१०६ वर्षीय एपो वैंग (Apo Maria Whang) सध्या चर्चेत आहे. तिला वोग फिलिपींस मॅगझीनच्य एप्रिल अंकासाठी कवर पेजवर स्थान दिले गेले. सोशल मीडियात तिचे फोटो सध्या अधिक चर्चेत आहेत. वयाच्या १०६ व्या वर्षी सुद्धा तिच्या सौंदर्याची तारीफ सर्वत्र केली जात आहे. वैंग ही फिलिपींस मध्ये राहणारी आहे आणि पेशाने ती एक टॅटू आर्टिस्ट आहे. वैंग वोग मॅगझिनच्या कवर पेजवर स्थान मिळवणारी ती सर्वाधिक वय असलेली महिला बनली आहे. यापूर्वी २०२० मध्ये अभिनेत्री डेंचला कवर पेजवर स्थान दिले गेले होते. तिचे वय ८५ वर्ष होते. आता एपो वैंग नक्की कोण याबद्दल जाणून घेऊयात.
१ हजार जुन्या तंत्रज्ञानाचा वापर करुन काढते टॅटू
वैंगला मारिया उगेच्या नावाने सुद्धा ओळखले जाते. ती फिलिपींन्स मधील सर्वाधिक वय असेलील टॅटू आर्टिस्ट आहे. ती एक हजार वर्ष जुन्या परंपरागत टॅटू तंत्रज्ञान बटोकचा वापर करुन ते काढते. ही टॅटू काढण्याची एक खास पद्धत असून त्यात बांबूच्या लाकडाचा वापर केला जातो. याचा एक भाग पाणी आणि दुसरा कोळसाचा वापर करुन टॅटू काढला जातो.

१६ व्या वर्षात शिकली टॅटू काढणे
वैंग उत्तर मनीलाच्या एका लहान गावात वाढली आहे. ती तिच्या पिढीतील अखेरची सदस्य आहे. ती वयाच्या १६ व्या वर्षात टॅटू काढण्यास शिकली होती. आता ती बटोक तंत्रज्ञानाचा वापर करुन टॅटू काढणारी फिलिपिन्समधील प्रसिद्ध आर्टिस्ट आहे. ती कालिंगा समुदायातील आहे. द नॅशनल न्यूजच्या मते, टॅटू बनवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करणे हे काम पुरुष मंडळींचेच होते. यामुळेच त्या एकमेव परिवारातील सदस्या आहेत ज्यांनी टॅटूची ही पद्धत पुढे नेली आहे.(Apo Maria Whang)
कालिंगा समुदायाच्या कलेचा वारसा
असे मानले जाते की, अशा प्रकारचे टॅटू आर्टच्या माध्यमातून कालिंगा समुदायातील कथा, ज्ञान आणि आपल्या पूर्वजांची माहिती मिळते. त्यांनी आपल्या पूर्वजांकडून जे शिकले तेच पुढील पिढीपर्यंत पोहचवले आहे. या समुदायातील लोक असे मानतात की, टॅटू हे वाईट शक्तींपासून दूर ठेवण्यास मदत करतात. येथील लोकांची याबद्दल मान्यता सुद्धा आहे. वैंग टॅटू हिची ही कला आपली नात एलियांग आणि ग्रेस यांनी शिकले आहेत. जेणेकरुन पुढील पिढीकडे सुद्धा ती जाईल. वैंग अशी म्हणते की, मी आता सुद्धा टॅटू काढते. मात्र मी आनंदित आहे की, या कलेला पुढील पिढी पर्यंत पोहचवू शकली.
हे देखील वाचा- केरळातील ‘या’ मंदिरात स्री च्या वेशात जातात पुरुष मंडळी
ती असे सुद्धा म्हणते की, मी आजही टॅटूला या कलेले पुढे नेत आहे. मी असे तो पर्यंत करत राहणार जो पर्यंत मला नीटसे दिसणे बंद होत नाही. वैंगचा हा वारसा आता त्यांची नातवंड पुढे घेऊन जात आहे. फिलिपींन्स मध्ये येणारे टुरिस्ट तिच्याकडे जाऊन आवर्जुन टॅटू काढून घेतात.