दिल्लीत पुन्हा एकदा वातावरण दुषित होत असल्याचे दिसून येत आहे. वायुप्रदुषणाचा स्तर वाढला जात आहे. अशातच दिवाळीत सुद्धा याचा स्तर वाढण्याची अधिक शक्यता वाटत आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीतील AQI २६२ दाखल करण्यात आला होता. हा एक्यूआय हा खराब श्रेणीत येतो. प्रदुषणाच्या या स्तरामुळे आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात. तर जाणून घेऊयात AQI म्हणजे काय आणि तुम्ही तुमच्या शहरात तो कशा पद्धतीने पाहू शकता याबद्दलच अधिक.
AQI म्हणजे काय?
हवेतील प्रदुषणाचा स्तर मोजण्यासाठी एक्यूआय म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्सचा वापर केला जातो. या इंडेक्सच्या मोजमापाच्या आधारावरुन असे कळते की, कोणत्या ठिकाणची हवा ही किती स्वच्छ आहे. हा स्तर श्वास घेण्यासाठी किती योग्य आहे. एक्यूआयचा स्तर जेवढा अधिक तेवढाच वायुप्रदुषणाचा स्तर अधिक असतो. ऐवढेच नव्हे तर आरोग्यावर सुद्धा याचा परिणाम होतो. एक्यूआय मोजण्याच्या उद्देश हा लोक वायुप्रदुषाच्या प्रति जागरुक करणे आणि त्यांच्या आरोग्याचे संरक्षण करणे.
AQI हा ० ते ५० दरम्यान असेल तर तो उत्तम श्रेणीत असतो. तर ५१ ते १०० दरम्यान असेल तर तो संतोषजनक, १०१ ते २०० च्या दरम्यान असेल तर मध्यम असल्याचे मानले जाते. हवेची गुणवत्ता २०१ ते ३०० दरम्यान राहिल्यास तो खराब श्रेणीत येतो. तसेच ३०० ते ४०० दरम्यान अत्यंत खराब. ४०१ ते ५०० दरम्यान एक्यूआय हा गंभीर श्रेणीत येतो.
कोणत्या आधारावर मापला जातो AQI
द इंवायरमेंटल प्रोटेक्शन एजेंसी पाच मुख्य वायु प्रदूषकांच्या आधारावर एअर क्वालिटी इंडेक्स मोजला जातो.
-ग्राउंड लेव्हल ओझोन
-पार्टिकल पॉल्यूशन/पार्टिकुलेट मॅटर (PM 2.5/PM 10)
-कार्बन मोनोऑक्साइड
-सल्फर डायऑक्साइड
-नाइट्रोजन डायऑक्साइड
हे देखील वाचा- प्लॅटफॉर्म तिकिटाच्या माध्यमातून रेल्वेची किती होते कमाई?
AQI मुळे आरोग्यासाठी धोकादायक
-फुफ्फुसासंबंधित रोग जसे की, अस्थमा आणि क्रॉनिक ब्रोंकाइटिस ग्रस्त लोकांना वायु प्रदुषणाचा अधिक धोका असतो
-लहान मुले आणि वृद्धांनी वायुप्रदुषणाच्या स्थितीत घराबाहेर पडू नये
-जी लोक अधिक व्यायाम करतात किंवा बाहेर जाऊन काम करतात त्यांनी काळजी घ्यावी
-काही लोक ओजोन संबंधित अधिक सेंसिटिव्ह असतात, त्यांना वायुप्रदुषणाचा अधिक धोका उद्भवतो.
तुमच्या शहरातील एक्यूआय कसा पहाल?
वायुप्रदुषणाचा वाढता स्तर पाहता हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे की, तुमच्या शहरात वायुप्रदुषणाचा स्तर किती वाढला आहे. एखाद्या ठिकाणी तुम्ही जाणार असाल तर तेथील सुद्धा वायुप्रदुषणाचा स्तर जाणून घेऊ शकता. वायुप्रदुषण तपासून पाहण्यासाठी तुम्ही https://app.cpcbccr.com/AQI_India/ या वेबसाइटला भेट देऊ शकता.