Home » Angarki Chaturthi : २०२६ सालातील पहिलीच अंगारकी संकष्टी, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

Angarki Chaturthi : २०२६ सालातील पहिलीच अंगारकी संकष्टी, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Angarki Chaturthi
Share

२०२६ या नवीन इंग्रजी वर्षाची सुरुवात झाली आहे. यंदाच्या नवीन वर्षाची सुरुवात खूपच शुभ आणि धार्मिक होणार आहे. कारण २०२६ सुरु झाल्यानंतर लगेच अंगारकी चतुर्थीचा योग जुळून आला आहे. यंदा २०२६ वर्षातली पहिली अंगारकी चतुर्थी ६ जानेवारी मंगळवार रोजी येत आहे. प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थी येत असते पण अंगारकी संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व दिले जाते. जेव्हा कृष्ण पक्षातील चतुर्थी मंगळवारी म्हणजे गणपतीच्या वाराच्या दिवशी येते त्याला ‘अंगारकी’ असे म्हणतात. ज्यांना नियमीतपणे संकष्ट चतुर्थीचे व्रत करता येत नाही, ते अंगारकी चतुर्थीचा उपवास आणि व्रत आवर्जून करतात. (Angarki Chaturthi 2026)

मंगळवार हा गणरायासाठी समर्पीत असून त्यादिवशी येणाऱ्या संकष्टीचे व्रत केले तर गणपतीच्या पूजेत मंगळाचा प्रभाव वाढतो अशी मान्यता आहे. जानेवारी महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. मंगळवारी ही चतुर्थी आल्यामुळे तिला अंगारकी संकष्टी असे म्हटले जाते. या दिवशी तीन शुभ योग तयार होत आहे. यावेळी भद्रा ४६ मिनिटांसाठी असणार आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी हे व्रत पाळले जाणार आहे. या दिवशी गणपती बाप्पाला तिलकूट अर्पण केले जाईल. म्हणूनच, या तिथीला तिलकूट चतुर्थी आणि तिलचौथ असेही म्हणतात. याला माघ संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात. (Marathi)

पंचांगानुसार, पौष कृष्ण चतुर्थी तिथी ६ जानेवारी २०२६, मंगळवारी सकाळी ०८:०१ वाजता सुरू होईल आणि ७ जानेवारी रोजी सकाळी ०६:५२ वाजता समाप्त होईल. संकष्टी चतुर्थीच्या व्रतात चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी तिथी असणे आवश्यक असते त्यामुळे चतुर्थीला उदय तिथी न बघता चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी तिथी आहे का बघितले जाते. ७ जानेवारी रोजी चंद्रोदयाच्या वेळी पंचमी तिथी असेल, तर ६ जानेवारी रोजी चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी तिथी असणार आहे. त्यामुळे पौष महिन्यातील अंगारकी संकष्टीचे व्रत आणि पूजन ६ जानेवारी रोजीच केले जाईल. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय रात्री ०८.५४ वाजता असणार आहे. (Marathi News)

Angarki Chaturthi

६ जानेवारी रोजी संकष्टीच्या दिवशी 3 शुभ योग जुळून येत आहेत. सर्वार्थ सिद्धी योग सकाळी ०७:१५ ते दुपारी १२:१७ पर्यंत असेल. प्रीति योग पहाटेपासून रात्री ०८:२१ पर्यंत आहे आणि त्यानंतर आयुष्मान योग सुरू होईल. या दिवशी अश्लेषा नक्षत्र दुपारी १२:१७ पर्यंत असून त्यानंतर मघा नक्षत्र असेल. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा करण्यासाठी मुहूर्त सकाळी ०९.५१ ते दुपारी ०१.४५ या वेळेत विघ्नहर्ता भगवान गणेशाची पूजा करू शकता. चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी ०५.२६ ते ०६.२१ पर्यंत राहील. यावेळी अभिजित मुहूर्त दुपारी १२.०६ ते १२.४८ पर्यंत असेल. त्या दिवसाचा राहुकाळ दुपारी ०३.०३ ते ०४.२१ पर्यंत आहे. राहुकाल दरम्यान कोणतेही शुभ कार्य करू नका. (Latest Marathi News)

अंगारकी संकष्टी चतुर्थी महत्व
‘गणेश पुराण’ आणि ‘स्मृती कौस्तुभ’ या धार्मिक ग्रंथांमध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थीचे महत्त्व आणि विधी सांगितले आहेत. आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी आणि गणेशाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गणेशभक्तांमध्ये या दिवसाचे खूप महत्त्व आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान गणेश हे बुद्धीचे सर्वोच्च प्राणी आणि सर्व अडथळे दूर करणारे मानले जातात. अशा प्रकारे श्रीगणेशाची उपासना केल्याने लोकांच्या जीवनातील अडथळे दूर होण्यास आणि समस्या दूर होण्यास मदत होईल. अंगारकी चतुर्थी सहा महिन्यांतून एकदा येते आणि मोठ्या उत्साहाने आणि समर्पणाने साजरी केली जाते. या अंगारकी चतुर्थीचे व्रत करणाऱ्याला वर्षभर संकष्टी चतुर्थीचे लाभ मिळतात, असे मानले जाते. (Top Marathi Headline)

अंगारकी संकष्टी चतुर्थी पूजा विधी
अंगारकी चतुर्थी व्रत करणाऱ्यांनी ब्रह्म मुहूर्तामध्ये स्नान करावे, गणेश मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घ्यावे. यानंतर ‘ॐ गं गणपतये नम:’ मंत्राचा जप करत श्री गणेशाची प्रार्थना करा. एका चौरंगावर स्वच्छ लाल रंगाचं वस्त्र अंथरुण त्यावर गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवा, यावर गंगाजल शिंपडून संपूर्ण स्थान पवित्र करा, यानंतर फुलांच्या मदतीने गणपतीला जल अर्पण करा, नंतर लाल रंगांचं फूल, दुर्वा, जान्हवं, पानाचा विडा, लवंग, इलायची आणि गुळ, खोबरं ठेवा. त्यानंतर नारळ आणि प्रसादात मोदक अर्पण करा. गणपतीला दक्षिणा अर्पण करून २१ मोदकांचा नैवेद्य दाखवा. सर्व सामग्री अर्पण केल्यावर धूप, दिवा आणि उदबत्तीने गणपतीची विधीत पूजा, आरती करा. (Social Updates)

अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत कथा
अंगारकी चतुर्थी संदर्भात गणेश पुराणातील उपासना खंडातील ६० व्या अध्यायात एक कथा दिलेली आहे. या कथेनुसार, भारद्वाज महर्षी यांच्या सल्ल्यानुसार सूर्यदेवाचा पुत्र सवन याची पृथ्वी देवीने सात वर्षे देखभाल केली. त्यानंतर पुत्र सवनला ती महर्षींकडे घेऊन गेली. महर्षींनी आनंदित होऊन सवनचा स्वीकार केला. त्याचा उपनयन सोहळा करून, त्याला वेद आणि शास्त्रात पारंगत केले. महर्षींनी सवनला गणपती मंत्राची दीक्षा दिली आणि गणपतीची उपासना करण्यास सांगितले. (Todays Marathi Headline)

Angarki Chaturthi

सवनने गंगेच्या काठावर जाऊन श्रीगणेशाचे ध्यान केले. हजारो वर्षे अन्नपाणी न घेता मंत्रांचा जप केला. सवनची कठोर तपस्या पाहून माघ कृष्ण चतुर्थीला, जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा गणरायाने आठ हातांच्या रूपात सवनला दर्शन दिले. तो दिवस अंगारकी संकष्ट चतुर्थीचा होता. विविध शस्त्रांनी सजलेले, हजार सूर्यांपेक्षा अधिक तेजस्वी असं गणपतीचं रूप पाहून सवन गणपती बाप्पा समोर नतमस्तक झाला. त्याने गणरायाची भरभरून स्तुती केली. गणपतीने सवनला वरदान मागण्यास सांगितले. (Top Marathi News)

त्यावेळी स्वर्गातील देवतांसह अमृत पिण्याची परवानगी द्यावी आणि तिन्ही लोकांमध्ये त्याचे नाव “मंगल” म्हणून प्रसिद्ध व्हावे अशी विनंती सवनने केली. गणरायाने स्मित हास्य करत सवनची इच्छा पूर्ण केली तसेच त्याचे नाव “अंगारकी” ठेवले आणि घोषित केले की ही चतुर्थी “अंगारकी चतुर्थी” म्हणून ओळखली जाईल आणि जो कोणी अंगारकी चतुर्थीचे व्रत करेल त्याला प्रत्येक कामात यश मिळेल. तुम्ही जर अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले तर २१ संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे होईल असे सांगितले जाते. (Latest Marathi Headline)

गणरायाकडून वरदान प्राप्त झाल्यानंतर सवन “मंगल” म्हणून ओळखला जावू लागला. त्याने एक भव्य मंदिर बांधले आणि गणपतीची दहा हातांची मूर्ती स्थापित केली. त्याचे नामकरण “मंगलमूर्ती” असे केले. श्रीगणेशाच्या या रूपाची जो कोणी पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात. पृथ्वीपुत्राने अंगारकी चतुर्थीचे व्रत पाळले आणि परिणामी स्वर्ग आणि शाश्वत आनंदाची प्राप्ती त्याला झाली, म्हणून अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत महत्त्वाचे मानले जाते. (Top Stories)

अंगारकी चतुर्थीला काय करावे?
चतुर्थीला चंद्रोदय, चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले गेले आहे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये. संकष्टीच्या दिवशी गणपतीला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी. अंगारकी चतुर्थीला गणपती पूजन शक्य नसल्यास निदान गणरायाला एक दुर्वा अवश्य वाहावी. मनोभावे गणपतीचे नामस्मरण करावे. असे केल्याने पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होऊ शकते. तसेच गणपती अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे. आवर्तन करणे शक्य नसल्यास एकदा पठण करावे. गणपती अथर्वशीर्ष येत नसल्यास मनोभावे श्रवण करावे. अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा, असे सांगितले जाते. (Top Trending News)

========

Astrology : १ जानेवारीला ‘हे’ सोपे उपाय करून करा देवी लक्ष्मीचे स्वागत

New Year : कोणत्या धर्मामध्ये नवीन वर्षाची सुरुवात कधी होते?

========

अंगारकी चतुर्थीला पूर्ण दिवस उपवास करावा. फलाहार, पाणी, दूध किंवा फळांचा रस घ्यावा. व्रतानुसार सर्व नियमांचे पालन करावे. तसेच या दिवशी गरजू लोकांना धन आणि धान्य दान करावं, गायीला अन्न किंवा हिरवा चारा खायला द्यावा. शक्य असेल तर एखाद्या गोशाळेला देणगी द्यावी. सायंकाळी चंद्रोदयापूर्वी श्री गणपतीचे पुन्हा एकदा पूजन करुन संकष्टी व्रत कथेचे वाचन करावे. सायंकाळी पूजेवळी श्री गणेशाला चंदनाचं गंध लावावे आणि मोदक किंवा मोतीचूर लाडूंचा नैवद्य दाखवावा. चंद्रोदय झाल्यानंतर अंगारकी चतुर्थी व्रत सोडावे. (Top Stories)

हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ मजबूत होतो, असे जाणकार सांगतात. हनुमानाचीही पूजा फलदायी अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीसोबतच श्री हनुमानाची पूजा केल्यास ती विशेष फलदायी मानली जाते. या दिवशी व्यक्तीने शेंदूरचा टिळा लावल्यास कुंडलीतल्या मंगळ ग्रहाचा दोष दूर होतो. अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीची मनोभावे पूजा केल्यास संबंधित व्यक्तीच्या जीवनातली सर्व विघ्नं, संकटं दूर होतात आणि त्याला सुख-समृद्धी प्राप्त होते. (social News)

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. आम्ही याबद्दल कोणताही दावा करत नाही.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.