सध्याच्या काळात आपल्या ब्युटी इंडस्ट्री मध्ये फार बदल झाले आहेत. अशातच सौंदर्य खुलवण्यासाठी विविध प्रोडक्ट्स हे बाजारात सहज उपलब्ध होत आहेत. मात्र जुन्या काळात जे ब्युटी ट्रेंन्ड होते त्यापेक्षा आपण फार काळ अधिक पुढे गेलो आहोत. जेव्हा जुन्या काळात ब्युटी ट्रेंन्ड्स बद्दल बोलले जाते तेव्हा मिस्र आणि ग्रीसचे नाव घेतले जाते. मिस्र आणि ग्रीसचे ब्युटी प्रोडक्ट्स हे पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने बनवले जायचे. आज सुद्धा त्यापैकी काही गोष्टींचा वापर मॉडर्न ब्युटी ट्रेंन्ड्स मध्ये केला जातो.(Ancient Beauty Trends)
-मुग्यांपासून तयार केली जायची लिपस्टिक
प्राचीन मिस्र मध्ये महिला लाल लिपस्टिक तयार करण्यासाठी बीटल्स आणि मुग्यांचा वापर करायच्या. या व्यतिरिक्त प्राचीन मिस्रचे लोक आपल्या ब्युटी प्रोडक्ट्समध्ये नील घाटातील समृध्द वनस्पतींचे वापर करायचे. यामध्ये सर्वाधिक ऑलिव ऑइचा वापर केला जायचा. ज्याचा वापर येथील लोक त्वचा आणि केसांना मऊपणा आणण्यासाठी करायचे. हे तेल परफ्यूम बनवण्यासाठी सुद्धा वापरले जायचे.
-चारकोलचा वापर
प्राचीन काळात मेहंदीचा सुद्धा वापर केला जायचा. याचा वापर केस आणि नखांना रंग लावण्यासाठी केला जायचा. मेहमदी एक नैसर्गिक डाय असून जी मेहंदीच्या झाडाच्या पानांपासून तयार केली जाते. आज ही त्याचा वापर हेअर हाय आणि टॅटूच्या रुपात केला जातो. प्राचीन मिस्रचे लोक चारकोलचा सुद्धा वापर करायचे. त्याचा वापर आयलाइनर बनवण्यासाठी केला जायचा. या आयलाइनरला महिला आणि पुरुष दोघेही लावायचे.(Ancient Beauty Trends)
-मधाचा वापर
ग्रीस मधील लोक सुद्धा ऑलिव ऑयलचा वापर त्वचा आणि केलांना मऊपणा आणण्यासाठी करायचे. येथील लोक मधाचा सुद्धा वापर करायचे. त्याच्याबद्दल असे मानले जायचे की, यामध्ये अँन्टी बॅक्टेरियल गुण असतात. याचा वापर पिंपल्स आणि त्वचेसंबंधित अन्य समस्या दूर करण्यासाठी केला जायचा. या व्यतिरिक्त गुलाब पाण्याचा वापर ही केला जायचा. ग्रीसच्या लोकांनीच कोरफडीचा वापर करण्यास सुरुवात केली होती. असे मानले जायचे की, कोरफड लावल्याने सनबर्न आणि त्वचेला होणारी जळजळ यापासून दिलासा मिळायचा.
हे देखील वाचा- ‘या’ कारणांमुळे गरोदरपणात हाता-पायाला येते सूज; जाणून घ्या सूज कमी करण्याचे घरगुती उपाय
-त्वचेला उजळ करण्यासाठी केसरचा वापर
केसरमध्ये विटामीन ए, बी , सी असते. त्वचेला उजळवण्यासाठी जुन्या काळात ही केसरचा वापर केला जायचा. त्यावेळी केसर दूधात मिक्स करुन चेहऱ्याला लावले जायचे.