सध्या बदलत्या जीवनशैलीसह तंत्रज्ञानात सुद्धा फार मोठे बदल दिवसागणित होत आहेत. अशातच स्मार्टफोनसह आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असे स्मार्ट वॉच सुद्धा आणले आहेत. हेल्थ अपडेट ते तुम्ही दररोज करत असलेल्या अॅक्टिव्हिटींचा त्यामध्ये रेकॉर्ड केला जातो. तर टेक कंपन्यांमधील दिग्गज स्मार्टफोन निर्माती कंपनी अॅप्पलच्या वॉचने (Apple Watch) एका महिलेचा जीव वाचवला आहे. तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. कारण अॅप्पल वॉचने जीवंत गाढलेल्या एका महिलेचा जीव वाचवला आहे. अॅप्पल वॉचच्या फॉल डिटेक्शन फिचरच्या माध्यमातून एका महिलेचा जीव बचावला गेला आहे.
४२ वर्षीय यंग सूक एन हिला जमिनीच्या पृष्ठभागापासून जवळजवळ ६० मील दूर असलेल्या एका कबरीत दफन करण्यात आले होते. ही घटना वॉशिंग्टन मधील आहे. पोलिसांद्वारे देण्यात आलेल्या या घटनेसंदर्भातील माहितीनुसार, पतीने महिलेवर चाकू हल्ला केला होता. तसेच डक्ट टेपच्या सहाय्याने तिचे तोंड बंद केले होते. त्याचवेळी तिला तफन करण्यात आले. महिलेला दफन करण्यापूर्वी तिला खुप मारहाण ही करण्यात आली होती. तिच्या गळ्याला, तोंडाला आणि पायांना ही डक्ट टेप लावून तिला पुरले होते.
खड्ड्यातून महिलेने स्वत:ला कसेबसे बाहेर काढत तिने प्रथम आपल्या अॅप्पल वॉचमध्ये (Apple Watch) ९११ क्रमांक डायल केला. त्यानंतर अॅप्पल वॉचच्या सहाय्याने डायल केलेल्या क्रमांकावरुन महिलेच्या २० वर्षीय मुलीला आपत्कालीन अलर्ट मेसेज पाठवला गेला. दरम्यान, नवऱ्याला जेव्हा थोड्यावेळाने अॅप्पल वॉचबद्दल कळले असता त्याने तो हातोड्याने फोडला. पण मेसेज मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी महिलेचा शोध घेतला आणि तिला सुखरुप बाहेर काढले.
हे देखील वाचा- ऑनलाईन शॉपिंगच्या पेड रेटिंग्ससंदर्भात सरकार उचलणार मोठे पाऊल
पोलिसांनी पंचनाम्यात असे म्हटले की, महिलेची प्रकृती गंभीर आहे. तिच्या गळ्याला, तोंडाला आणि पायांना डक्ट डेप लावली गेली होती. तिच्या हातापायांना गंभीर जखमा झाल्या आहेत. तिचे कपडे आणि केस ही खराब झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी ५३ वर्षीय चाई क्योंग याला अटक केली आहे.
खरंतर अॅप्पलचे प्रोडक्टची किंमत खुप असते. तरीही लोकांकडून त्याचा वापर केला जातो. आपण जसे पाहिले अॅप्पल वॉचचने एका महिलेचा जीव वाचवला. त्याचपद्धतीने त्या वॉचमध्ये हार्ट सेंसरच्या माध्यमातून ही बहुतांश जणांचा जीव वाचवला गेला आहे. या अशा स्मार्ट डिटेक्शन फिचर्सच्या कारणास्तवच काही वेळा लोकांचे जीव बचावले गेले आहेत.