रेसलिंगच्या जगात असा एक दानव होता जो रिंगमध्ये उतरल्यानंतर विरोधातील कुस्तीपटू त्याच्यापासून बचाव करण्यासाठी मदत मागायचा. तो असा ही एक कुस्तीपटू होता जो सातत्याने १५ वर्ष जिंकत राहिला. ऐवढेच नव्हे तर त्याने भल्या भल्या कुस्तीपटूंना ही हरवले. तो असा कुस्तीपटू होता, ज्याची लांबी ७ फूट ४ इंच होती आणि वजन २५० किलो. या विशालकाय कुस्तीपटूचे फोटो पाहिल्यानंतर तर कोणीही त्याच्या समोर जाण्यास तयार होणार नाही. (Andre the Gaint)
आंद्रे द जायंट असे त्याचे नाव असून त्याचा जन्म १९४३ मध्ये एका शेतकऱ्याच्या घरात झाला होता. मात्र आजाराच्या कारणास्तव त्याच्या शरिराचा बांधा विस्तारला गेला होता. खरंतर प्रत्येक मनुष्याच्या शरिरात एक पिट्युरी ग्लँन्ड असते ज्यामधून निघणारे हार्मोन्स हे मानवी शरिराचा कणा असतात. कालांतराने या ग्रंथी हार्मोन्स तयार करणे बंद करतात आणि त्यामुळे व्यक्तिचा शारिरीक विकास थांबतो. मात्र आंद्रे सोबत असे झाले नव्हते.
आपल्या उंच बांध्यामुळे आंद्रे द जायंटने शेती सोडून रेसलिंगच्या जगात पाऊल ठेवले. रिंगमध्ये पाऊल ठेवताच त्याने सातत्याने १५ वर्ष पराभवाऐवजी विजयच मिळवला. मात्र त्याचे रिंगमधील कारनामे तेथे तेवढ्यपुर्तीच चर्चेत नव्हे तर बारमध्ये ही त्याची चर्चा केली जायची. आंद्रेला ‘ग्रेस्टेट ड्रंकर ऑन अर्थ’ असे म्हटले जायचे. त्याच्याबद्दलचे असे काही किस्से आहेत ते ऐकून सर्वजण हैराण व्हायचे. खरंतर आंद्रेच्या नावावर एकाच वेळी अधिक दारु पिण्याचा अधिकृत रेकॉर्ड सुद्धा आहे.
आंद्रे द जायंट याच्याबद्दल असे सांगितले जाते की, त्याने एका बारमध्ये १५६ बियर म्हणजेच ७३ लीटर दारु एकाच वेळी प्यायला होता. असे करणारा तो जगातील पहिला व्यक्ती होता. दरम्यान, ऐवढी दारु प्यायल्यानंतर तो बेशुद्ध झाला होता. आंद्रेने एका सामान्य व्यक्तीच्या क्षमतेपेक्षा ५५ पट अधिक दारु प्यायला होता.(Andre the Gaint)
हे देखील वाचा- पेले Vs माराडोना, कोण आहे फुटबॉलचा GOAT?
विशालकाय अंगकाठीमुळे आंद्रे द जायंटचे वजन ३०० किलोपेक्षा अधिक झाले होते. रेसलिंगच्या जगात १९१ फाइट लढणारा आंद्रे याचा १९९३ मध्ये वयाच्या ४० व्या वर्षी पॅरिस मधील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला. त्याने ९७३ मध्ये WWE मध्ये आपला डेब्यू केला आणि १५ वर्ष रेसलिंगच्या जगात विजयाचा पताका फडकवला होता. १५ वर्ष सात्यानने जिंकल्यानंतर डब्लूडब्लूई मधील प्रसिद्ध हल्क होगनने रैसलमेनिय-३ मध्ये आंद्रेचा पराक्रम मोडला आणि रिंग मध्ये त्याला पराभूत केले.