Anant Ambani- Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्यासाठीच्या फंक्शनला सुरुवात झाली आहे. अंबानी परिवाराने आपल्या निवासस्थानी म्हणजेच अँटेलियात वेडिंग सेरेमनीची सुरुवात मामेरु परंपरेने केली आहे. ही सेरेमनी शाही थाटात पार पडली. याचे काही फोटोही सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. मामेरु सोहळ्यासाठी अँटेलियाला भव्यदिव्य सजावट करण्यात आली होती. पाहुण्यांचे स्वागतही मोठ्या दिमाखात करण्यात आले. संपूर्ण अंबानी परिवार गुलाबी रंगातील आउटफिट्सने नटला होता. अशातच मामेरु परंपरा नक्की काय आहे हे सर्वांना आता जाणून घ्यायचे आहे. याबद्दलच सविस्तर वाचा….
मामेरु परंपरा नक्की काय आहे?
मामेरु-मोसालु गुजराती वेडिंग ट्रेडिशन आहे. लग्नाआधी ही प्रथा पार पाडणे आवश्यक असते. यावेळी नववधू आणि नववर दोघांच्या घरी मामेरु सेरेमनी पार पडली जाते. यामध्ये नववधूचे मामा तिला मिठाई आणि गिफ्ट देतात. नववधूला साडी, दागिने आणि काही भेटवस्तूही दिल्या जातात. कपला खूप आशीर्वादही दिले जातात. नववराची आईकडून भेटवस्तू आणि प्रसादासह कपलला आशीर्वाद देतात. ही परंपरा अत्यंत सुंदर आणि सन्मानाचा भाव दर्शवते. (Anant Ambani- Radhika Merchant Wedding)
12 जुलैला भव्य लग्नसोहळा
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा विवाहसोहळा 12 जुलैला मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये होणार आहे. लग्नानंतर 13 जुलैला आशीर्वाद कार्यक्रम आणि 14 जुलैला रिसेप्शन कार्यक्रम होणार आहे. यासाठी जगभरातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. अनंत आणि राधिकाच्या विवाहसोहळ्याच्या परंपरा सुरु होण्याआधी अंबानी परिवाराने 50 गरीब कन्यांचा सामूहिक विवाह लावून दिला होता.