भारतातील नावाजलेले उद्योजक असलेल्या अनिल अंबानींवरील संकटाचे ढग काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. आधी अनिल हे कर्जबाजारी झाले. त्यानंतर त्यांनी कंपन्यांवरील कर्ज फेडले आणि आता कुठे अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपन्या पुन्हा पूर्वपदावर परतत होत्या, मात्र त्यातच मधेच माशी शिंकली आणि एसबीआयने अनिल अंबानींना ‘फ्रॉड’ घोषित केले. यानंतर काही दिवसांनीच सक्तवसुली संचालनालयाने अनिल अंबानींशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापे टाकले. (ANil AMbani News)
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती असलेल्या अनिल अंबानी यांना ED ने मोठा दणका दिला आहे. अनिल यांच्या दिल्ली आणि मुंबईसह ३५ पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारीची कारवाई केली आहे. अनिल अंबानी यांच्या कार्यालयांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. गुरुवारी दिनांक २४ जुलै ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाच्या टीमने उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कार्यालयांवर छापेमारी केली आहे. ईडीने पीएमएलए अंतर्गत ही कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे. (Marathi News)
दरम्यान अनिल अंबानींच्या निवासस्थानी जरी ही छापेमारी करण्यात आली नसली तरी, दिल्ली आणि मुंबईतील ईडी पथकांनी त्यांच्या समूहाच्या काही कंपन्यांशी संबंधित जागेवर भेट दिली. ही चौकशी आरएजीए कंपन्यांनी केलेल्या कथित मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. यावेळी हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. ED ची ही छापेमारीची ही कारवाई प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग एक्ट अंतर्गत होत आहे. (Todays Marathi HEadline)
या कारवाईत अनिल अंबानी यांच्याशी संबंधित ५० कंपन्या आणि २५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या ठिकाणी ही शोधमोहिम सुरु आहे. या ऑपरेशनमध्ये ED ला CBI, SEBI, नॅशनल हाऊसिंग बँक, नॅशनल फायनेंशियल रिपोर्टिंग अथॉरिटी आणि बँक ऑफ बडोदा यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. एवढेच नाही, तर अनिल अंबानी यांच्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही यामध्ये चौकशी केली जात आहे. (Marathi Trending News)
हा टाकण्यात आलेला छापा येस बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात आहे. एकेकाळी देशातील सर्वात श्रीमंत कंपन्या म्हणून ओळख असलेल्या अंबानी यांच्या अनेक कंपन्या दिवाळखोर म्हणून गोष्ट झाल्या असून काही विकल्या गेल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने त्यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि त्यांना फसवे म्हणून घोषित केले आहे. (Marathi Top NEws)
सीबीआयने नोंदवलेल्या दोन एफआयआरनंतर ईडीने ही छापेमारीची कारवाई केली आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीच्या तपासात त्यांना असे आढळले आहे की येस बँकेने २०१७ ते २०१९ दरम्यान सुमारे ३,००० कोटी रुपयांचे कर्ज अनिल अंबानींच्या कंपन्यांना दिले होते. मात्र हे कर्ज शेल कंपन्या आणि ग्रुपच्या इतर कंपन्यांना देण्यात आली होती आणि नंतर तेथून ती रक्कम दुसरीकडे पाठवण्यात आल्याचा एडीला संशय आहे. ज्यात लाचखोरी आणि मोठ्या प्रक्रियात्मक त्रुटी असल्याचे पुरावे आहेत. ५० हून अधिक कंपन्या आणि २५ व्यक्तींची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. (Marathi Latest NEws)
=========
हे देखील वाचा : Health Care : ब्रम्ह मुहूर्तावर उठण्याचे आरोग्यदायी फायदे, मनं आणि तनं राहिल शांत
=========
येस बँकेच्या मंजुरी प्रक्रियेत देखील अनेक गंभीर त्रुटी दिसून आल्या आहेत. जसे की, जुने क्रेडिट दस्तऐवज, योग्य तपासणीचा अभाव, कमकुवत आर्थिक परिस्थिती असलेल्या कंपन्यांना आणि सामान्य संचालकांना दिलेली कर्जाची रक्कम आदी. त्याचवेळी कर्जाच्या अटींचे उल्लंघन, खात्यांचे सदाहरितीकरण आणि कर्ज मंजुरीच्या दिवशी किंवा त्यापूर्वी त्याच दिवशी कर्जवाटप झाल्याची उदाहरणे देखील यात दिसली आहेत. (Top Stories)
सेबीने या प्रकरणी RHFL अर्थात Reliance Home Finance Limited बद्दल महत्वाची माहिती ED सोबत शेअर केली आहे. SEBI च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, २०१७-१८ मध्ये RHFL ने ३,७४२.६० कोटी रुपये कॉर्पोरेट लोन दिले होते. २०१८-१९ मध्ये हीच रक्कम वाढून ८,६७०.८० कोटी रुपये झाली. त्यामुळे आता पुन्हा एकदा अनिल अंबानी मोठ्या अडचणीत सापडतात का, हे येणारा काळच दाखवेल. (Social Updates)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics