Home » आर्टिफिशियल स्विटनरचा वापर करत असाल तर व्हा सावध

आर्टिफिशियल स्विटनरचा वापर करत असाल तर व्हा सावध

by Team Gajawaja
0 comment
Artificial Sweetener
Share

जर तुम्ही दररोज चहा किंवा कॉफी पिताना साखरेऐवजी आर्टिफिशियल स्विटनरचा वापर करत असाल तर थांबा. यामागील कारण असे की, आर्टिफिशियल स्वीटनर तुमच्या आरोग्याला नुकसान पोहचवू शकते. डब्लूएचओने याबाबत अलर्ट जारी केला आहे. त्यांनी इशारा देत असे म्हटले की, या स्वीटनरचा वापर केल्याने लठ्ठपणा आणि हृदयासंबंधित आजार होण्याचा धोका असतो.(Artificial Sweetener)

डब्लूएचओच्या मते, आजकाल लोक साखरेचा ऑप्शन म्हणून non sugar sweeteners चा खुप वापर करतात. गेल्या पाच वर्षांमध्ये याचा ट्रेंन्ड फार वाढला आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाब रुग्ण आर्टिफिशियल स्वीटनरचाच वापर करतात. ज्या लोकांना कोणताही आजार नसतो ते सुद्धा याचा वापर करतात. वजन वाढू नये म्हणून साखरेच्या स्वादासाठी याचा वापर केला जातो. खसाकरुन उच्च उत्पन्न असलेली लोक याचा वापर करतात. पण स्वीटनरच्या वापरामुळे कोणताही फायदा होत नाही. पण यामुळे काही प्रकारच्या आजारांची जोखिम वाढू शकते.

आर्टिफिशियल स्वीटनरच्या वाढत्या धोक्यामुळे डब्लूएचओने गाइडलाइन्स जारी केले आहे. त्यात असे म्हटले आहे की, स्वीटनरचा वापर शरिरात फॅट कमी करणे किंवा साखरेमुळे होणारे नुकसान कमी करत नाही. काही लोक याचा वापर करुन टाइप-२ मधुमेह, हृदय रोगाचा धोका वाढतो. डब्लूएचओने असे म्हटले आहे की, स्वीटरनच्या मदतीने वजन कमी करण्यास ही काही फायदा होत नाही. तर शरिरात मेटाबॉलिज्मसुद्धा हळूहळू कमी करु शकतो. यामुळे काही प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.

जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटले आहे की, स्वीटनरच्या वापरामुळे हृदयासंबंधित आजार होण्याचा धोका असतो. कोणत्याही रिसर्चमध्ये हे समोर आलेले नाही की, याच्या वापरामुळे शरिरातील साखरेचा स्तर नियंत्रणात राहिल. फ्रेंच नॅशनल इंस्टीट्युट फॉर हेल्थच्या एका रिसर्चमध्ये एक गोष्ट समोर आली की, आर्टिफिशियल स्वीटनरचा वापर केल्याने कॅन्सरचा धोका सुद्धा वाढतो. रिसर्चमध्ये असे ही समोर आलेय की, जी लोक साखरेऐवजी आर्टिफिशियल स्वीटनरचे दररोज सेवन करतात त्यापैकी ३७ टक्के अधिक लोक कॅन्सरने ग्रस्त होतात. (Artificial Sweetener)

हेही वाचा- रोगांच्या पेशी नष्ट करू शकते आणि ट्यूमर तयार होण्यापासून थांबवू शकते

अशातच लोकांनी स्वीटनरचा वापर करताना सावधगिरी बाळगावी. जर शरिरात लठ्ठपणा वाढत असेल किंवा साखरेचा स्तर वाढण्याचा धोका असेल तर त्याच्यापासून दूर राहण्यासाठी तुमच्या खाण्यापिण्यात बदल केला पाहिजे. तसेच व्यायामाकडे ही लक्ष द्यावे. केवळ स्वीटनरचा वापर करण्यापासून बचाव केला जाऊ शकत नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.