Home » Area 51 : एरिया 51 मध्ये खरोखरच परग्रही आहेत का….

Area 51 : एरिया 51 मध्ये खरोखरच परग्रही आहेत का….

by Team Gajawaja
0 comment
Area 51
Share

अमेरिकेच्या दक्षिण नेवाडा येथील एका गुप्त हवाई दलाचा तळ कायम चर्चेत असतो. लास वेगासच्या उत्तरेस सुमारे 85 मैल अंतरावर नेवाडा टेस्ट अँड ट्रेनिंग रेंजमधील एका लष्करी तळाला एरिया 51 हे नाव देण्यात आले आहे. हा सर्वच भाग कायम रहस्यमय म्हणून अमेरिका आणि जगभर ओळखला जातो. विशेषतः ज्यांना परग्रही, युएओ याबाबत उत्सुकता आहे, त्यांच्यासाठी एरिया 51 मध्ये नेमकं काय आहे, याचे कायम कुतूहल राहिले आहे. (Area 51)

या सर्व क्षेत्रात उडत्या तबकड्या म्हणजेच युएफओ आणि परग्रहींना पाहिल्याचे अनेक दाखले देण्यात येतात. मात्र अमेरिकन सरकार या लष्करी तळावर लष्करासंबंधी चाचण्या आणि विकास केंद्र चालवण्यात येत असल्याचे सांगते. जगातील सर्वात रहस्यमय ठिकाण म्हणून या एरिया 51 चा उल्लेख होतो. आता याच एरिया 51 ची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. त्याला कारण ठरले आहेत, भौतिकशास्त्रज्ञ बॉब लाझर. बॉब लाझर यांनी एरिया 51 मध्ये एका परग्रही तबकडीची दुरुस्ती केल्याचा दावा केला आहे. बॉब लाझर काही काळ एरिया 51 मध्ये कामाला होते, त्याच दरम्यान त्यांनी परग्रहींच्या यानाची दुरुस्ती केल्याचा दावा केला आहे. या त्यांच्या दाव्यामुळे खळबळ उडाली असून पुन्हा एरिया 51 गा भाग चर्चेत आला आहे. (International News)

एरिया 51 या अमेरिकन लष्करी तळाबाबत जगभर उत्सुकता आहे, ती तेथील गुढ वातावरणामुळे. या एरिया 51 वर रात्री विशिष्ट प्रकारचा उजेड दिसतो, तसेच या क्षेत्रात काही वेळा परग्रहींचा वावर असतो, अशा चर्चा अनेकवेळा झाल्या आहेत. एरिया 51 वर आधारित अनेक पुस्तके आहेत, शिवाय अनेक चित्रपटही या भागावर काढण्यात आले आहेत. त्यामधील आशय हा परग्रही हाच आहे. अमेरिकेन सरकरानं येथे एलियन्सना ओलीस ठेवले आहे आणि त्यांच्यावर संशोधन केले जाते, असा दावा अमेरिकेतील अनेक संशोधकांनी केला आहे. विशेष म्हणजे, असा दावा करणा-यांमध्ये अमेरिकन लष्करी अधिका-यांचाही समावेश आहे. याच अधिका-यांमध्ये आता बॉब लाझर या भौतिकशास्त्रज्ञाची भर पडली आहे. बॉब लाझर हे अमेरिकेतील प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आहे. त्यांनीच आता एलियन स्पेस यान दुरुस्त केल्याचा दावा केल्यामुळे खरोखरच एरिया 51 मध्ये एलियन आहेत का, असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला आहे. तसेच या भागात एलियन आहेत, तर अमेरिकन सरकार त्यांना जगापासून का लपवत आहे, असा प्रश्नही सोशल मिडियाच्या माध्यमातू विचारण्यात येत आहे. (Area 51)

बॉब लाझर यांनी दावा केला आहे की, एरिया 51 मध्ये एलियन स्पेस प्रोब तंत्रज्ञानाचा अभ्यास केला आणि अमेरिकन सरकारसाठी त्यांच्या रिव्हर्स इंजिनिअरिंगवर काम केले. बॉब लाझर 1989 मध्ये एलियन तंत्रज्ञानावर काम केले. त्याकाळी ही माहिती बाहेर देऊ नये, असे सक्त आदेश त्यांना देण्यात आले होते. आता तब्बल 36 वर्षानंतर बॉब यांनी हा दावा केला असला तरी त्यांच्या दाव्याबाबत तथ्य काय, असाही प्रश्न विचारण्यात आला. यावर बॉब यांनी परग्रहींच्या यानाचा जो फोटो दाखवला आहे, तसाच फोटो पेंटागॉनने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओंमधील एका वस्तूंबरोबर जुळत असल्यानं बॉब यांचा दावा खरा असल्याचे मानले जात आहे. (International News)

ही सर्व माहिती ऑस्कर-नामांकित मिकी राउर्के यांचा नेटफ्लिक्स चित्रपट, बॉब लाझारस: एरिया 51 अँड द फ्लाइंग सॉसर्स मध्ये दाखवण्यातआली आहे. हा चित्रपट 2019 मध्ये आला, तेव्हाही एरिया 51 ची चर्चा सुरु झाली होती. आता पुन्हा बॉब लेझर यांनी एरिया 51 च्या रहस्यावरुन पडदा दूर करण्याचे काम केले आहे. लेझर यांनी दावा केला की, परग्रहींचे अंतराळयान पारंपारिक इंजिन किंवा इंधनावर अवलंबून नव्हते. त्यांच्या अंतराळयानात गुरुत्वाकर्षण प्रणाली वापरली गेली आहे. त्यातूनच यानावर कंट्रोल ठेवला जातो. यामुळे त्यांचे अंतराळयान एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूवर त्वरित जाऊ शकते, असा दावाही लाझर यांनी केला आहे. परग्रहींच्या या अज्ञात शक्तीचाच अभ्यास करण्यात येत असल्याचे बॉब यांनी सांगितले आहे. (Area 51)

=======

Carl Tanzler Ttory : प्रेमात वेडा ‘तो’ सात वर्ष तिच्या मृतदेहासोबत झोपला !

========

या अंतराळयानाबाबत बॉब सांगतात की, या यानाचा वेग एवढा असतो की, उघड्या डोळ्यांनी ते कधीही बघता येत नाही. शिवाय कुठल्याही देशाची रडार प्रणालीही या यानाला टिपू शकत नसल्याचे बॉब यांनी सांगितले. हे यान एका गुळगुळीत धातूपासून बनलेले असून त्याला कोणत्याही बोल्ट, वेल्ड किंवा सांध्यांची आवश्यकता नव्हती. लाझरने दावा केला की, ही सामग्री मूळतः पृथ्वीवर अस्तित्वात नव्हती. त्याची बांधणी अशा प्रगत बांधकाम पद्धती दर्शवते जी मानवी संस्कृती किंवा विज्ञान आजपर्यंत साध्य करू शकलेले नाही, असेही लाझर यांनी सांगितले आहे. बॉब लेझर यांच्या या दाव्यांमुळे आता पुन्हा अमेरिकेत एरिया 51 ची चर्चा सुरु झाली आहे. (International News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.