Anxiety symptoms in children : सध्याच्या काळात लहान मुलं ते मोठ्यांपर्यंत एंग्जायटीच्या समस्येचा सामना करत आहेत. मुलांबद्दल बोलायचे झाल्यास शाळेतून घरी आल्यानंतर मुलं बहुतांशवेळ सोशल मीडिावर गेम खेळण्यामध्ये घालवतात. यामुळे फिजिकल अॅक्टिव्हिटी होत नाही. याशिवाय सध्याच्या स्पर्धात्मक जगामध्ये मुलं अभ्यासाचा अधिक ताण घेतात. यामुळे एंग्जायटीचेही शिकार होऊ शकतात. एवढेच नव्हे परीक्षेबद्दलही मुलांमध्ये तणाव वाढला जातो. पण एखाद्या गोष्टीवरुन मुलं अधिक विचार करत असेल किंवा ताण घेतल असल्यास त्याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. जाणून घेऊया मुलांमधील एंग्जायटीच्या लक्षणांबद्दल सविस्तर…
एखादे मुलं सातत्याने बैचेन राहत असेल किंवा घाबरत अथवा चिंतेत राहत असेल तर ही एंग्जायटीची लक्षणे आहेत. खरंतर, एंग्जायटीची काही कारणे असू शकतात. मुलाचे आई-वडील सातत्याने एकमेकांशी भांडण करत असतील, घरातील वातावरण उत्तम नसेल अथवा बालपणीची एखादी वाईट घटना, अभ्यास व्यवस्थितीत न करणे ही देखील काही एंग्जायटीची कारणे आहेत. काही प्रकरणांमध्ये मेंदूच्या कार्यक्षमतेत गडबड हे देखील कारण असू शकते. अशातच मुलाची मानसिक स्थिती योग्य वेळी ओखळणे आणि त्यावर उपचार करणे फार महत्वाचे आहे. जेणेकरुन मुलं डिप्रेशनमध्ये जाणार नाही.

Anxiety symptoms in children
तणाव असा करा मॅनेज
योग्य पालनपोषण करा
मुलांमधील एंग्जायटी किंवा डिप्रेशन दूर करण्यासाठी सर्वप्रथम घरातील वातावरण व्यवस्थितीत ठेवा. मुलांसोबत विचार करु बोला. याशिवाय मुलांना घरातील वादांपासून दूर ठेवा. सर्वाधिक महत्वाचे म्हणजे मुलांवर अभ्यासासाठी दबाव टाकू नका. मुलांना शिकवताना काही खास टिप्स वापरा. याव्यतिरिक्त मुलाला दररोज त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी विचारा.
=======================================================================================================
हेही वाचा :
बिघडलेल्या क्रेडिट स्कोरमध्येही मिळेल कर्ज, कामी येतील या 7 ट्रिक्स
Ice Facial : आईस फेशियल करा आणि चेहऱ्यावरचा ग्लो वाढवा, जाणून घ्या त्याचे फायदे
=======================================================================================================
योग्य लाइफस्टाइल
लाइफस्टाइल उत्तम असणे फार महत्वाचे आहे. यामुळे दररोज 7-8 तासांची झोप घ्यावी. याशिवाय हेल्दी डाएट फॉलो करण्यास सांगावे. तणाव कमी करण्यासाठी मेडिटेशन आणि आवडीचे काम मुलांना करायला सांगा. (Anxiety symptoms in children)
टाइम मॅनेजमेंट
पालकांनी मुलांमधील एंग्जायटीची समस्या दूर करण्यासाठी त्यांच्यासोबत वेळ घालवावा. याशिवाय मुलांसाठी शाळा, ट्यूशन, शिक्षण आणि खेळ अशा काही गोष्टींसाठी वेळापत्रक तयार करा.