बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार आणि ऑस्कर पुरस्कार विजेते ए. आर रहमान (A.R Rahman) यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. कारण रहमान यांची मुलगी असलेल्या खतीजाचा नुकताच निकाह संपन्न झाला आहे. खतिजाने रियासदीन शेख मोहम्मद याच्यासोबत निकाह करत आयुष्यभरासाठी साथ निभवण्याचे वचन दिले आहे. चेन्नईमध्ये झालेल्या या निकाह सोहळ्यामध्ये कुटुंबाचे जवळचे नातेवाईक सामील झाले होते. संगीतकार ए आर रहमान यांनी त्यांच्या मुलीचा लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यांनी त्यांच्या परिवारात जावयाचे स्वागत करत त्यांच्या सुखी आनंदी वैवाहिक जीवनासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. रहमान यांची पोस्ट आणि लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ए आर रहमान (A.R Rahman) यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये मुलगी खारीज आणि जावई रियासदीन शेख मोहम्मद सोफ्यावर बसलेले दिसत असून, त्यांच्या मागे रहमान, त्यांची पत्नी सायरा आणि दोन मुलं आमीन, राहिमा उभे असलेले दिसत आहे. यासोबतच त्यांच्या शेजारी एक फोटो फ्रेम देखील दिसत आहे. या फ्रेममध्ये रहमान यांच्या आईचा फोटो आहे.
ए आर रहमान (A.R Rahman) यांनी हा लग्नाचा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “हे ईश्वरा या नवीन जोडायला तुझे शुभ आशीर्वाद दे. तुमच्या शुभ आशीर्वादांसाठी आणि शुभेच्छांसाठी आधीच खूप धन्यवाद.” त्यांच्या या पोस्टवर त्यांच्या जगभरातील चाहत्यांनी लाईक्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे. यासोबतच बॉलिवूडमधील श्रेया घोषाल, हर्षदीप कौर, बोनी कपूर आदी अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या पोस्टवर कमेंट करत नवीन दाम्पत्यास आशीर्वाद दिले आहेत.
तत्पूर्वी रेहमान यांनी या लगांचे फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी त्यांचा जावई नक्की कोण आहे? असे प्रश्न विचारले आहे. तर रहमान (A.R Rahman) यांचा जावई रियासदीन शेख मोहम्मद तामिळनाडूचा असून तो पेशाने एक व्यावसायिक आणि ऑडिओ इंजिनियर आहे. मागच्या वर्षीच खतिजाने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी रियासदीन शेख मोहम्मदसोबत गुपचूप साखरपुडा केला होता. २९ डिसेंबर रोजी झालेल्या या समारंभात अतिशय मोजक्या पाहुण्यांना आमंत्रण दिले गेले होते.
========
हे देखील वाचा – सावनी रविंद्रचं मातृदिनानिमित्त ‘मॉं कोई तुझसा नहीं’ गाणं प्रदर्शित
========
ए आर रहमान यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांचा जन्म एका हिंदू परिवारात झाला, मात्र नंतर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. रहमान (A.R Rahman) हे जगभरातील संगीत विश्वासाठी खूपच मानाचे नाव समजले जाते. त्यांनी त्यांच्या अतिशय उत्तम संगीताच्या प्रतिभेचा वापर करत अतिशय सुंदर आणि सुपरहिट गाणी बनवली आहे.