जेव्हा व्यक्ती लठ्ठपणाचा शिकार होतो तेव्हा त्याचा शरिरातील बहुतांश भागावर त्याचा परिणाम होते. पोटासह हाताच्या खालील चरबी सुद्धा वाढू लागते. अशातच संपूर्ण शरिरासह हाताची चरबी कमी करणे ही फार महत्वाचे आहे. हाताची चरबी कमी करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्पे व्यायामाचे प्रकार आणि काही टीप्स सांगणार आहोत. जेणेकरुन तुमच्या हाताखाली आलेली चरबी कमी होण्यास मदत होईल. तसेच ही चरबी कमी करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय ही पाहणार आहोत.(Arms fat loss)
-हाताखाली चरबी जमा होण्याची कारण
-अनुवांशिक
अनुवांशिकतेमुळे सुद्धा काही वेळेस हाताच्या खाली चरबी जमा होऊ लागते. असे मानले जाते की, जर घरातील एखाद्याला सुद्धा हाताच्या खाली चरबी जमा होत असल्याची समस्या असेल तर याची शक्यता अधिक वाढू शकते.
-आपल्या भोवतालची स्थिती
यामध्ये व्यक्तीचे लिंग, आजूबाजूची परिस्थिती आणि नोकरी तुम्ही कोणती करता याचा सुद्धा यामध्ये समावेश होतो. तुम्ही जर अधिकाधिक तळलेले आणि खुप खात असाल तर तुम्हाला हाताखाली चरबी जमा होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच तुमची नोकरी फक्त बसून काम करण्याची असेल तर हाताखाली चरबी वाढू शकते.
-वाढते वजन
हाताची चरबी शरिरातील वाढत्या वजनाचे कारण असू शकते. असे मानले जाते की, जेव्हा शरिराचे वजन वाढते तेव्हा अतिरिक्त फॅट हाताखाली तयार होऊ शकतो.
हे देखील वाचा- Appendix दूर करण्यासाठी काही सोप्पी योगासन
-हाताची चरबी कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावेत
-कार्डियो
हाताची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही कार्डियो करु शकता. कार्डियोमध्ये म्हणजे त्यात काही व्यायाम प्रकारांचा समावेश होतो. यामध्ये रनिंग, जॉगिंग, जम्पिंग, सायकलिंगचा समावेश होतो. तर धावणे आणि पोहण्यामुळे फॅट कमी होण्यास मदत होतो. याचा सकारात्मक परिणाम हातावरील चरबीवर होतो.
-पुशअप
हाताची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही पुशअपचा समावेश करु शकता. पुशअप मारताना संपूर्ण शरिराचे वजन हे तुमच्या हातावर येते. त्यामुळे पुशअप करताना थोडी काळजी घेत सुरुवातीला तुम्हाला हाताच्या जोरावर तुमचे शरिर खाली घेऊन जाता येईल तेवढा प्रयत्न करा. परंतु पुशअप मारताना तुमचे शरिर सरळ असू द्या.(Arms fat loss)
-वेटलिफ्टिंग
हाताची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही वेटलिफ्टिंग करु शकता. यासाठी थोडी मेहनत लागते पण त्याचे सकारात्मक परिणाम ही दिसून येतात. यामुळे तुमचे शरिर मजबूत होईलच पण चरबी ही कमी होईल.
-प्लँक
प्लँक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या दोन्ही हाताच्या जोरावर तुमचे शरिर जमिनीवरुन काही अंतरावर उचलायचे आहे. यावेळी पोट तुमचे आतमध्ये खेचण्याचा प्रयत्न करा. असे करताना श्वास घेत रहा, एका मेडिकल रिसर्चनुसार प्लँक केल्याने शरिरातील फॅट मास कमी होऊ शकते. ज्यामुळे हाताची चरबी सुद्धा कमी होईल.
हाताची चरबी कमी करण्यासाठी काय खावे?
-हाताची चरबी कमी करण्यासाठी कमी कॅलरी असणारी फळं जसे की, केळं, आंबा, अननस किंवा किव्ही फळ आणि भाज्या जसे पालक, ब्रोकली.
-लो फॅट दूध आणि डेयरी प्रोडक्टचा आपल्या आहारात समावेश करावा
-प्रोटीनयुक्त आहार जसे की, सी-फूड, लीन मीट, चिकन, अंडी, बिन्स, सोया प्रोडक्ट्स, नट्स.
-ट्रांस फॅट, कोलेस्ट्रॉल कमी असलेले पदार्थ, कमी साखर असलेले पदार्थ.