Home » Anti Valentine Week : १५ ते २१ फेब्रुवारीदरम्यान साजरा होणाऱ्या अँटी-वॅलेंटाईन वीकची माहिती

Anti Valentine Week : १५ ते २१ फेब्रुवारीदरम्यान साजरा होणाऱ्या अँटी-वॅलेंटाईन वीकची माहिती

by Jyotsna Kulkarni
0 comment
Anti Valentine Week
Share

७ ते १३ फेब्रुवारी दरम्यान व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यात आला आणि आज १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. हा संपूर्ण आठवडा प्रेमाला समर्पित केलेला असतो. या आठवड्यात प्रत्येक दिवस प्रेमाशी संबंधित असतो. या प्रेमाच्या आठवड्यातील प्रत्येक दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करत तिला आपल्या प्रेमाची जाणीव करून दिली जाते. १४ फेब्रुवारीला संपूर्ण जगात व्हॅलेंटाइन डे साजरा झाल्यानंतर पुढचा एक आठवडा अजून एक खास आठवडा म्हणून साजरा केला जातो. ७ ते १४ हे दिवस प्रेम करणाऱ्या लोकांचे समजले जातात. या काळात प्रेमी जोडपे प्रेम व्यक्त करत छान एकमेकांसोबत वेळ घालवतात. मात्र एकट्या असणाऱ्या लोकांचे काय? जे लोकं आयुष्यात एकटे आहेत, ज्यांना अजून त्यांचा जोडीदार मिळाला नाही त्यांचे काय? (Anti Valentine Day)

व्हॅलेंटाइन वीकमध्ये हे एकटे लोकं जास्त एकटे होतात. संपूर्ण जगात प्रेमाचा बहर आलेला असताना मात्र त्यांना त्यांच्या एकटेपणासोबत हा प्रेमाचा आठवडा घालवावा लागतो. मात्र यासाठी व्हॅलेंटाइन डेनंतर साजरा होतो तो अँटी व्हॅलेंटाईन वीक. अँटी व्हॅलेंटाईन वीक हा खास सिंगल लोकांसाठी साजरा होणार आठवडा आहे. यामध्ये कपल्स ब्रेकअप डे, स्लॅप डेसारखे अनोखे डेज साजरे करतात. आज व्हॅलेंटाइन डे झाल्यानंतर उद्यापासून या अँटी व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात होत आहे. त्याच निमित्ताने आपण जाणून घेऊया या आठवड्यात साजऱ्या होणाऱ्या विविध डे बद्दल. (Todays Marathi HEadline)

स्लॅप डे
अँटी व्हॅलेंटाईन वीकमधला सर्वात पहिला दिवस म्हणजे स्लॅप डे जो १५ फेब्रुवारीला साजरा केला जातो. एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात ज्या चुकीच्या भावना असतील त्यांना स्लॅप करण्यासाठीचा म्हणजे थोबाडीत मारण्याचा हा दिवस असतो. थोबाडीत मारणे म्हणजे त्या व्यक्तीबद्दलचे वाईट विचार काढून टाकणं. तुम्ही तुमच्या स्वभावातील नकारात्मक गोष्टीही काढून टाकायला या दिवशी सुरुवात करू शकता. या दिवसाचा अर्थ कुणाला प्रत्यक्ष मारणे असा नसून, समोरच्या व्यक्तीला त्याच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी आणि नात्यातून बाहेर पडण्यासाठी आहे. (Marathi)

Anti Valentine Week

किक डे
अँटी-व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस म्हणजे किक डे. १६ फेब्रुवारी रोजी किक डे साजरा केला जातो. तुमच्या माजी प्रेयसीच्या कटू आठवणी तुमच्या आयुष्यातून काढून टाकण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जर तुम्हाला तुमच्या माजी प्रियकर/प्रेयसीच्या सर्व कटू आठवणी तुमच्या आयुष्यातून काढून टाकायच्या असतील, तर किक डे वर त्याच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीला लाथ मारण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही टॉक्सिक किंवा त्रासदायक नात्यात अडकले असाल, तर हा दिवस तुम्हाला त्या नात्यातून बाहेर पडण्याची संधी देतो. वाईट नातेसंबंध संपवून स्वतःसाठी चांगल्या आयुष्याची नवी सुरुवात करा. (Top Marathi News)

परफ्यूम डे
परफ्यूम डे १७ फेब्रुवारी रोजी येतो. हा दिवस तुम्हाला स्वतःला लाड करण्याची संधी देतो. तुमच्या जुन्या आणि वाईट आठवणी विसरून तुम्ही स्वतःचे लाड करायला हवेत. यासाठी, तुमचा आवडता परफ्यूम खरेदी करा आणि तो लावा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही या दिवशी एखाद्याला त्याचे आवडते परफ्यूम भेट देऊ शकता. परफ्यूमचा सुगंध तुमच्या आयुष्याचा नवा टप्पा ठरो. जुन्या आठवणी विसरून नव्या आशेने पुढे जाण्याचा हा दिवस आहे. (Top Trending News)

फ्लर्ट डे
जर तुम्ही सिंगल असाल किंवा नुकतेच ब्रेकअप झाले असेल, तर हा दिवस तुमच्यासाठी आहे! अँटी-व्हॅलेंटाईन वीकच्या चौथ्या दिवशी म्हणजेच १८ फेब्रुवारी रोजी लोक फ्लर्ट डे साजरा करतात. या दिवशी, तुम्ही जुन्या तुटलेल्या नात्याचे दुःख विसरून पुढे जाऊ शकता. तुम्ही एखाद्यासोबत नवीन मैत्री सुरू करू शकता. तुम्ही मजेसाठी एखाद्याशी फ्लर्ट करू शकता. पण तुम्ही जे काही कराल ते मर्यादेत करा. फ्लर्ट डे चा अर्थ असा नाही की तुम्ही कोणाचेही नुकसान करा. हा दिवस सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो. (Top Marathi News)

कन्फेक्शन डे
कन्फेक्शन डे १९ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. कबुलीजबाब दिनी, तुम्ही तुमच्या जवळच्या मित्राला किंवा जीवनसाथीला तुमच्या हृदयात लपलेल्या कोणत्याही गोष्टीची कबुली देऊ शकता. जर तुम्ही कधी अशी चूक केली असेल जी तुम्ही आतापर्यंत कोणालाही सांगितली नसेल, तर आज तुमच्या चुका कबूल करण्याचा दिवस आहे. कबुली देताना तुम्ही माफी देखील मागू शकता. भविष्यात अशी चूक पुन्हा न करण्याचे वचन तुम्ही देऊ शकता. या दिवशी तुम्ही तुमच्या मनातील भावना एखाद्या खास व्यक्तीसमोर व्यक्त करू शकता. जर कुणाशी मनापासून माफी मागायची असेल किंवा काही सांगायचे राहिले असेल, तर ही त्यासाठीची योग्य वेळ आहे. (Latest Marathi HEadline)

मिसिंग डे
मिसिंग डे २० फेब्रुवारी रोजी येतो. जर तुम्हाला कोणाची आठवण येत असेल तर आजचा दिवस आहे जेव्हा तुम्ही त्याला/तिला हे सांगू शकता. ही तुमच्या आयुष्यातील कोणतीही व्यक्ती असू शकते. तुमचा बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, भावंडं, आईवडील, जोडीदार, ज्यांना तुम्ही खूप मिस करत आहात, त्यांना आजच फोन करून त्यांच्याशी बोलू शकता. या दिवशी तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता. जर तुम्ही कोणाला मनापासून आठवत असाल, तर या दिवशी तुम्ही तुमच्या भावना त्या व्यक्तीसमोर व्यक्त करू शकता. आपल्या जवळच्या लोकांशी पुन्हा संपर्क साधण्यासाठी हा दिवस उत्तम आहे. (Top Stories)

=========

Valentine Day : जगातील ‘या’ देशांमध्ये अतिशय हटके पद्धतीने साजरा होता व्हॅलेंटाइन डे

Valentine Day : कोण होते संत व्हॅलेंटाईन? ज्यांच्या स्मरणार्थ साजरा होतो हा प्रेमदिन

========-

ब्रेकअप डे
अँटी-व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस म्हणजे ब्रेकअप डे. जर तुम्ही अशा नात्यात असाल जे तुम्हाला आनंद देत नाही, तर हा दिवस त्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी आहे. स्वतःसाठी योग्य निर्णय घ्या आणि पुढे जा. जर तुमचे नाते विषारी झाले असेल तर आजचा दिवस त्याच्याशी संबंध तोडण्याचा आहे. ज्या नात्यात तुम्हाला आनंद वाटत नाही अशा नात्यात राहू नये. जर तुमचा जोडीदार तुम्हाला फसवत असेल, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून तुमच्याशी वाद घालत असेल, तुम्हाला या नात्यात गुदमरल्यासारखे वाटत असेल, तर तुम्ही लगेच ब्रेकअप करू शकता. (Social NEws)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.