जगभरात अशी काही ठिकाणं आहेत त्यांच्याबद्दल विविध कथा प्रचलित आहेत. मात्र त्यामागील सत्य हे कोणालाच माहिती नाही. आता जर इंटरनेटवर ही पाहिल्यास त्या ठिकाणांबद्दल आर्टिकल्स किंवा रिपोर्ट्स दिसतात जे वेगवेगळे तथ्य सांगतात. अशातच आता एरिया ५१ (Area 51) ही सुद्धा रहस्यमयी जागा आहे. त्याबद्दल विविध दावे सुद्धा केले जातात. ऐवढेच नव्हे तर त्याला एलियन्सचा अड्डा असल्याचे म्हटले जाते. तरीही येथे अद्याप रिसर्ज केला जात आहे. तर काही लोक या ठिकाणाला अमेरिकेच्या सैन्याची गुप्त जागा असे मानतात. असे मानले जाते की, येथून अमेरिकेतील गुप्त ऑपरेशन्स केले जातात. या ठिकाणाबद्दलच आपण आज अधिक जाणून घेऊयात.
कुठे आहे एरिया ५१?
ही जागा अमेरिकेतील नेवाडा येथे आहे. ज्याला एरिया ५१ असे म्हटले जाते. खासकरुन याला अमेरिकेच्या वायुसेनेचे बेस कॅम्प मानले जाते. नेवाडाच्या दक्षिण भागात आहे.
अमेरिकेच्या वायुसेनेबद्दल काय कथा आहेत?
एरिया ५१ साओठी काही दावे केले जातात. त्यानुसार अमेरिकेकडून आपल्या गुप्त हत्यारांची चाचणी केली जाते आणि आता सुद्धा सेनेकडून येथे खुप सिक्युरिटी असते. हाय सिक्युरिटी असण्यासह येथील लोक सुद्धा गुप्तपणे काम करतात. त्यामुळे आतमधील माहिती अजिबात बाहेर येत नाही. याच कारणास्तव कोणताही फोट सुद्धा पब्लिकली व्हायरल होत नाही. अशातच या संबंधित विविध कथा सुद्धा इंटरनेटवर आहेत.
असे सांगितले जाते की, अमेरिकेतील वायुसेनेने १९५५ मध्ये त्याला आपले बेस बनवले. येथे एक्सपेरिमेंटल एअरक्राफ्ट आणि हत्यारांची टेस्टिंग केली जाते. काही लोक असा दावा करतात की, येथ एलियन स्पेसक्राफ्टवर टेस्ट केले जातात. काही विश्वासनीय सोर्सच्या माध्यमातून सुद्धा अशी माहिती समोर आली की, या बेसवर टॉप सीक्रेट एअरक्राफ्टची टेस्टिंग केली जाते. त्याचसोबत हत्यारांसाठीचे अभ्यास क्षेत्र आहे आणि येथे नवे एअरक्राफ्ट तयार केले जात आहे. (Area 51)
हे देखील वाचा- रात्रीच्या रात्री रिकामे झाले गावं, नक्की काय घडले असेल?
खरंच एलियन्सचे बेस येथे आहे?
आता जवळजवळ असे ठरवले गेले आहे की, अमेरिकेच्या सेनेकडून आपले टॉप सीक्रेटचे येथे काम करतात. एक काळ असा ही होता की, हा एलियन्सचा बेस होता. या जागेसंबधित असे म्हटले गेले की, ते युएफओच्या सिद्धांतांपैकी एक आहे. याचा रोसवेल घटनेशी संबंध आहे. ही रोसवेलच्या घटनेमुळेच युएफओच्या घटना झाल्या आहेत. जवळजवळ ७० वर्ष जुने येथे काही गोष्टी मिळाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर असे सांगितले गेले की, येथे तस्करी क्रॅश झाली होती. त्यानंतर त्याचा एलियस सोबत संबंध जोडला गेला.
एरिया ५१ एलियंस सोबत का जोडला गेला आहे?
एअरबेसच्या गुप्ततेबद्दल बहुतांश अफवा आणि कटांसंबंधित हवा करण्यात आली. हे ठिकाण रोसवेल घटनेशी संबंधित आहे. जी इतिहासातील सर्वाधिक चर्चेचा विषय आणि वादग्रस्त युएफओच्या सिद्धांतांपैकी एक आहे. रोसवेलच्या घटनेला सुद्धा युफओ घटनांची जननी असे म्हटले जाते.