Home » २००० वर्षांपूर्वीच तयार झालं होतं कॉम्प्युटर !

२००० वर्षांपूर्वीच तयार झालं होतं कॉम्प्युटर !

by Team Gajawaja
0 comment
Antikythera Mechanism
Share

मी तुम्हाला विचारलं, जगातला पहिला कॉम्प्युटर कोणता? तर ज्यांना माहिती आहे, ते म्हणतील Abacus आणि पहिला कॉम्प्युटर कधी तयार झाला? असा प्रश्न विचारला तर Google करून तुम्ही लगेच सांगाल १९९१ साली. पण विसाव्या शतकाच्या सुरुवातीला काही गोताखोरांना समुद्रात एक असं यंत्र सापडलं, ज्याला आपण जगातला सर्वात जुना कॉम्प्युटर म्हणू शकतो. तो निर्माण केला गेला होता आजपासून २००० वर्षांपूर्वी. मग प्रश्न पडतो की, २००० वर्षांपूर्वी कॉम्प्युटर होते? काय आहे २००० वर्षांपूर्वीच्या कॉम्प्युटरचं रहस्य? जाणून घेऊया. (Antikythera Mechanism)

तशी गोष्टी ची सुरुवात होते २००० वर्षांपूर्वीपासून, पण आपल्यासाठी या गोष्टीची सुरुवात होते १९०१ सालापासून दक्षिण युरोपमध्ये एक देश आहे, ग्रीस. ग्रीसला एका बाजूने समुद्र लाभलेला आहे, आणि त्याच्या आजूबाजूला अनेक लहान मोठे बेट सुद्धा आहेत. त्यातलच एक बेट म्हणजे Antikythera बेट. तिथे काही गोताखोरांना १९०१ साली समुद्राच्या आत काही माणसांचे मृतदेह दिसले, पण जेव्हा ते मृतदेह जवळून पाहण्यासाठी गेले, तेव्हा कळलं की ते मृतदेह नाहीत, त्या प्राचीन मूर्त्या आहेत. या गोताखोरांना २००० वर्ष जुन्या जहाजाचे अवशेष सापडले होते. इतका जुन्या जहाजाचे अवशेष सापडल्यामुळे अनेक संशोधक आणि पुरातत्वज्ज्ञांनी याची दखल घेतली. या जहाजाच्या मलब्यातून शेकडो मुर्त्या, आभूषण वगैरे मिळली. पण एक गोष्ट अशी मिळाली होती, जिने सर्वांना आश्चर्यात टाकलं. कारण ते नक्की काय आहे हे कोणाला माहिती नव्हतं. ते एका यंत्रासारखं दिसत होतं म्हणून आणि ते Antikythera बेटा जवळ सापडलं होतं म्हणून त्याला Antikythera Mechanism असं नाव देण्यात आलं. (Social News)

हे यंत्र वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये सापडलं होतं, ज्यामध्ये ३० पितळाचे गियरव्हीलस होते जे एका लाकडी बॉक्समध्ये फिट करण्यात आले होते. ज्याला फिरवण्यासाठी हँडल सुद्धा होतं. या 2000 वर्षांपूर्वीच्या यंत्राचा शोध इतका असाधारण होता की अनेक शास्त्रज्ञांनी याला खोटं ठरवलं. कारण त्यांना विश्वासच बसत नव्हता की इतकं आधुनिक यंत्र २००० वर्षांपूर्वी बनवलं गेलं होतं. जस- जसा शास्त्रज्ञांनी त्या यंत्राचा अभ्यास केला, तसतसे ते आणखी आश्चर्यचकित होत गेले. त्यांना कळालं की हे एक साधं सुध यंत्र नसून, या यंत्राने अंतराळातील रहस्यांचा शोध लावला गेला असावा, असा विश्वास शास्त्रज्ञांचा होता. या यंत्रावर जुन्या युनानी म्हणजे ग्रीक भाषेत काही शब्द लिहिले होते. ज्याचा अभ्यास केल्यानंतर हे समजलं की त्यावर एक प्राचीन पंचांग होतं. यामध्ये पाच ग्रहांचं नाव होतं. बुध, शुक्र, मंगल, गुरु आणि शनी. २००० वर्षांपूर्वी तयार केलेल्या या यंत्रानंतर १००० वर्ष असं यंत्र कोणी तयार करू शकलं नाही, असं शास्त्रज्ञांच म्हणण होतं. म्हणूनच हे यंत्र प्राचीन कॉम्प्युटर आहे असं शास्त्रज्ञांनी म्हटलं. (Antikythera Mechanism)

======

हे देखील वाचा :  आफ्रिकेचे दोन भागात विभाजन होण्याची चिंता !

======

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी थ्रीडी कॉम्प्युटर मॉडेलिंगचा वापर करून हे डिव्हाइस कसे काम करतं हे शोधलं. संशोधकांच्या मते, हे यंत्र सूर्य, चंद्र आणि ग्रहांच्या हालचालींचा मागोवा घेतं. इतक्या वर्षांपूर्वी इतकं आधुनिक यंत्र त्यांनी कसं बनवलं असेल, हे आजून पर्यंत समजलं नाहीये. शिवाय या यंत्राचा वापर अजून कोणत्या गोष्टींसाठी केला जायचा, हे सुद्धा अजून रहस्यचं आहे. पण एवढं मात्र समोर आलं आहे की, प्राचीन लोकं खूप आधुनिक होते. Antikythera Mechanism चा वापर २०२३ मध्ये आलेल्या इंडियाना जोन्स अँड डायल ऑफ डेस्टिनी या मुवीमध्ये करण्यात आला होता. ज्यामध्ये Antikythera Mechanism ला आर्किमीडीज डायल किंवा डायल ऑफ डेस्टिनी असं नाव देण्यात आलं होतं. मूवीमध्ये हे यंत्र एक टाइम ट्रॅव्हलिंग डिवाइससारखे दाखवले गेलं होतं. आता Antikythera Mechanism हे यंत्र टाइम ट्रॅव्हल डिवाईस नसलं तरी ते २००० वर्ष टाइम ट्रॅव्हल करून आपल्या पर्यंत पोहचलं आहे. हे असं यंत्र ते २००० वर्षांपूर्वी बनवू शकत असतील तर असे अजून किती यंत्र असतील जे काळाच्या पडद्याआड हरवले गेले आणि आपल्यापर्यंत पोहचू शकले नाही. (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.