मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय सिने निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांचा (Mahesh Manjrekar) आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘महाराष्ट्र दिनी’ त्यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. ‘वीर दौडले सात’ (Veer Daudale Saat) असे या सिनेमाचे नाव आहे. तसेच या सिनेमाचे पोस्टर वो सात (wo saat) असे म्हणत हिंदीतही प्रदर्शित करण्यात आले आहे. हा सिनेमा हिंदी आणि मराठी अशा दोन भाषेत प्रदर्शित होणार आहे.
महेश मांजरेकरांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे एक पोस्टरही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या पोस्टरवर ‘वीर दौडले सात’ या चित्रपटाचे नाव पाहायला मिळत आहे. “इतिहासात अजरामर झालेली छत्रपती शिवरायांच्या एकनिष्ठ शूरवीरांची बलिदान गाथा, मोठ्या पडद्यावर साकारणार, न भूतो न भविष्यती असा डोळे दिपवणारा रणसंग्राम, मराठीतली आजवरची सर्वाधिक बजेटची महाकलाकृती…वीर दौडले सात, दिवाळी २०२३”, असे त्यांनी यात म्हटले आहे.
====
हे देखील वाचा: आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘उनाड’ चित्रपटाची झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड
====
‘वीर दौडले सात’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा महेश मांजरेकर सांभाळणार आहेत. हा सिनेमा येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे लेखन पराग कुलकर्णी यांनी केले आहे. तर वसिम करेशी या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची गाथा सर्वत्र पोहोचणार आहे.
====
हे देखील वाचा: ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाची घोषणा महाराष्ट्र दिनी, अंकुश चौधरी झळकणार मुख्य भूमिकेत
====
कोल्हापूर जिल्ह्याचा अविभाज्य भाग म्हणून गडहिंग्लजला ओळखले जाते. याच भागाच्या उपविभागातील नेसरी हे गाव महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील राज्याचे शेवटचे टोक. नेसरी खिंडीत छत्रपती शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा शिलेदारांनी आत्म बलिदान देत इतिहास अजरामर केला होता. याच सर्व लढाईवर हा चित्रपट साकारला जाणार आहे.