अॅप्पलने आपल्या फार आउट इवेंटमध्ये अधिकृतरित्या आयफोन१४ (Apple iphone14) सीरिज लॉन्च केली आहे. लेटेस्ट आयफोनसह AirPods Pro 2nd Gen, Apple Watch Series 8 आणि Apple Watch Ultra सुद्धा लॉन्च केले गेले. आयफोन१४ प्रो आणि आयफोन१४ प्रो मॅक्स हे अॅप्पल ए१६ बायोनिक SoC वर काम करतात. आयफोन१४ प्रो मॅक्स मध्ये नेहमीच ऑनडिस्प्ले फिचरसह ६.७ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी डिस्प्ले आहे. इवेंटच्या दरम्यान टेक दिग्गजांनी दावा केला होता की, नवा आयफोन ए१६ बायोनिक एसओसीच्या तुलनेत ४० टक्के अधिक वेगवान आहे.
अप्रत्याशिक रुपात अमेरिकेची टेक दिग्गजने काही निवडक जुन्या आयफोन बंद करण्याची घोषणा केली आहे. प्रत्येक वर्षाप्रमाणे येणाऱ्या प्रो मॉडलने अॅप्पलच्या आयफोन लाइनअपमध्ये आउटग्रोइंग प्रो मॉडेलला बदलले आहे. म्हणजेच कंपनीने अधिकृतरित्या २०२१ पासून आयफोन १३ प्रो आणि आयफोन १३ प्रो मॅक्स बंद केले आहे.
बंद झालेत हे आयफोन
आयफोन१३ प्रो सीरिज काही मोठे अपडेट घेऊन आला होता. त्यांनी 120Hz LTPO डिस्प्ले, एक उत्तम ट्रिपल कॅमेरा सिस्टिम, उत्तम बॅटरी लाइफ आणि अन्य काही सुविधा सुद्धा दिल्या होत्या. या व्यतिरिक्त कंपनीने २०१९ पासून आयफोन११ बंद केला. यामध्ये डुअल-कॅमेरा सेटअप, ४जीबी रॅम, १८ वॅटचा चार्जिंग सपोर्ट ही दिला होता. अखेर अॅप्पलने २०२० पासून आयफोन१२ मिनी सुद्धा बंद केला आहे. हा पहिला मिनी आयफोन होता जो आधी ५जी आयफोन पैकी एक होता. तसेच लॉन्चच्यावेळी ओएलईडी डिस्प्ले असणारे सर्वाधिक उत्तम आयफोन होता.
अॅप्पलच्या आयफोन फॅमिलीतीर या फोन्सचा समावेश
iPhone SE 3rd Gen (2022)
iPhone 12
iPhone 13 Mini
iPhone 13
iPhone 14
iPhone 14 Plus
iPhone 14 Pro
iPhone 14 Pro Max
दरम्यान, आयफोन१४ (Apple iphone14) लॉन्च झाल्यानंतर त्याआधीच्या सीरिज मधील फोन हे स्वस्त झाले आहेत. भारतात आयफोन१४ ची किंमत ७९,९०० रुपये ठेवण्यात आली आहे. याच किंमतीवर गेल्या वर्षात आयफोन१३ लॉन्च करण्यात आला होता. आता आयोफन१४ लॉन्च झाल्यानंतर अॅप्पलने भारतात आयफोन१२ आणि आयफोन१३ च्या किंमती खुप कमी केल्या आहेत.
हे देखील वाचा- Instagram ला ३२ अरब रुपयांचा दंड, मुलांच्या खासगी डेटासह छेडछाड केल्याचा आरोप
येथे लक्षात ठेवण्यासारखी बाब अशी की, अॅप्पलने अधिकृतरित्या जुन्या आयफोन मॉडेलची विक्री बंद केली आहे. तरीही ते जगभरातील रिटेलर्सकडे खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहेत. मात्र जेव्हा स्टॉक संपेल तेव्हा ते मिळणार नाहीत. अखेर कमीत कमी आयफोन११ होण्यासह अॅप्पल आता केवळ ५जी इनेबल्ड स्मार्टफोनची विक्री करतो.