युद्ध असा एक शब्द आहे जो ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर बॉम्ब-हल्ला, रक्तपात, गोळ्यांचा आवाज, तोफांचा आवाज असे चित्र उभे राहते. तर जगात असा एखादा व्यक्ती असेल ज्याला युद्ध आवडते. मात्र जर काही हुकूमशाह किंवा बादशाह सोडले तर आपल्याला वाटत नाही कोणाला युद्ध आवडते. भले तुम्हाला युद्ध नकोसे वाटते. मात्र त्याच्या कथा, इतिहास नेहमीच लोकांच्या लक्षात असतो. अशातच जगात एक ही एक युद्ध झाले जे अवघे २२८० सेकंद चालले. हे ऐकून तुम्ही थोडे हैराण व्हाल असं कसं? युद्ध म्हटले की, काही ना काहीतरी होते किंवा ते काही वेळेस दीर्घकाळ चालते. पण हे युद्ध ऐवढा कमी वेळ का चालले? त्याचबद्दल आपण आज अधिक जाणून घेऊयात.जगातील सर्वाधिक लहान युद्ध म्हणजे जे केवळ ३८ मिनिटे म्हणजेच २२८० सेकंद चालले. हे युद्ध इतिहासाह Anglo-Zanzibar War च्या रुपात ओळखले जाते. पण हे युद्ध झालेच का होते? त्यामागील नक्की काय कारण होते?
का सुरु झाले होते अँग्लो-जांजीबार युद्ध?
खरंतर १८९० मध्ये ब्रिटेन आणि जर्मनी दरम्यान Helioland-Zanzobar Treaty नावाचा तह झाला. या तहाअंतर्गत दोन्ही देशांच्या पूर्व अफ्रिकेच्या परिसरांवर आपले वर्चस्व ठेवण्यासाठी काही विशेष क्षेत्र दिले गेले होते. हॅलिगोलँन्ड-जांजीबार तहाअंतर्गत जांजीबारला इंग्रजांकडे सोपावले. जे एक द्वीप होते. तर याच्याजवळ असलेली मुख्य भूमी तंजानियाच्या जवळचे क्षेत्र जर्मनला दिले गेले. या अंतर्गत जांजीबारला ब्रिटिश साम्राज्यचा हिस्सा बनवले.
ब्रिटिश साम्राज्याचा हिस्सा बनवल्यानंतर इंग्रजांनी या परिसरावर शासन करण्यासाठी जांजीबारचा पाचवा सुल्तान हममद बिन थुवैनीला निवडले. सर्वकाही ठीक आणि शांतीपूर्ण पद्धतीने सुरु होते. तेव्हाच ऑगस्ट १८९६ मध्ये सुल्तानचा मृत्यू झाला. तर सुल्तानच्या मृत्यूनंतर काही तासातच थुवैनीचा भाऊ खालिद बिन बरगशने जांजीबारवर दावा करत गादी सांभाळली. त्याने असे करण्यापूर्वी इंग्रजांनांसोबत बातचीत ही केली नव्हती.
दुसऱ्या बाजूला इंग्रजांना हे आवडले नव्हते की त्यांच्या परवानगीशिवाय एखाद्याने गादीवर बसलंय. हेच कारण होते की, जांजीबार मध्ये तैनात ब्रिटिश राजकिय आणि बासिल केव नावाच्या सेना प्रमुखांनी खालिदला गादी सोडण्यास सांगितली. मात्र खालिदने युद्ध करण्याचे ठरविले होते. त्याने हत्यारे, सैनिक आणि शाही जहाजाच्या माध्यमातून आपल्याला किल्ल्याला सुरक्षित केले. तसेच ब्रिटेनने सुद्धा आता युद्धाची तयारी केली होती.(Anglo-zanzibar war)
हे देखील वाचा- हिटलरसोबत मिळून हजारो लोकांना केले ठार, वयाच्या ९७ व्या वर्षी मिळाली आरोपीला शिक्षा
फक्त ३८ मिनिटांत का संपले युद्ध?
ब्रिटेनने आपल्या सैनिकांना एकत्रित केले आणि नंतर युद्धाला सुरुवात केली.एका बाजूला ब्रिटेन सैन्य होते तर दुसऱ्या बाजूला जांजीबारचे सैन्य. ब्रिटिश जहाजांनी जांजीबारच्या किल्ल्यावर हल्ला केला. फक्त दोन मिनिटांच्या आतमध्येच खालिदचे तोफ-गोळे आणि हत्यारांचे मोठे नुकसान झाले. तर किल्ल्याला लाकडापासून बनवण्यात आले होते. ज्यामध्ये आग लागली आणि त्यामुळे तो हळूहळू जमिनदोस्त झाला.