प्रत्येक जनावरांमध्ये काहीतरी वेगळेपण असते. मात्र लहान मुलांना नेहमीच प्रश्न पडतो की, काही जनावरांना शेपटी का असते? खरंतर कुत्रे किंवा मांजरी आपली जेव्हा शेपटी हलवतात तेव्हा ते आनंदात असतात असे कळते. पण या व्यतिरिक्त त्याचा काय उपयोग होतो ते कळत नाही. अखेर प्राण्यांना शेपटी का असते आणि त्याबद्दल विज्ञान काय सांगते हेच आपण आज जाणून घेऊयात. (Animals Tails)
कोट्यावधी वर्षापासून आहे जनावरांना शेपटी
वैज्ञानिकांनी जीवाश्माच्या अभ्यासात असे पाहिले की, जनावरांना कोट्यावधी वर्षापासून शेपटी आहे. त्यावेळी सुरुवातीला मशांना लहान शेपटी असायची. जी त्यांना पोहण्यासाठी मदत करायची आणि शिकार होण्यापासून बचाव करायची. मात्र जसा जसा जीवांचा विकास क्रम पुढे चालत गेला जमीनीवरील जनावरांच्या शेपटीत बदल होऊ लागला.

प्रत्येक जनावरांसाठी उपयोगी
जनावरांमध्ये सरपटणारे प्राणी असोकिंवा किडे, पक्षी असो सर्वांना असलेल्या शेपटीचा वापर हा बहुद्देशीय असतो. आजचे प्राणी आपल्या शेपटीचा वापर संतुलन, संचार ते आपल्या साथीदाराला शोधण्यासाठी करतात. वैज्ञानिकांचे असे मानणे आहे की, डायनासॉर सुद्धा आपल्या शेपटीचा स्वत: उपयोग करुन शरिराचे संतुलन कायम ठेवायचे.
वैज्ञानिकांचे असे मानणे आहे की, टी रेक्ससह डायनासॉर हे आपल्या शेपटीचा वापर संतुलनासाठी करायचे. त्यांचे डोक आणि शरिर हे वजनाने अधिक असायचे आणि ते दोन पायांनी चालायचे. परंतु याच शेपटीच्या सहाय्याने ते वेगाने धावायचे आणि आपली शिकार पकडायचे. अशाच प्रकारे कांगारु सुद्धा आपल्या शेपटीचा वापर संतुलनासाठी करतात. या व्यतिरिक्त माकडं आणि मांजरी सुद्धा आपल्या शेपटीच्या सहाय्याने एका फांदीवरुन दुसऱ्या फांदीवर अगदी सहज जाऊ शकतात. काही वेळेस त्यांना त्यांचा हाताचा सुद्धा वापर करावा लागतो. (Animals Tails)
हे देखील वाचा- वाघाच्या अंगावर काळे पट्टे का असतात?
संरक्षणासाठी करतात वापर
काही जनावरे आपल्या शेपटीचा वापर हा संरक्षासाठी करतात. तसेच एखादी शिकार करण्यासाठी सुद्धा त्याचा ते वापर करतात. काही किड्यांना सुद्धा शेपटी असते जी त्यांना अंडी देण्यास मदत करते. जसे की,गाय, म्हैस, घोडे सारख्या जनावरांना शेपटीच्या अखेरीस केस असतात. जे त्यांच्या शरिरावरील कीडे हकवण्यासाठी मदत करते.
साथीदाराला आकर्षित करण्यासाठी
पक्षी आपल्या शेपटीचा वापर करुन शरिराचे संतुलन राखत हवेत उड्डाण करतात. त्याचसोबत आपल्या साथीदाराला सुद्धा आकर्षित करण्यासाठी त्याचा खास प्रकारे वापर करतात. मोर जसा आपला पिसारा फुलवून साथीदाराला आकर्षित करण्यासाठी नाचतो त्याचप्रमाणे अन्य पक्षी ही आपल्या शेपटीचा वापर या कामासाठी सुद्धा करताना दिसून येतात.