आजच्या काळातील व्यक्ती की हजार वर्षांपूर्वीच्या काळातील व्यक्ती या दोघांमध्ये क्रुरतेसंबंधित तुलना केल्यास लोक असे सुद्धा म्हणतील सध्याच्या व्यक्ती अधिक क्रूर झाला आहे. तो व्हायरस, बॉम्ब, हत्यारे यांच्या माध्यमातून एखाद्याचा जीव घेतो. पण या सर्व गोष्टींव्यतिरिक्त प्राचीन काळातील लोक ऐवढी क्रूर होती की, एखाद्याला जरी मृत्यूची शिक्षा द्यायची झाल्यास तर ते ऐकूनच थरकाप उडायचा. अशाच काही प्राचीन काळातील शिक्षांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.(Anciant World)
तर ५६० ईसा पूर्व ग्रीस मधील शहर एक्रागास जे आज सिसिली नावाने ओळखले जाते. येथे एक अत्यंत विचित्र आणि भयंकर वृत्तीचा राजा होता. त्याचे नाव फेलॅरिस (Phalaris) होते. त्याच्या शाही शिल्पकार पेरिलॉस याने एक बैल बनवला होता तो पितळेचा होता. दिसताना तो बैल अत्यंक आकर्षक दिसायचा पण तो आतमधून पोकळ होता. यामध्ये काही प्रकारचे पाईप ही जोडले गेले होते. जे नाक आणि तोंडातून बाहेर यायचे. हा बैल एखाद्याला खुप यातना देण्यासाठी खरंतर बनवण्यात आला होता. व्यक्तीला त्या बैलाच्या आतमधील भागात टाकून खालच्या बाजूने आग लावली जायची. हळूहळू पितळ जसे गरम व्हायचे तसा आतील व्यक्ती भाजला जायचा आणि त्याचा तेथेच मृत्यू व्हायचा.
तसेच प्राचीन इज्राइल मध्ये व्यभिचाराची शिक्षा अत्यंत खतरनाक होती. येथे लोकांना उकळत्या धातुच्या रसात टाकून ठार केले जायचे. यामध्ये फक्त फरक ऐवढाच होता की, धातूचा रस हा त्याच्या शरिरावर नव्हे तर थेट तोंडात टाकला जायचा. त्यावेळी वितळलेली शिसं टाकले जायचे. त्यामुळे त्याचा क्षणातच मृत्यू व्हायचा.

प्राचीन रोममध्ये तर पोएना क्यूली म्हणजेच गोणीत भरुन मृत्यू देण्याची शिक्षा होती. अशा प्रकारच्या शिक्षेत गुन्हेगारांना आधी खुप मारहाण केली जायची आणि नंतर तो अर्धमेला व्हायचा तेव्हा त्याला एका गोणीत भरुन तो शिवले जायचे. त्यानंतर ती गोणी नदीत किंवा समुद्रात फेकली जायची. त्या गोणीत तो एकटाच नसायचा तर त्यामध्ये साप, माकडं, कुत्रे किंवा दुसरे कोणते कीडे सुद्धा टाकले जायचे.
त्याचसोबत फ्लेइंग (Flaying) नावाची शिक्षा अगदी वेदनादायी होती. ती प्राचीन रोम, मध्यकाळातील इंग्लंड आणि प्राचीन तुर्क साम्राज्यात होती. या शिक्षेमध्ये जीवंत व्यक्तीचे पाय, हिप आणि धड कापले जायचे. त्यानंतर त्याची त्वचा काढली जायची. अशा प्रकारे संपूर्ण शरिरावरील त्वचा काढली जायची. अशा विचित्र शिक्षेमुळे व्यक्ती तडफडून मरायचा.(Anciant World)
हे देखील वाचा- सीरियामध्ये आढळले १६०० वर्ष जुने मंदिर, मिळाली रोमन देवी-देवतांची चित्र
वेस्ट चॉप (Waist Chop) म्हणजेच कंबरेखालील व्यक्तीच्या शरिराचे दोन तुकडे करणे. ही शिक्षा चीन मध्ये अधिक दीर्घकाळ प्रचलित होती. २८० पासून २०८ बीसी पर्यंत ली सी नावाचा एक लेखक आणि राजकीय नेता चीन मध्ये खुप प्रसिद्ध होता. परंतु तो त्यावेळचा राजा ज्हाओ गाओच्या विरोधात होता. यामुळे त्याला अशा प्रकारची मृत्यूची शिक्षा दिली. हिस्ट्री चॅनलच्या वेबसाइटनुसार, सर्वात प्रथम ली सी याचे नाक कापले, त्यानंतर पाय आणि नंतर हात व अखेरीस त्याचे प्रायव्हेट पार्ट कापून वेगळे केले गेले. असे सर्व केल्यानंतर ही त्याच्या कंबरेखालील शरिराला दोन भागात कापले आणि त्याला तडफडून मृत्यूची शिक्षा दिली. रिपोर्ट्सनुसार ही शिक्षा १८ व्या शतकापर्यंत कायम होती.