Home » ‘या’ दिवशी युएफओ आणि एलियनचे आगमन….

‘या’ दिवशी युएफओ आणि एलियनचे आगमन….

by Team Gajawaja
0 comment
Alien
Share

2023 मध्ये काय होणार? परग्रहवासी पृथ्वीवर आक्रमण करणार, तिसरं महायुद्ध होणार की, मोठे भुकंप होणार अशा अनेक भविष्यवाणींनं सर्वांना हादरुन सोडलं. त्यात बल्गेरियाच्या बाबा वेंगा यांची भविष्यवाणीही सर्वत्र फिरु लागली. बाबा वेंगा यांची अनेक भाकीतं खरी ठरली आहेत, त्यामुळे 2023 हे वर्ष सर्वात त्रासदायक ठरणार असा अनेकांनी अंदाज व्यक्त केला. त्यात भरीस भर म्हणून की काय आता  वर्तमानकाळातून आपण आलो असून पृथ्वीवर लवकरच परग्रहवासी येणार असल्याचा दावा, एका व्यक्तीनं केला आहे.  एवढ्यावरच ही व्यक्ती थांबली नाही तर परग्रहवासी कधी येणार याची तारीखही त्यांनी जाहीर केली आहे.  या भविष्यवाणीची सोशल मिडीयावर चर्चा सुरु असतांनाच त्यात भर म्हणून तुर्कीच्या बुर्सा शहरातील आकाशात युएफओच्या आकारातील ढग दिसून आले, हे ढग म्हणजे आगामी संकंटाची चाहूलच आहे, लवकरच परग्रहवासी पृथ्वीवर येणार अशी चर्चा सुरु झाली. मात्र हे ढग म्हणजे लेंटिक्युलर क्लाउड आहेत.  याला शास्त्रीय आधार असून लोकांनी उगीचच वावड्या उठवू नयेत असे आवाहन हवामान शास्त्रज्ञांनी केले आहे. (Alien)  

सध्या सोशल मिडीयावर जेवढ्या चांगल्या बातम्या फिरत आहेत, त्यापेक्षाही अधिक बातम्या या घबराट निर्माण करणा-या बातम्या आहेत.  आधीच 2023 च्या सुरुवातीला हे वर्ष कितीतरी संकटांनी व्यापलेले वर्ष असेल अशी भविष्यवाणी करण्याची जणू स्पर्धाच लागली होती.  यात आता अधिक एका भविष्यवाणीची भर पडली आहे. विशेष म्हणजे ही भविष्यवाणी ज्यांनी केले आहे, त्यांनी आपण वर्तमानकाळातून आल्याचा दावा केला आहे. तसेच कधी काय होणार याची तारीखही जाहीर केली आहे. या व्यक्तीचा दावा आहे की, त्याने काळाचा प्रवास करून भविष्य पाहिले आहे.  म्हणजेच या व्यक्तीनं वर्तमानकाळाचा प्रवास केल्याचा दावा केला आहे. या व्यक्तीचा दावा आहे की, तो 2869 सालातून आला आहे.  त्याने पाहिले आहे की, 2023 मध्ये जगात अनेक भूकंप होतील. यासोबतच पृथ्वीपासून अंतराळापर्यंत एलियन्स आणि मानवांमध्ये युद्ध होणार आहे. यासोबतच समुद्रात ऐतिहासिक शोधही लागतील.  2023 च्या अखेरीस पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आपत्ती येणार आहेत. मानव आणि एलियन यांच्यात युद्ध होईल, सर्व दिशांमध्ये याचा परिणाम जाणवेल अशा इशाराही या व्यक्तींनी दिला आहे.  यापुढे त्यांनी यावर्षी 18 मार्च रोजी 8.1 रिश्टर स्केलचा भूकंप होईल. हा भूकंप अलास्कातील वासिला येथे होणार आहे. याशिवाय 25 जून रोजी पॅसिफिक महासागरात ब्लू व्हेल माशांपेक्षा मोठा जीव सापडेल, ज्याची लांबी 350 फूट असेल, असेही सांगितले आहे. त्याचवेळी, या व्यक्तीने असा दावाही केला आहे की, 31 ऑक्टोबरला एलियन्सची (Alien) एक प्रजाती पृथ्वीवर येणार आहे.   मानवापेक्षा अधिक बुद्धिमान असलेल्या या एलियन्सचे (Alien) मानवाबरोबर युद्धही होणार आहे. हे असे दावे करणारी व्यक्ती सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ शेअर करत आहे. मात्र त्याच्या फॉलोअर्सनीही आता त्याची खिल्ली उडवायला सुरु केली आहे. अशा कुठल्याही दाव्यांनी घबराट पसरवण्यापेक्षा काही चांगल्या बातम्या शेअर कराव्यात असा सल्लाच त्याला मिळत आहे.  

========

हे देखील वाचा : व्हेल माशांच्या नव्या अभ्यासातून धक्कादायक खुलासा, शेकडो वर्षांपूर्वी पृथ्वीवर पूर्वज असल्याचा दावा

========

एकीकडे या व्यक्तीच्या दाव्यांवर टिका होत असतांना तुर्कीच्या बुर्सा शहरातील रहिवाशांना संध्याकाळी आकाशात विचित्र ढग दिसले. त्यांचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले.  त्यासोबत एलियन पृथ्वीवर आले की काय या चर्चा पुन्हा सुरु झाल्या.  कारण हे ढग युएफओच्या आकाराचे होते (Alien). हे ढग नसून युएफओ आहेत अशी चर्चा सुरु झाली. एलियन (Alien) पृथ्वीवर लक्ष ढेऊन आहेत, अशी ही चर्चा होती. पण यावर लगेच शास्त्राज्ञांनी पुढे येऊन या ढगांबाबत स्पष्टीकरण दिले आहे. अशा ढगाच्या निर्मितीवर, तुर्कीच्या राज्य हवामान शास्त्रज्ञानी स्पष्टीकरण दिले आहे. ही एक दुर्मिळ घटना आहे, ज्याला लेंटिक्युलर क्लाउड म्हणून ओळखले जाते. हे  ढग त्यांच्या युएफओ सारख्या आकारासाठी ओळखले जातात. ते जमिनीपासून 2000 ते 5000 मीटर उंचीवर तयार होतात. जेव्हा आकाशातील हवा शांत आणि दमट असते, तेव्हाच हे ढग तयार होतात. फक्त हिवाळ्यातच हे ढग तयार होतात, असेही या शास्त्रज्ञांनी स्पष्ट करुन सर्व चर्चांवर पडदा टाकला आहे.  त्यामुळेच हे वर्ष कसे जाणार याची चर्चा करण्यापेक्षा या वर्षात किती चांगले उपक्रम राबवून पृथ्वीवरील वातावण सुखकारक करता येईल, याचा विचार करावा, असे आवाहनही शास्त्रज्ञांनी केले आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.