ऑस्कर विजेते एआर रहमान (AR Rehman) यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आपला ५६ वा वाढदिवस साजरा केला. एका हिंदी परिवारात जन्मलेल्या या म्युझिक डायरेक्टरचे त्यांच्या आई-वडिलांनी दिलीप चंद्रशेखर असे नाव ठेवले होते. मात्र नंतर असे काय झाले की, त्यांनी आपल्या धर्मासह आपल्या नावात ही बदल केला? तर याच बद्दल आपण जाणून घेऊयात.
-वारसाने मिळाले संगीत
रहमान यांना संगीत वारसाने मिळाले. त्यांचे वडिल आरके शेखर हे मल्याळम सिनेमांचे प्रसिद्ध म्युझिक अरेंजर होते. एआर रहमान हे त्यांच्यासोबत खुप वेळ म्युझिक स्टुडिओत वेळ घालवायचे. याच दरम्यान, रहमान यांनी काही वाद्यं वाजवण्यास शिकली. परंतु वडिलांना मृत्यूनंतर सर्वकाही बदलले गेले. कमी वयात त्यांना खुप काही सहन करावे लागले. घराची आर्थिक स्थिती ही बिकट होत गेली.
-या कारणास्तव बदलला धर्म
रहमान यांची ऑफिशियल बायोग्राफी ‘नोट्स ऑफ ए ड्रीम’ मधून कळते की, त्यांच्या वाईट काळात बहिणीला एक गंभीर आजार झाला. डॉक्टरांचे उपचार ही तिच्यावर काम करत नव्हते. तेव्हाच दिलीप शेखर यांची आई एका मुस्लिक फकीराला भेटली. फकीर यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या बहिणीची प्रकृती सुधारली. त्यानंतर रहमान यांचे फकीर, दरगाह आमि इस्लाम धर्माच्या प्रति आस्था अधिक वाढली गेली.
-मुस्लिम धर्माचा केला स्विकार
दिलीप यांनी तेव्हाच ठरवले की, आता खुदाच्या मार्गाने चालायचे. वर्ष १९८९ मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी धर्मपरिवर्तन केले आणि आपले नवे नाव रहमान असे ठेवले. आई सुद्धा त्यांच्या या निर्णयामुळे खुश होती. रहमान (AR Rehman) यांच्या नावामध्ये अल्लाहचा उल्लेख त्यांच्या आईला करायचा होता. त्यामुळेच आईचा मान ठेवत त्यांनी अल्लाह रख्खा रहमान असे नाव ठेवले.
-यामुळे मिळाली प्रसिद्धी
वर्ष १९९१ मध्ये रहमान यांनी म्युजिकचे रेकॉर्डिंक करण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यांना प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे मणिरत्नमच्या ‘रोजा’ मुळे. रहमान यांच्या आईला वाटत होते की, रोजाच्या क्रेडिट रोलमध्ये त्यांचे मूळ नाव असावे. त्यामुळे त्यांना अखेरच्या क्षणाला त्यांचे नाव दाखल केले. परंतु धर्माबद्दल रहमान यांची स्पष्टता होती की, तुम्ही तुमच्या मान्यता एखाद्यावल लादू शकत नाहीत.
हे देखील वाचा- मोठी बहिण स्टार आणि आईसुद्धा अभिनेत्री, तरीही डांन्सबार मध्ये काम करुन चालवले घर
-काही पुरस्कार ही मिळाले
रहमान यांना आपल्या करियरमध्ये काही हिंदी आणि नॉन-हिंदी सुपरहिट गाणी गायली. त्यावेळी त्यांना काही पुरस्करांनी ही गौरवण्यात आले. यामध्ये हॉलिवूड मधील सर्वाधिक प्रतिष्ठीत पुरस्कार ऑस्करचा मान ही मिळाला. प्रोफेशनल लाइफसह एआर रहमान आपल्या खासगी आयुष्यामुळे ही नेहमीच चर्चेत असतात.