Home » Dowry Custom : आणि म्हणून भारतात हुंडा प्रथा सुरू झाली!

Dowry Custom : आणि म्हणून भारतात हुंडा प्रथा सुरू झाली!

by Team Gajawaja
0 comment
Dowry Custom
Share

राजस्थान (Rajasthan) मधल्या एका लग्नाचा हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यात मुलीकडच्या मंडळींंनी एकूण १५ करोड ६५ लाखांचा हुंडा दिला आणि राजस्थानमधला सध्याचा हा सर्वात मोठा हुंडा म्हणून गाजावाजा झाला. या वरून एक गोष्ट तर नक्कीच कळेल की, भारतात अजूनही हुंडा प्रकार सुरू आहे. बरेचदा अशीही प्रकरणं समोर आली आहेत की, भरपूर हुंडा घेऊन सुद्धा लग्नानंतर सुनेचा छळ, मारहाण आणि अगदी सासरच्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या प्रकरणं समोर आली आहेत. असंच काहीसं प्रकरण १६ मे ला पुण्यातल्या भुकूम गावात घडलं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हीचा हुंड्यामुळे सासरचे मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. या सासरच्यांच्या वाढत्या जाचाला कंटाळून १६ मे ला तिने गळफास लावून स्वतःचं आयुष्य संपवलं. राजेंद्र हगवणे यांच्या फॅमिलीने वैष्णवीच्या वडिलांकडून हुंडा म्हणून ५१ तोळे सोनं, फॉर्च्यूनर कार, चांदीची भांडी आणि इतर बऱ्याच गोष्टी घेतल्या. तरीसुद्धा लग्नानंतर सासरचे तिला मारहाण करायचे, मानसिक छळ करायचे. तिच्या चारित्र्यावर संशय सुद्धा घेतला. (Dowry Custom)

बरेचदा ऐपत नसताना सुद्धा मुलीकडचे हुंडा देतात तरी अशी हुंडाबळीची प्रकरणं समोर येतात. भारतात हुंडा प्रथा (Dowry Custom) ही प्राचीन काळापासून चालत आलेली असली तरी १९६१ पासून तो बेकायदेशीर गुन्हा मानला गेला. आजच्या व्हिडिओ माध्यमातून आपण या हुंडा प्रकार कधीपासून सुरू झाला आणि हुंडाबळींंच्या प्रकरणाबद्दल डिटेल्डमध्ये जाणून घेणार आहोत.

Dowry Custom

हुंडा प्रथेचा (Dowry Custom) पहिला उल्लेख सापडतो तो प्राचीन काळात, म्हणजे इ.स.पूर्व १५०० ते ५०० मध्ये. तेव्हा लग्नात मुलीसाठी सोन्याचे दागिने आणि काही भांडी कन्यादान म्हणून दिली जायची. ज्याला वरदक्षिणा असं म्हणायचे. त्या काळात स्त्रियांना स्वतंत्र उत्तपन्नाचं साधन नव्हत, म्हणून मग माहेरच्यांकडून जी संपत्ति दिली जायची ती तिच्या सुरक्षेसाठी दिली जायची, आपल्या इच्छेने दिली जायची आणि ती नवरा आनंदाने स्वीकार करायचा. ही पुढे जाऊन प्रथा बनली. पण जसा काल बदलत गेला, तशी ही प्रथासुद्धा बदलत गेली. (Latest Marathi News)

मध्ययुगात जर पाहिलं तर म्हणजे साधारण इ.स.पूर्व ५०० ते इ.स १२०० मध्ये भारताची सामाजिक रचनाच बदलली. हा काळ म्हणजे राजे महाराजांचा काळ. या काळात लग्न म्हणजे प्रेम, कुटुंब या पुरतं मर्यादित नव्हतं तर ते राजकारण आणि आर्थिक युतीचं साधन बनलं. तेव्हा व्हायचं असं की, हुंड्यामुळे दोन राजे परिवारांमध्ये मैत्री व्हायची, ज्याचा फायदा म्हणजे त्याची पावर वाढायची. तेव्हा तर हुंडा म्हणून सोन्याचांदीचे दागिने, हत्ती, घोडे आणि अक्षरशः गावं दिली जायची. याचा प्रॉब्लेम असा झाला की, तेव्हा सामाजिक दबाव वाढत गेला. म्हणजे ज्यांच्याकडे जास्त संपत्ति, त्याला मोठाच हुंडा द्यावा लागायचा. जर असं नाही झालं तर, त्यांची नाचक्की व्हायची. दुसरी गोष्ट म्हणजे या काळात स्त्रियांना तितकं सामाजिक स्थान नव्हतं. ज्याच्यामुळे हुंडा म्हणजे काय तर ती वधूची किंमत असाच प्रकार तयार झाला. पुढे ही प्रथा बरेच शतकं सुरू राहिलं ते अगदी २०व्या शतकापर्यंत. नंतर हुंडा प्रथेला इतकी डिमांड वाढली की, १९५० च्या आसपास या हुंड्यामुळे बरेच मुलींकडचे कर्जबाजारी झाले आणि फक्त इतकंच नाही तर, सासरी त्या मुलींचा हुंड्यामुळे छळ सुरू झाला. त्यांना मारहाण केली जात होती. (Political News)

१९६१ ला भारत सरकारने हुंडा प्रतिबंधक कायदा (Dowry Prohibition Act, 1961) आणला. ज्याच्यात हुंडा देणे किंवा हुंडा घेणे बेकायदेशीर मानलं गेलं आणि त्यावर पूर्णपणे बंदी घातली. असं असून सुद्धा अगदी आताही छुप्या पद्धतीने हुंडा घेतला जातो आणि तो सोशल प्रेशरच्या दबावाखाली दिलाही जातो. मग याचा परिणाम काय होतो तर, हुंडाबळी वाढते. वैष्णवी हगवणे हे याचंच एक प्रकरण आणि सध्या भारतात ही गंभीर समस्या होऊन बसलीय. हुंड्याची मागणी पूर्ण नाही झाली की, तिचा छळ केला जातो, मारहाण केली जाते, त्यांना मारलं सुद्धा जातं किंवा त्या सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करतात.(Dowry Custom)

================

हे देखील वाचा : Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणेच्या सासऱ्याला आणि दिराला पोलिसांकडून अटक

=================

अशी प्रकरणं शहरात जरी कमी दिसत असली तरी गावात जास्त प्रमाणात दिसून येतात. NCRB च्या डेटानुसार २०२२ मध्ये या हुंडाबळींच्या ६४५० प्रकरणांची नोंद झाली. म्हणजे जर याची सरासरी काढली तर दिवसाला १८-२० महिलांचा मृत्यू फक्त हुंड्यामुळे झाला.

२०१०-२०१५ या काळात दरवर्षी ८००० ते ८५०० हुंडाबळी प्रकरणं नोंदवली गेली. २०१६ ते २०२० मध्ये यात किंचित घट झाली. पण तरीही जवळपास ७००० -७५०० प्रकरणं नोंदवली गेली. पण तज्ञांचं असं मत आहे की, प्रत्यक्ष प्रकरणांची संख्या नोंदवलेल्या संख्येपेक्षा जास्त असू शकते, कारण अनेकदा कौटुंबिक किंवा सामाजिक दबावामुळे प्रकरणे दडपली जातात.(Dowry Custom)

वैष्णवी हगवणेचं (Vaishnavi Hagwane) भयंकर प्रकरण आज समोर तर आलंच. पण अशा बऱ्याच गंभीर घटना घडत असतात. त्यातली बरीच प्रकरणं नोंदवलीच जात नाहीत किंवा हुंड्यामुळे झालेल्या आत्महत्या दाखवल्याच जात नाहीत.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.