडले गेले असल्यानं आता या मंदिरात वर्षाचे बाराही महिने भाविकांची गर्दी असते. 750 फूट उंचीवर असलेले मंदिर नरसिंह स्वामींच्या चमत्कारांसाठी जेवढे प्रसिद्ध आहे, तेवढेच या मंदिराचे निसर्ग सौंदर्यही कायम चर्चेत राहिले आहे. विशेषतः पावसाची चाहूल लागली की नरसिंह स्वामी मंदिराच्या टेकडीवर जाणा-या पर्यटकांची गर्दी होऊ लागते. या मंदिरावरुन निसर्गाचे अद्भूत रुप बघायला दूरदूरवरुन पर्यटक येतात. मंदिरात जाण्यासाठी भाविकांना 1305 पाय-या चढाव्या लागतात. मात्र या सर्व मार्गात असलेल्या अद्भूत निसर्गानं भाविकांना कुठलाही थकवा जाणवत नाही. (Tamil Nadu)
या नरसिंह स्वामी मंदिराचा आणि शोलिंगूर शहराच्या विकासाचा समृद्ध इतिहास आहे. स्वामी धोड्डाचार यांच्या प्रयत्नांमुळे विजयनगर साम्राज्यात असलेले शहर भरभराटीला आल्याचे सांगितले जाते. स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध असलेल्या या मंदिरातील चार खांबावर असलेले धुवथा सरथाना मंडपम हे त्याच्यावरील कोरीव कामामुळे आजही भाविकांना आश्चर्यचकीत करते. याच मंदिराच्या पाय-या चढण्यापूर्वी ब्रह्म तीर्थम नावाचे तलाव आहे. या भव्य तलावात स्नान करुन नरसिंह स्वामींचे दर्शन घेतल्यानं आध्यात्मिक शांतीसह मानसिक आजारांपासून मुक्त्तता मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. (Social News)
या नरसिंह मंदिराची स्थापत्यकला ही आज स्थापत्यशास्त्राचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांसाठी मोठी देणगी ठरली आहे. या मंदिराचा अभ्यास करण्यासाठी देशभरातील स्थापत्यशास्त्राचे विद्यार्थी येथे मोठ्या संख्येनं येतात. 1000 वर्षाहून जुने असलेल्या या मंदिराच्या महतीची आणि त्याच्या सौंदर्याची तिरुमंगाई अल्वार आणि नम्माल्वार सारख्या संतांनी त्यांच्या स्तोत्रांमध्ये स्तुती केली आहे. या मंदिराची बांधणी कोणी केली याबाबत मात्र येथे काही कथा सांगितल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे, परकालासुर नावाचा राक्षस लोकांवर अत्याचार करीत होता. राजा वसंतराजाने या राक्षसाला पराभूत करण्यासाठी भगवान विष्णूची आराधना केली. त्यातून भगवान नरसिंह प्रकट झाले आणि त्यांनी राक्षसाचा पराभव केला. परकालासुराचा पराभव झाल्यावर भगवान नरसिंहाच्या भयंकर रूपाला शांत करण्याची गरज होती. अशावेळी वसंतराजानं देवी लक्ष्मीकडे मदत मागितली. देवी कनकवल्ली थायरच्या रूपात प्रकट झाली आणि प्रभूच्या मांडीवर बसली, ज्यामुळे त्यांचा राग शांत झाला. याच स्थानावर हे मंदिर उभारण्यात आले. (Tamil Nadu)
==========
हे देखील वाचा : Admission : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची नवीन तारीख जाहीर
Taj Lake Palace : पुष्पबंता पॅलेस ते स्टार पुष्पबंता पॅलेस हॉटेल !
==========
मुघल आक्रमकांनी या मंदिराचेही नुकसान केले. पुढे वीर नरसिंह यांनी मंदिराची पुनर्बांधणी केली. यात मंदिराच्या मुळ स्थापत्यकलेचे जतन करण्यात आले. मंदिरामध्ये दैवीकथा चित्ररुपात मांडण्यात आल्या आहेत. या मंदिरात अहोरात्र भक्तांची गर्दी असते, त्यामागे येथील अनोखी अशी पूजा पद्धतीही कारणीभूत ठरली आहे. प्रत्येक स्वाती नक्षत्राच्या संध्याकाळी येथे तिरुमंजनम सोहळा असतो. शिवाय ब्रह्मोत्सवम, नवधान्यम हे धार्मिक सोहळेही बघण्यासाठी मोठ्या संख्येनं येथे भाविक येतात. सध्या पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे या मंदिरात जाणा-या भाविकांची संख्या वाढली आहे. निसर्ग सौंदर्यासह आध्यात्मिक आनंद घेण्यासाठी हे नरसिंह स्वामींचे भक्त मंदिरात जात आहेत. (Social News)
सई बने