Home » अँन्टेलिया विस्फोटक कांड आधारित लवकरच येणार वेबसीरिज

अँन्टेलिया विस्फोटक कांड आधारित लवकरच येणार वेबसीरिज

by Team Gajawaja
0 comment
Antilia House
Share

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मुंबईतील आलिशान घर अँन्टेलिया बाहेर दोन वर्षांपूर्वी विस्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. याच घटनेवर आधारित आता वेबसीरिज बनवण्यात येणार असल्याची जोरदर चर्चा सुरु झाली आहे. काही निर्मात्यांनी यावर सीरिज बनवण्याबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे. अँन्टेलिया बाहेरील या घटनेवर आधारित दोन पत्रकार संजय सिंह आणि राकेश त्रिवेदी यांनी पुस्तक लिहिले. त्याचे नाव “CIU: क्रिमिनल्स इन युनिफॉर्म” असे दिले गेले आहे. हे पुस्तक जगभरात प्रसिद्ध पब्लिशर हर्पर कॉलिंस यांनी प्रकाशित केले. दरम्यान, ही एक काल्पनिक कथा असल्याचे सांगितले जात आहे. अशातच प्रकाशकांना कायदेशीर समस्यांपासून दूर रहायचे आहे हे स्पष्ट होते. (Antilia House)

CIU च्या ऑडिओ व्हिज्युअल राइट्ससाठी करार
आता बॉम्बे स्टेंसिल नावाच्या प्रोडक्शन कंपनीने हार्पर कॉलिंससोबत पुस्तकाच्या ऑडिओ व्हिज्युअलच्या राइट्ससाठी एक करार केला आहे. त्यानुसार ते या पुस्तकावर आधारित एक क्राइम थ्रिलर वेब सीरिज बनवणार आहेत. हार्पर कॉलिंग यांनी एक प्रेस रिलीज जारी करत याबद्दल माहिती दिली आहे.

अमिताभ बच्चन, अजय देवगण स्टारर सिनेमा ‘रनवे-३४’ आणि ‘खुदा हाफिज चॅप्टर-२’ ची सहनिर्माता कंपनी बॉम्बे स्टँसिल या कंटेटसंदर्भात एक प्रॉमिनेंट ओटीटी प्लॅटफॉर्मसोबक बातचीत करत आहेत. बॉम्बे स्टँसिलचे दुष्यंत सिंहला बारोटा हाउस (२०१९), परछाई: घोस्ट स्टोरीज बाय रस्किन बॉन्ड, अभय याच्या रचनात्मक टीमचा हिस्सा असल्याचे ही ओळखले जाते. निर्माते हसनैन हुसैनी आणि दुष्यंत सिंह या वेब सीरिजसाठी एका प्रसिद्ध सिनेमा निर्मात्यांचा ही शोध घेत आहेत.

CIU ची कथा रहस्यात्मक आहे. काही ट्विस्ट आणि टर्नसह ही कथा रोमांचक आहे. या प्रोजेक्टबद्दल खुप उत्साह व्यक्त केला जात आहे. लवकरच एक प्रसिद्ध ओटीटी प्लॅफॉर्म आणि एका अनुभवी डायरेक्टर बद्दल ही घोषणा केली जाणार आहे. (Antilia House)

हे देखील वाचा- जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात दिलेल्या विधानाची सोशल मीडियात जोरदार चर्चा

२५ फेब्रुवारी २०२१ रोजी संध्याकाळी मुकेश अंबानी यांच्या आलिशान घराजवळ सापडलेल्या गाडीसह मनसुख हिरेन हत्येमुळे संपूर्ण देश हादरला गेला होता. एनआयएनला या घटनेनंतर सुद्धा खुलासा करण्यात आलेला नाही. यामध्ये अँन्टेलिया समोरील विस्फोटकांनी भरलेल्या गाडीमागे सचिन वाझे आणि दुसऱ्या अन्य आरोपींचा उद्देश काय होता? खरंच सचिन वाझे यांनी हा प्लॅन केला होता की नाही? अशा सर्व प्रश्नांनी घेरलेल्या घटनांच्या आधारावर ही वेबसीरिज असणार आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.