Home » China : चीनच्या आणखी एका जैविक शस्त्राची जगभर दहशत !

China : चीनच्या आणखी एका जैविक शस्त्राची जगभर दहशत !

by Team Gajawaja
0 comment
China
Share

चीनच्या दोन जैव शास्त्रज्ञांना अमेरिकेमध्ये एफबीआयने अटक केली आहे. यातील एक शास्त्रज्ञ अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातील प्रयोगशाळेत काम करणा-या मैत्रिणीला भेटायला आला होता. त्याच्या सामानाची तपासणी केल्यावर त्याच्याकडे काही छोटी रोपं आढळून आली. आपण ज्या मैत्रिणीला भेटायला आलो आहोत, तिला ही रोपं आवडतात असं कारण त्यांनी तपास अधिका-यांना सांगितलं. मात्र या रोपांची तपासणी केली आणि सुरक्षा रक्षकांचे धाबेच दणाणले. (China)

याबाबत अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेला माहिती देण्यात आली. एफबीआयचे प्रमुख अधिकारी आवश्यक साधनसामुग्रीसह विमानतळावर दाखल झाले. या रोपांची पुन्हा तपासणी करण्यात आली आणि ही रोपं तमाम अमेरिकेच्या शेतीला उद्धवस्त करणा-या घातक बुरशीनी भरलेली असल्याचे उघड झाले. फ्युझेरियम ग्रॅमिनेरम नावाच्या या बुरशीला अमेरिकेत आणणा-या जुन्योंग लिऊ नावाच्या तरुणाला अटक झाली, आणि त्यापाठोपाठ झालेल्या खुलाशांनी अमेरिकेसह संपूर्ण जगाला हादरुन सोडले आहे. मेड इन चायना लेबलखाली येणा-या प्रत्येक वस्तूपासून किती काळजी घ्यायला हवी, याचा पाठही याच घटनेतून मिळाला आहे. याप्रकरणी एफबीआयचे प्रमुख काश पटेल यांनी लगेच मिशिगन विद्यापीठातून युनकिंग जियान नावाच्या चिनी तरुणीला अटक केली. (International News)

लिऊ आणि जियान हे दोघंही जैव शास्त्रज्ञ असल्याचे उघड झाले. दोघंही चिनच्या कम्युनिष्ठ सरकारचे कट्टर समर्थक असून त्यांना चीन सरकार मोठं अनुदान देत असल्याचेही उघड झाले. या दोघांच्या आडून चीन मोठ्या जैविक अस्त्राचा वापर अमेरिकेवर करणार असल्याचा खुलासा झाला आहे. कोरोनाचा विषाणूही चीनमधील वुहान लॅबमधून मुद्दामहून पसरवला गेल्याचा आरोप अनेकवेळा करण्यात आला आहे. आता पुन्हा फ्युझेरियम ग्रॅमिनेरम बुरशीद्वारे अमेरिका आणि जगभरातील शेतपीक नष्ट कऱण्याचा डाव चीन आखत असल्याचे एफबीआयचे म्हणणे आहे. (China)

चीननं अमेरिकेत पाठवलेल्या एका जैव शस्त्राला पकडण्यात आले. फ्युझेरियम ग्रॅमिनेरम नावाची ही बुरशी तमाम शेतपिकांचा नाश कऱण्यासाठी तयार कऱण्यात आली आहे. ही घातक बुरशी चीनच्या लॅबमध्ये तयार कऱण्यात आली असून चीनमध्ये अशाच प्रकारची अनेक घातक जैव शस्त्रे तयार करण्यात येत असल्याची माहिती एफबीआय प्रमुख काश पटेल यांनी दिली आहे. आता अशी बुरशी किंवा जैव शस्त्र अन्य कुठे पाठवले गेले आहेत, याचा तपास होत आहे. मात्र या सर्वांतून पुन्हा एकदा चीनची लबाडी उघड झाली आहे. जगावर सत्ता मिळवण्यासाठी चीन कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतो, याचेच हे एक उदाहरण आहे. एफबीआयच्या मते चीनमध्ये अशा अनेक लॅब आहेत. या लॅबमध्ये घातक जैव शस्त्रे तयार होत आहेत. याबाबत गेल्या वर्षी अमेरिकन गुप्तचर संस्थांनी एक अहवाल जाहीर केला होता. त्यात चीन, अमेरिकन प्रयोगशाळांमधून अनुवांशिक माहिती, म्हणजेच जीन संशोधनाशी संबंधित माहिती चोरत असल्याचे सांगण्यात आले होते. या अहवालानंतर चीन संशोधनात सहभागी असलेल्या चिनी जीनोमिक्स कंपन्यांवर अमेरिकेत बंदी घालण्यात आली. (International News)

या घटनेला दीड वर्ष होत असतांनाच फ्युझेरियम ग्रॅमिनेरम नावाची घातक बुरशी अमेरिकेत आयात करण्यात आली. ही बुरशी ज्या चिनी युवकांनी आणली तो जैव शास्त्रज्ञ असल्याचे तपासांती उघड झाले. हा तरुण सीसीपी म्हणजे चिनी कम्युनिस्ट पक्षाचा पाठिराखाही आहे. या तपासात चीन सरकारने ही बुरशी अमेरिकेत घेऊन जाण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिल्याचे उघड झाले. मिशिनग विद्यापीठातील ज्या तरुणीकडे ही बुरशी देण्यात येणार होती, ती सुद्धा जैव शास्त्रज्ञ आहे. चिंतेची गोष्ट म्हणजे, ही तरुणी मिशिगन विद्यापीठाच्या प्रमुख प्रयोगशाळेत कार्यरत होती. या दोघांना अटक झाल्यावर एफबीआय मोठा जैव हल्ल्याचा कट उघड केल्याचा दावा करीत आहे. कारण फ्युझेरियम ग्रॅमिनेरम नावाची बुरशी पिकांमध्ये ‘हेड ब्लाइट’ नावाचा रोग पसरवते, यातून गहू, तांदूळ, बार्ली आणि मका यासारख्या प्रमुख पिकांचा नाश होतो. एफबीआयनं हा सर्व गुन्हा कृषी दहशतवादाच्या नावाखाली नोंद केला आहे. अमेरिकेमध्ये गहू, मका आणि बार्ली यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. (China)

ही सर्व पिके एकाच वेळी नष्ट झाली तर अमेरिकेत अन्न संकट आणि दुष्काळ निर्माण होऊ शकतो. याच उद्देशानं चीनच्या प्रयोगशाळांमध्ये तयार झालेली बुरशी अमेरिकेत पाठवण्यात आल्याचे एफबीआयचे म्हणणे आहे. त्यासोबत एफबीआयनं उपस्थित केलेल्या शंकेमुळे अवघ्या जगातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कोरोना जसा जगभर पसरला तशीच फ्युझेरियम ग्रॅमिनेरम ही बुरशी चीनने जगभर पाठवल्याचा संशय आहे. असे झाले तर जगभरातील शेतपीकावर मोठे संकट येऊ घातल्याचा संशयही अमेरिकन गुप्तचर संघटनांना आहे. (International News)

===============

हे देखील वाचा : Fusarium graminearum : बापरे एका बुरशीमुळे अमेरिकेची झोप उडाली !

Donald Trump : ट्रम्प यांचे दुटप्पी धोरण पुन्हा उघड !

===============

आत्तापर्यंत 17 देशांनी जैविक शस्त्रे निर्माण केल्याची माहिती आहे. त्यात चीन आणि रशिया या देशांमध्ये जैविक शस्त्रे मोठ्याप्रमाणात असल्याचे उघड झाले आहे. यावर जागतिक स्तरावर चिंता व्यक्त झाल्यावर चीननं 1997 मध्ये जैविक शस्त्रे निर्मितीच्या प्रयोगशाळा बंद केल्याचे सांगितले होते. मात्र वुहानमधील एक प्रयोगशाळेतून कोरोना विषाणूचा प्रचार झाल्यावर चीननं जगाला खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट झाले. आता यापुढे जाऊन चीननं फ्युझेरियम ग्रॅमिनेरम नावाची घातक बुरशी तयार केली आहे. ही बुरशी चीननं आता कुठल्या कुठल्या देशांना पाठवली आहे, याचा शोध सुरु झाला आहे. (China)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.