नुकताच जगभरात वेलेंटाइन वीक ते वेलेंटाइन डे साजरा केला गेला. परंतु वेलेंटाइन साजरा केल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी अँन्टी वेलेंटाइन डे ला सुरुवात होते. याच्या नावावरुनच कळते की, त्यामध्ये प्रेम, रोमांन्स अशा भावना नसणार आहेत. जसे वेलेंटाइन डे चे सात दिवसत असतात त्याचप्रमाणे अँन्टी वेलेंटाइन डे मध्ये सुद्धा काही डे असतात जे यावेळी साजरे केले जातात. (Anti Valentine Week)
कधी आणि का साजरा केला जातो अँन्टी वेलेंटाइन वीक?
अँन्टी वेलेंटाइन वीक १५ फेब्रुवारी पासून ते २१ फेब्रुवारी पर्यंत साजरा केला जातो. अँन्टी वेलेंटाइन डे असा आठवडा आहे जेथे प्रेमाची भावना नसते. यामध्ये स्लॅप डे ते ब्रेकअप डे साजरे केले जातात. याच दरम्यान, किक डे, परफ्युम डे, फ्लर्ट डे, कन्फेशन डे, मिसिंग डे चा सुद्धा समावेश आहे. दरम्यान, हा आठवडा भले ऐकण्यामध्ये विचित्र वाटेल पण वास्तवात असे काही होत नाही. काही कपल्स हा आठवडा मजा म्हणून साजरा करतात. पण २१ फेब्रुवारीला असणारा ब्रेकअप डे थोडासा उदास असू शकतो. खासकरुन अशा लोकांसाठी ज्यांचे ब्रेकअप झाले आहे.
१५ फेब्रुवारी स्लॅप डे
प्रत्येक वर्षी १५ फेब्रुवारी हा अँन्टी वेलेंटाइन वीकची सुरुवात ही स्लॅप डे पासून होते. खरंतर स्लॅप डे तुमच्या एक्स पार्टनरद्वारे दिल्या गेलेल्या तणावाला दूर करण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस तुमच्या वाईट अनुभवांना मागे ठेवून पुढे जाण्यासाठी साजरा केला जातो.
१६ फेब्रुवारी किक डे
अँन्टी वेलेंटाइन डे च्या दुसऱ्या दिवशी किक डे साजरा केला जातो. असे बोलले जाते की, या दिवशी लोक आपल्या एक्स पार्टनरच्या सर्व नकारात्मक आणि अप्रिय भावनांना आयुष्यातून दूर करण्यासाठीचा आहे.
१७ फेब्रुवारी परफ्युम डे
परफ्युम डे सुद्धा साजरा केला जातो. हा अँन्टी वेलेंटाइन डे मधील तिसरा दिवस आहे. या दिवशी प्रेम, आपल्या मनातील भावना किंवा मजा मस्ती करण्याचा दिवस आहे. या दिवशी तुम्ही तुम्हाला हवी त्या प्रकारे मौज मजा करु शकता.
१८ फेब्रुवारी फ्लर्ट डे
फ्लर्ट डे हा अँन्टी वेलेंटाइन डे मधील चौथा दिवस आहे. या दिवशी तुम्ही मैत्रीचा हात पुढे करु शकता. या दिवशी आणखी एका वेगळ्या व्यक्तीला भेटण्याची, त्याच्याशी जोडले जाण्याची उत्तम संधी आहे. याचे नाव फ्लर्ट डे जरी असल्याने तुम्ही एखाद्यासोबत फ्लर्ट करण्यास सुरु कराल. (Anti Valentine Week)
१९ फेब्रुवारी कन्फेशन डे
१९ फेब्रुवारी हा कन्फेशन डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आपल्या पार्टनरला एखादी त्याच्यापासून लपवलेली गोष्ट सांगण्याची संधी देतो. त्याचसोबत तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण त्याने यापूर्वी केलेल्या चुकीची तुमच्या समोर माफी ही मागू शकतो.
२० फेब्रुवारी मिसिंग डे
तुम्ही एखाद्यावर खुप प्रेम करत आहात आणि त्याची खुप आठवण येत असेल तर त्यावेळचा भावना व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.
हे देखील वाचा- प्रेमाचा रंग लालच का? खास आहे कारण
२१ फेब्रुवारी ब्रेकअप डे
अँन्टी वेलेंटाइन डे ब्रेकअप डे सोबत पूर्ण होतो. ब्रेक अप डे जरी असला तरीही तुम्ही काही गोष्टींकडे दुर्लक्ष करत आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग निवडला पाहिजे. तुमच्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा तुम्हाला पूर्ण करण्यासाठी खुप वेळ मिळणार आहे.
