Apple कंपनीने दावा केला आहे की, अॅन्ड्रॉइडच्या तुलनेत ते अधिक सुरक्षित आहेत. त्याचसोबत त्यांच्या अॅपचा डेटा सुद्धा ट्रॅक करत नाहीत. मात्र एका नव्या रिपोर्ट्सनुसार विश्वास ठेवल्यास कळते की, अॅप्पल सुद्धा खोटं बोलतोय. अॅप्पलच्या काही अॅपवर असा आरोप लावण्यात आला आहे की, ते युजर्सच्या अॅक्टिव्हिटी ट्रॅक करतात. रिपोर्ट्सनुसार, अॅप्पल तुमच्या आयफोनची प्रत्येक अॅक्टिव्हिटी ट्रॅक करते. रिपोर्ट्सनुसार, अॅप्पल आयफोन, अॅप्पल म्युझिक, अॅप्पल टीवी, बुक्स आणि स्टॉकच्या मदतीने युजर्सची अॅक्टिव्हिटी ट्रॅक करते. या संबंधित शोध एका स्वतंत्र्य शोधकर्त्याने लावला आहे. त्यासाठी त्याने अॅप्पलचा डेटा वापरला. या शोधात शोधकर्त्याने असे म्हटले की, ट्रॅकिंगला बंद केल्यानंतर सुद्धा ते कशा पद्धतीने काम करतात.(Apple iPhone Track)
अॅप्पलच्या मदतीने जेव्हा युजर्स आयफोन अॅनालिटिक्सच्या सेटिंग्समध्ये जाऊन बंद करतो आणि डेटा शेअरिंग डिसेबल करतो. तेव्हा अॅप्पलचा दावा आहे की, कोणीही ते ट्रॅक करु शकत नाही. अॅप डेव्हलपर्स आणि सिक्युरिटी रिसर्चर, टॉमी मिस्क आणि टाला हज बाक्रीने म्हटले की, सेटिंग्समध्ये बदल केल्यानंतर सुद्धा अॅप्पलच्या डेटा कलेक्शनवर कोणताही प्रभाव पडत नाही. प्रायव्हेसी सेटिंग्स ऑफ केल्यानंतर सुद्धा युजर्सला तो डेटा एक्सेस करता येऊ शकतो.
हे देखील वाचा- iPhone युजर्स व्हा सावध! तुमच्या अॅप स्टोर अॅक्टिव्हिटिला Apple करु शकते ट्रॅक
या आयओएसचा उल्लेख
रिपोर्ट्स नुसार, iOS 14.6 च्या अॅप स्टोर वर असलेले अॅप प्रत्येक टॅप युजर्सला शेअऱ करत होते. हा डेटा रिक्वेस्टवर शेयर केला जात होता. अशातच रिपोर्ट्सवर दावा करण्यात आला की, आयफोन युजर्सच्या प्रत्येक टॅपची माहिती शेअर केली जाते. जसे की, ते कोणत्या प्रकारच्या अॅपचा शोध घेत आहेत किंवा त्यामध्ये काय काम करतात. ऐवढेच नव्हे तर कोणत्या प्रकारच्या जाहिराती अधिक पाहतात, ती अॅक्टिव्हिटी सुद्धा ट्रॅक केली जाते.
अॅन्ड्रॉइडच्या तुलनेत अधिक सुरक्षित अॅप्पल असल्याचे म्हटले जाते. त्याचसोबत काही रिपोर्ट्समध्ये दावा सुद्धा केला गेला आहे की, आयफोन युदर्जचा डेटा सुरक्षित राहतो आणि त्याला ट्रॅक करता येऊ शकत नाही.(Apple iPhone Track)
दरम्यान, नुकत्याच अॅप्पल आयफोन आणि आयपॅड मॉडेलसाठी iOS 16.1.1 आणि iPad 16.1.1 अपडेटवर काम करत असल्याचा रिपोर्ट समोर आला आहे. मात्र काही तक्रारींनुसार iOS 16.1 मध्ये अपडेट असले तरीही iPhone वायफाय पासून डिस्कनेक्ट होत होता. काही युजर्सने असा ही दावा केला की. त्यांचा फोन स्टँडबायवर स्टेबल होता तेव्हा त्यांचे वायफाय डिस्कनेक्ट झाले होते. या व्यतिरिक्त आपल्या आयफोनवर सर्व नेटवर्क सेटिंग्स रीसेट करण्याचा प्रयत्न केला तरीही मुश्किल होते असे म्हटले होते.