जगभरात भारतीय नागरिकांचा दबदबा आहे. आज अनेक क्षेत्रात भारतीय नागरिकांनी त्यांच्या हुशारीनं आपलं भक्कम स्थान निर्माण केले आहे. यासर्वांत भारतीयांची मेहनतही महत्त्वाची आहे. मात्र हे सर्व करताना भारतीय हिशोबातही चोख असतात. आपल्या मेहनतीचे फळ मिळवण्यासाठी भारतीय कोणामध्येही फरक करत नाहीत. मग तो राजा असला तरी त्यांना फरक पडत नाही. अशीच गोष्ट दक्षिण अफ्रिकेतील एका राजाबाबत घडली आहे. दक्षिण अफ्रिकेतील एका प्रांताच्या राजानं दिलेली सिंहासनाची ऑर्डर एका मोठ्या फर्निचरच्या दुकानदारानं नाकारली आहे. ही ऑर्डर पुरी करण्याआधी यापूर्वीच्या वस्तुंचे पैसे परत करा, असा उलटा आदेशच या भारतीय व्यापा-यानं राजाला दिला आहे. ही गोष्ट आहे, झुलू या दक्षिण अफ्रिकेतील प्रांताची आणि त्याला पैसे परत करण्याची ऑर्डर देणारे भारतीय व्यापारी आहेत राजीव सिंग.
दक्षिण आफ्रिकेतील एका भारतीय वंशाच्या मोठ्या फर्निचर निर्मात्यांनी दक्षिण अफ्रिकेतील झुलू या प्रांताच्या राजाला त्याच्या आधीच्या बाकी राहिलेल्या पैशांची आठवण करुन दिली आहे. झुलू या प्रांतात 48 वर्षीय मिसुझुलु यांचा काही दिवसांपूर्वी राजा म्हणून अभिषेक करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने अधिकृतपणे त्यांना झुलूचा राजा म्हणून मान्यता दिली. राजा झाल्यावर मिसुझुलू यांनी प्रथम राजीव सिंग (Rajeev Singh) यांच्याकडे दोन सिंहासनाची ऑर्डर नोंदवली. एखाद्या राजाची ऑर्डर पूर्ण करुन देणे हे कोणत्याही व्यापा-यासाठी भुषणावह असते. पण राजीव सिंग यांची बातच वेगळी. राजीव हे लाकडावर काम करण्यासाठी जगप्रसिद्ध आहेत. त्यांनी बनवलेल्या फर्निचरला देशविदेशात मोठी मागणी असते. त्यामुळेच त्यांना राजा काय किंवा अन्य साधारण माणूस काय..जो त्यांच्या केलेचे योग्य मुल्य देतो त्यालाच ते त्यांनी तयार केलेल्या वस्तू देतात.

हा झुलू राजा राजीव सिंग (Rajeev Singh) यांना 453,710 रुपये देणे बाकी आहे. एवढ्या किंमतीचे फर्निचर काही वर्षापूर्वी झुलू राजाच्या वडीलांनी तयार करुन घेतले होते. मात्र त्याचे पैसे त्यांनी राजीव सिंग यांना दिले नाहीत. आता राजाच्या वडिलांचे निधन झाले आहेत. तेव्हा वडिलांचे कर्ज त्यांच्या मुलांनी पूर्ण करावे असे निवेदनच राजीव सिंग यांनी झुलू राजाकडे पाठवले आहे. दिवंगत राजा झ्वेलिथिनी याने राजीव सिंग यांच्याकडून त्याच्या सात बायकांसाठी प्रत्येक एक सिंहासन, 10 टेबल्स तीन चहाचे ट्रे असे सामान बनवून घेतले. मात्र त्याचे पैसे त्यांनी दिले नाही. राजिव सिंग (Rajeev Singh) यांनी झुलू राजाच्या प्रशासनाकडे 2017 पर्यंत या पैशांसाठी पाठपुरावा केला. पण राजाच्या कार्यालयकडून दुर्लक्ष करण्यात आले. हे सर्व फर्निचर महागड्या अशा तांबोटी लाकडापासून करण्यात आले होते. तांबोटी लाकूड सुगंधित असते. तसेच ते अनेक वर्ष टिकतेही. पण या सर्वांबरोबर या लाकडाची किंमतही तेवढीच अधिक असते. आता या राजाचा मुलगा झुलूचा राजा झाला. त्यांनीही आपल्या वडीलांसारखीच सिंहासनाची ऑर्डर राजीव सिंग यांच्याकडे दिली. सोबत 1200 वर्षापूर्वीचे तांबुतीचे लाकूड वापरायचा आदेशही त्यांना दिला गेला. झुलूचा नवीन राजा मिसिझुलू याने दोन सिंहासनांची ऑर्डर नोंदवली. मात्र या नवीन राजाला राजीव सिंग यांनी जुने बील पाठवून आपले यापूर्वीच्या कामाचे पैसे आधी जमा करावेत मगच नवीन सिंहासन मिळेल असे स्पष्ट पत्र पाठवले. राजीव सिंग हे जगप्रसिद्ध फर्निचर निर्माता कुबेर देव सिंग यांचे चिरंजीव आहेत. कुबेर सिंह यांचे कोरीव काम जगभर प्रसिद्ध आहे. तुंबती लाकडावर सुंदर नक्षीकाम केलेले फर्निचर बनवण्यात त्यांची महारात आहे. राजीव यांच्या वडिलांनी बनवलेले फर्निचर जगभरातील अनेक राष्ट्रप्रमुखांना भेट म्हणून देण्यात आले आहे. 80 च्या दशकात, कुबेर सिंग यांनी तांबोटी लाकडात केलेला ज्वेलरी बॉक्स
दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय यांना देण्यात आला होता. तसेच त्यांना प्रिन्स चार्ल्स आणि डायना स्पेन्सर यांच्या लग्नाचे आमंत्रणही मिळाले होते. त्यावेळी त्यांनी डायनाला एक ज्वेलरी बॉक्स भेट दिला होता. दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला आणि थाबो म्बेकी, अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन आणि जॉर्ज बुश यांना कुबेर सिंग यांनी बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या आहेत.
==========
हे देखील वाचा : साउथ कोरियात हॅलोविन पार्टीत मृत्यू तांडव, गर्दीमुळे शंभराहून अधिक बळी
==========
दरम्यान झुलूच्या नवीन राजानंही राजीव सिंग (Rajeev Singh) यांच्या पैशाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. या राजाचा शपथविधी 30 ऑक्टोबर रोजी, दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहरामध्ये झाला. यावेळी हजारो नागरिक सहभागी झाले होते. 48 वर्षीय मिसिझुलु, दक्षिण आफ्रिकेतील सर्वात श्रीमंत आणि सर्वात प्रभावशाली पारंपारिक राजघराण्यांपैकी एक असे राजे झाले आहेत. त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला हजारो नागरिक उपस्थित होते. या सोहळ्यात सहभागी झालेल्या नागरिकांनी राजासारखाच पोषाख केला होता. प्राण्यांचे कातडे, भाले आणि ढाल घेऊनच हे नागरिक हजर झाले आहेत. राजानं राज्यभिषेक करण्यापूर्वी प्रथेनुसार एका सिंहाचीही शिकार केली होती. झुलू ही दक्षिण आफ्रिकेतील एक जमात आहे. त्यांची स्वतःची बोली भाषा आहे. या कुळाशी संबंधित लोकांचा पूर्वजांच्या आत्म्यावर विश्वास आहे. या कुळातील लोक ‘उबुंटू’ म्हणजेच माणुसकीवर विश्वास ठेवतात. त्यांचा असा विश्वास आहे की पृथ्वीवरील इतर प्रजातींमध्ये मानव सर्वोत्तम आहे. दक्षिण अफ्रिकेतील इतर अनेक जमाती नेहमीच त्यांचा पारंपारिक पोशाख परिधान करतात, परंतु झुलू लोक ते फक्त विशिष्ट प्रसंगी घालतात.
सई बने…