मिस्रमध्ये पुरातत्व वाद्यांनी शेकडो वर्षांपूर्वींच्या अवशेषांचा शोध लावला आहे. ज्याची चर्चा सध्या सर्वत्र केली जात आहे. पुरातत्ववाद्यांनी पुर्वोत्तर मिस्र मधील एका महलाखालील घड्ड्यात पुरलेले जवळजवळ एक डझन कापलेले मानवी हात सापडले आहे. जेव्हापासून हे तथ्य समोर आले आहे तेव्हापासून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. लोक असा विचार करत आहेत की, अखेर ऐवढ्या वर्षांपूर्वी अशा कोणत्या प्रकारच्या घटना घडल्या असतील त्यामागचा असा उद्देश होता.(Ancient Egypt Mystery)
एक्सप्रेस युकेच्या एका रिपोर्टनुसार हे कापलेले हात मिस्र मधील प्राचीन शहर अवारिस मध्ये इमारतीच्या खोदकामादरम्यान सापडले आहेत. जवळजवल ६०० वर्षानंतर या कापलेल्या हातांबद्दलचे सत्य समोर आले तेव्हा लोक याबद्दल विविध कथा निर्माण करत आहेत. ही कथा अवारिसच्या १५व्या राजवंशाचा शासक हिक्सोसच्या शासनकालातील आहे. जो जी तेव्हा मिस्रची राजधानी होती.
कापलेले हात नक्की कोणाचे?
संशोधकांना ज्या १२ कापलेल्या हातांबद्दल शोध लावला आहे ते सर्व डावे हात होते. बोटांचा आकार आणि लांबीच्या आधारावरुन असे सांगितले गेले की, त्यामध्ये अकरा पुरुष होते. पण बारावा हातासंदर्भात कळले नाही की तो पुरुषाचा आहे की एका महिलेचा.
संशोधकांनी असा दावा केला आहे की, इतिहासात महिलांना सुद्धा सैन्यात विविध प्रकारच्या भुमिका दिल्या गेल्या होत्या. महिला सुद्धा युद्धात सहभागी व्हायच्या. मिळालेल्या अवशेषांचे विश्लेषण केल्यास असे कळते की, हे सर्व हात वयस्कर पुरुषांचे होते. खरंतर २१-६० वर्षातील वयोगटातील. मात्र हे स्पष्ट झालेले नाही की, हे हात मृत व्यक्तींचे होते की, जीवंत व्यक्तींचे.
दरम्यान, संशोधकांनी असे सुद्धा म्हटले आहे की, असे वाटते ज्या व्यक्तिचा मृत्यू झाला असेल अथवा त्याची हत्या केली असेल. तेव्हा २४ ते ४८ तासांदरम्यान त्याचे हात कापले गेले असावे.. त्यानंतर ते घड्ड्यात ठेवून एकत्रित जमा केले असावेत. त्यानंतर ते प्रदर्शनासाठी ठेवले असावेत. हे सर्वकाही शासक हिक्सोसच्या आदेशानुसार झाले होते.
संशोधकांचे असे मानणे आहे की, ट्राफियोच्या रुपात कापलेले हातांचे प्रदेशन येथे येणाऱ्या लोकांना घाबरवण्यासाठी सुद्धा केला असावा. याला पाहुण्यासाठी दरबारचा शाही तमाशा सुद्धा बोलू शकतो. कापलेल्या हातांचे अवशेष हे वीरता आणि भयावहताची कथा सांगतात.
पुरातत्ववाद्यांच्या मते, प्राचीन मिस्रच्या लोकांचे आयुष्य, सवयी आणि इतिहासासंदर्भातील बहुतांश माहिती ही त्यांच्या धार्मिक स्थळ आणि मकबराच्या भितींवर काढण्यात दिली गेली आहे. हे तेथील परंपरेचा एक हिस्सा आहे.(Ancient Egypt Mystery)
हे देखील वाचा- इज्राइल-पॅलेस्टिन मधील १०० वर्ष जुना वाद नक्की काय आहे?
खरंतर प्राचीन मिस्रच्या प्रतीकात्मक आणि साहित्य स्रोत एक विजयी सैन्य नेत्याच्या रुपात दर्शवते. याचा उद्देश दुश्मनांचा कापलेला डावा हात हा सैनिकांना सन्मान म्हणून दिला जात असावा. मिस्रमध्ये वीर सैनिकांना ईनाम म्हणून असे केले जायचे. तो त्यांच्यासाठी एक ट्रॉफी समान असायचा.