अन्नाला आपल्याकडे देवाचा दर्जा दिला जातो, म्हणूनच आपण कधीही अन्नाचा अपमान करत नाही. अन्नाची देवता म्हणून आपण अन्नपूर्णा देवीची पूजा करतो. अन्नपूर्णा देवीच्या आशीर्वाद ज्या घरावर असतो तिथे कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि त्या घरातून कधीही कोणी उपाशी जात नाही. याच अन्नपूर्णा देवीची जयंती आपल्याकडे साजरी केली जाते. दरवर्षी अन्नपूर्णा जयंती ही मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. यंदा ही अन्नपूर्णा जयंती ४ डिसेंबर २०२५ गुरुवार रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी देवी अन्नपूर्णा यांची पूजा केली जाते, अन्नपूर्णा देवी ही अन्न आणि समृद्धीची देवी मानली जाते. (Annapurna Jayanti)
एकदा पृथ्वीवर अन्नाची कमतरता होती आणि लोक उपाशी राहू लागले. हताश होऊन लोकांनी ब्रह्मा, विष्णूची प्रार्थना केली. यानंतर ब्रह्मा आणि विष्णूने शिवाला योगनिद्रातून जागे केले आणि संपूर्ण समस्येची जाणीव करून दिली. समस्येचे निराकरण करण्यासाठी, शिवाने स्वतः पृथ्वीचे निरीक्षण केले. त्यानंतर माता पार्वती अन्नपूर्णेचे रूप घेऊन पृथ्वीवर अवतरली. आणि संपूर्ण लोकांचा उद्धार केला. हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस होता त्यामुळे या दिवसाला अन्नपूर्णा जयंती साजरी करण्यात येते. (Marathi News)
पौराणिक कथेनुसार, या दिवशी माता पार्वतीने अन्नपूर्णेचे रूप धारण केले होते. म्हणूनच या दिवशी देवी अन्नपूर्णाची पूजा केल्याने घरात धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही असे मानले जाते. अन्नपूर्णा देवीच्या पूजेसोबतच या दिवशी स्वयंपाक घरात दिवे लावण्याची देखील परंपरा आहे. अन्नपूर्णा देवीची पूजा करताना तुमचे स्वयंपाकघर स्वच्छ ठेवावे आणि स्वयंपाकघराचीही पूजा करावी. कारण अन्नपूर्णा देवीचा वास आपल्या स्वयंपाक घरात असतो. जर अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात दिवे ठेवल्यास याचे अनेक सकारात्मक फायदे मिळू शकतात. (Todays Marathi HEadline)

अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. मान्यतेनुसार, पिठाचा दिवा लावणे सर्वात शुद्ध मानले जाते. पिठाचा दिवा लावल्याने माता अन्नपूर्णा प्रसन्न होते आणि माणसाला सौभाग्य प्राप्त होते. याशिवाय जर तुम्हाला वारंवार आर्थिक समस्या येत असतील तर तुम्ही पिठाचा दिवा सतत लावू शकता. हे फायदेशीर ठरू शकते. हा दिवा लावल्याने माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद व्यक्तीवर राहतो. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाक घरात चौमुखी दिवा लावल्याने देखील विशेष लाभ होतो. (Top Marathi News)
अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी चौमुखी दिवा लावल्याने अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते. दिवा पवित्रतेचे प्रतीक आहे आणि तो स्वयंपाकघर पवित्र बनवतो. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी उत्तर किंवा पूर्व दिशेला चौमुखी दिवा लावणे शुभ मानले जाते. या उपायामुळे व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचा वास असतो. म्हणूनच स्वयंपाकघर स्वच्छ आणि शुद्ध ठेवावे. दिवा लावल्याने स्वयंपाकघरात पवित्रता आणि सकारात्मक उर्जा संचारते. दिवा हा साजूक तुपाचा असावा आणि दिवा लावताना अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राण वल्लभे। ज्ञान वैराग्य सिद्ध्य भिक्षां देहि च पार्वति।। ऊँ ह्रीं नमो भगवति माहेश्वर्य अन्नपूर्णे स्वाहा। कैलासाचलकन्दरालयकरी गौरी उमाशङ्करी कौमारी निगमार्थगोचरकरी ओङ्कारबीजाक्षरी।
मोक्षद्वारकपाटपाटनकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी।। या मंत्राचा जप करावा. (Latest Marathi Headline)
=======
Temple : मंदिरांवर डौलाने फडकणाऱ्या ध्वजाचे महत्त्व काय आहे?
=======
देवी अन्नपूर्णा स्वयंपाकघरात राहते त्यामुळे आपल्या स्वयंपाकघरात देवी अन्नपूर्णाचे चित्र किंवा फोटो लावा त्या फोटोसमोर रोज नैवेद्य दाखवा. आशीर्वाद मिळवण्यासाठी हा सर्वांत मोठा उपाय आहे. त्यामुळे स्वयंपाकघर स्वच्छ आणि शुद्ध करायला शिका. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरातील भांडी साफ केल्यानंतरच झोपा. रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरात कधीही रिकामी भांडी ठेवू नये, यामुळे घरातील आशीर्वाद दूर होतात. (Top Trending News)
देवी अन्नपूर्णेचा फोटो स्वयंपाकघरात आगीच्या दिशेला म्हणजेच आग्नेय दिशेला लावणे उत्तम मानले जाते. अग्नी म्हणजेच अग्नीद्वारेच अन्न शिजवले जाते, अशा स्थितीत देवी अन्नपूर्णेचे चित्र अग्नीच्या कोपऱ्यात ठेवल्याने सुख, सौभाग्य आणि समृद्धी प्राप्त होते. जर तुमच्या घराचे देव्हारा ईशान्य कोपऱ्यात नसेल तर रोज स्वच्छ करून तुपाचा दिवा लावा, यामुळे घरात लक्ष्मीचा वास होईल याची खात्री होईल. (Social News)
(टीप – येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. कोणतेही उपाय तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्या)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
