गणपती बाप्पा येऊन आठ दिवस झाले आता बाप्पांच्या निरोपाची वेळ जवळ आली आहे. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला गणपती बाप्पा दहा दिवसांसाठी आपल्याकडे पाहुणचार घ्यायला येतात आणि दहा दिवस मुक्काम करतात. या दहा दिवसात बाप्पा सगळेच चांगले करून सुख देऊन जातात. जाताना आपले सर्व दुःख, संकटं सोबत नेतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन जातात. बाप्पा आपल्याकडे जेवढे दिवस राहतात तेवढ्या दिवसांच्या आठवणी प्रत्येक व्यक्ती आपल्यासोबत ठेवते आणि वर्षभर बाप्पाची वाट बघते. (Marathi News)
गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पांची स्थापना झाल्यानंतर दहा दिवसांनी अनंत चतुर्दशीला मोठ्या जल्लोषात त्यांना निरोप दिला जातो. आता काही लोकांकडे दीड, पाच, सात दिवसांनी देखील बाप्पाला विसर्जित केले जाते. मात्र त्यानंतर दहा दिवसांनी बाप्पा सगळ्यांचाच निरोप घेतो. १० दिवसांच्या गणरायाला शनिवार म्हणजेच ६ सप्टेंबरला विसर्जित केले जाणार आहे. अनंत चतुर्दशी ६ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजून १४ मिनिटांनी सुरू होईल. ७ सप्टेंबरला मध्यरात्री १ वाजून ४१ मिनिटांनी ही तिथी संपेल. (Todays Marathi Headline)
अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनाचा मुहूर्त
सकाळची शुभ वेळ : सकाळी ७ वाजून ३६ मिनिटे ते ९ वाजून १० मिनिटांपर्यंत.
दुपारची लाभ वेळ : दुपारी १ वाजून ५४ मिनिटे ते ३ वाजून २८ मिनिटांपर्यंत.
दुपारची अमृत वेळ : दुपारी ३ वाजून २९ मिनिटे ते ५ वाजून ३ मिनिटांपर्यंत.
संध्याकाळची लाभ वेळ : संध्याकाळी ६ वाजून ३७ मिनिटे ते ८ वाजून ३ मिनिटांपर्यंत.
अनंत चतुर्दशीला गणेशाला का विसर्जित करतात?
अनंत चतुर्दशीला गणपतीला विसर्जित करण्यामागे देखील एक कारण सांगितले जाते. हे कारण थेट महाभारताशी जोडलेले आहे. असे सांगितले जाते की, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात गणेश चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला. शिवाय याच दिवसापासूनच महाभारत लिहिण्याचे काम सुरू झाले होते असा पौरणिक कथांमध्ये उल्लेख आहे. महर्षी व्यास यांनी महाभारत सांगितले तर गणेशाने ते लिहिले आहे. महाभारताचे लेखन सुरू होण्याआधी महर्षी व्यास यांनी गणरायाला हे लिपीबध्द करण्याची विनंती केली होती. गणेशाने सांगितले की, त्यांनी लिहायला सुरूवात केली तर ते थांबणार नाहीत थेट महाभारत लिहून झाले की मगच ते थांबतील. ते मधेच जर ते थांबले तर ते पुन्हा लिहिणार नाही. (Latest Marathi News)
त्यावेळी महर्षी व्यास म्हणाले की, देवा तुम्ही विद्वान आहात आणि मी सामान्य ऋषी , जर माझ्याकडून एखादा श्लोक चुकला तर तुम्ही तो कृपया दुरूस्त करून घ्या. गणेशाने व्यासांची विनंती मान्य केली. त्यानंतर महाभारताचे लेखन सुरू झाले आणि सलग १० दिवस ते चालले. अनंत चतुर्दशीला जेव्हा महाभारत लेखनाचे काम पूर्ण झाले, तेव्हा गणरायांचे शरीर जड झाले होते. दहा दिवस हालचाल न झाल्यामुळे त्यांच्या शरीरावर धूळ, माती जमा झालेली होती. तेव्हा गणरायांनी सरस्वती नदीत जाऊन स्नान केले होते. म्हणून गणेशाची स्थापना १० दिवस होते व मग विसर्जन केले जाते. (Top Trending News)
=========
Ashtavinayak : अष्टविनायकातील सहावा गणपती – लेण्याद्रीचा गिरिजात्मक
Ashtavinayak : अष्टविनायकातील सातवा गणपती – महडचा वरदविनायक
=========
बाप्पांचे विसर्जन करताना सर्वच भक्तगण ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करतात. बाप्पा देखील आपल्या भक्तांना लवकर येण्याचे वचन देत त्यांचा निरोप घेतो. पुढच्या वर्षी अर्थात २०२६ साली ज्येष्ठ अधिकमास येत असल्याने गणपती बाप्पांचे आगमन यंदाच्या तुलनेत १८ दिवस उशिरा होणार आहे. पुढच्या वर्षी गणपती बाप्पाचे आगमन सोमवारी,१४ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics