कर्नाटक सरकार राज्यात हलाल मांसवर बंदी घालण्यासाठी अँन्टी हलाल बिल घेऊन येण्याची तयारी करत आहे. नुकत्याच कर्नाटक विधानसभेत सुरु झालेल्या हिवाळी सत्रात हे बिल सादर केले जाऊ शकते. बसवराज बोम्मई सरकारने हा प्रस्ताव तयार केला आङे. दरम्यान, या हलाल मांस विरोधातील बिल सादर करताना भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद होण्याची शक्यता सुद्धा आहे. हे बिल घेऊन येण्याचा विचार भाजप आमदार रविकुमार यांनी केला आहे. तर जाणून घेऊयात अँन्टी हलाल बिल नक्की काय आहे, ते आणल्याने काय होईल आणि ते जगात कुठे-कुठे लागू आहे. (Anti-Halal Bill)
अँन्टी हलाल बिल नक्की काय आहे?
बिला बद्दल समजून घेण्यापूर्वी आप हलाल मांस संदर्भात जाणून घेऊयात. हलाल हा एक अरबी शब्द आहे. हलाल मीट म्हणजे ज्या जनावाराचे मांस तुम्ही खाता त्याला एका झटक्यात नव्हे तर मरताना हळूहळू हलाल केले जाते. इस्लामच्या मते, जनावरांना हलाल करुनच मुस्लिम बांधव मीट खाऊ शकतात.
याच वर्षात एप्रिल महिन्यात हलाल मीट बद्दल कर्नाटकात वाद झाला होता. हिंदू संघटनांनी उगाडी उत्सवावेळी हलाल मीटाचा बहिष्कार करण्याचे अपील केले होते. ही पहिलच वेळ नव्हती जेव्हा राज्यात हलाल मीटवर वाद झाला होता. यापूर्वी सुद्धा काही वेळा हलाल विरुद्ध झटका मीटवर वाद झाला होता. आता कर्नाटकातील भाजप सरकार नवे विधेयक पारित करुन हलाल मीटासाठी कायदेशीर मान्यता देऊ पाहत आहे.
नव्या बिलाच्या मदतीने राज्यात हलाल मांसवर बंदी घातली जाऊ शकते. ऐवढेच नव्हे तर या बिलाच्या मदतीने फूड सेफ्टी अॅन्ड सँन्डर्ड अॅक्ट २००६ मध्ये बदल केला जाईल आणि एखाद्या प्रायव्हेट संस्थेला फूड सर्टिफिकेट देण्यावर बंदी घातली जाईल. बिलाच्या माध्यमातून सर्टिफिकेशनवर ही बंदी घातली जाईल. जर हा कायदा आल्यास तर कर्नाटक हा देशातील पहिला असे राज्य असेल. दरम्यान, देशातील काही राज्यात हलाल मीट बंदीसाठी वाद तर झाला पण कायदा बनवण्यात आलेला नाही. (Anti-Halal Bill)
असा देश जेथे हलाल मीटवर आहे बंदी
कर्नाटकात भले हलाल मीटवर बंदी घालण्यासंदर्भात तयारी केली जात आहे. मात्र जगातील असे काही देश आहेत जेथे त्यासाठी बंदी घातली गेली आङे. २०२१ मध्ये हलाल मीटवर बंदी घालण्यासाठी बेल्जियममध्ये नवा नियम लागू करण्यात आला. त्यामध्ये असे म्हटले गेले आहे की, जनावरांना मारण्यापूर्वी अनिर्यरुपात बेशुद्ध कराले जेणेकरुन हलाल मीटवर आपोआप बंदी घातली जाईल. बेल्जियम व्यतिरिक्त नीदरलँनन्ड, जर्मनी, स्पेन, साइप्रस, ऑस्ट्रिया आणि ग्रीसमध्ये सुद्धा असे कायदे झाले आहेत.
हे देखील वाचा- पाकिस्तानातील ‘हे’ विचित्र नियम तुम्हाला माहितेय का?
जगभरात हलाल मीटाचा एक मोठा व्यवसाय आहे. बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, जगातीलक काही नॉन-मुस्लिम देश हलाल मीटचे सर्वाधिक मोठे एक्सपोर्टर आहेत. यामध्ये ब्राजील, ऑस्ट्रेलिया, भारत, फ्रांन्स आणि चीनचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक पुढे ब्राजील आहे. हा देश मुस्लिम देशांना ५.१९ बिलियन डॉलर किंमतीचे हलाल मीट पुरवतो.