Home » अंतराळात जाण्यासाठी चक्क लिफ्ट ?

अंतराळात जाण्यासाठी चक्क लिफ्ट ?

by Team Gajawaja
0 comment
Space Elevator
Share

दूर आकाशात दिसणा-या चंद्रावर किंवा लाल ग्रह अर्थात मंगळावर जायला कोणाला आवडणार नाही.  पण चंद्रावर, मंगळावर जाणे हे स्वप्नवतच आहे. कारण हा प्रवास सहजसाध्य नाही. त्यासाठी करोडो, अब्जो रुपयांची तयारी ठेवावी लागते. शिवाय या प्रवासात सुरक्षिततेचीही हामी घेता येत नाही.(Space Elevator)

मात्र मंडळी, २०५० पर्यंत धीर ठेवा. २०५० मध्ये जपानची एक कंपनी चक्क अंतराळात लिफ्ट लावणार आहे.  या लिफ्टच्या माध्यमातून चंद्र आणि मंगळावर सुलभरित्या प्रवास करता येणार आहे. पृथ्वीवरून थेट अंतराळात ही लिफ्ट बसवली जाणार आहे. 

यामुळे काही मिनिटांत चंद्रावर पोहचता येणार आहे.  तर मंगळावरही जाण्यासाठी काही महिने न लागता, एक महिन्यांचा कालावधी लागणार आहे. जपानी कंपनी ही अतीभव्य लिफ्ट प्रत्यक्षात साकारणार आहे.  ओबायाशी कॉर्पोरेशन असे या कंपनीचे नाव असून या कंपनीतर्फे या महत्त्वकांक्षी प्रोजक्टसाठी संशोधन सुरु आहे.   पुढच्या वर्षात या स्पेस लिफ्ट प्रोजेक्टवर काम सुरु होणार आहे.  (Space Elevator)

जपानची ओबायाशी कॉर्पोरेशन ही कंपनी बांधकाम व्यवसायातील प्रमुख नाव आहे.  या कंपनीने पहिल्यांदा २०१२ मध्ये स्पेस लिफ्टसाठी योजना जाहीर केली. या महत्त्वकांक्षी प्रकल्पामागील मूळ कल्पना अगदी सोपी आहे. पृथ्वीला अंतराळाशी जोडणारी एक लांब केबल टाकण्यात येणार आहे.  ही केवळ अगदी कमी खर्चात अंतराळात नेऊ शकते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे चंद्रावर जाण्याचा वेळ वाचू शकतो. तसेच  मंगळावर पोहोचण्यासाठी सहा ते आठ महिन्यांऐवजी ही स्पेस लिफ्ट केवळ तीन ते चार महिने लागतील, असेही या कंपनीच्या संशोधकांनी स्पष्ट केले आहे.  

ओबायाशी कॉर्पोरेशनने अनेक महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट केले आहेत. टोकियो स्कायट्री हा जगातील सर्वात उंच टॉवर बांधण्याचा विक्रमही याच कंपनीच्या नावावर आहे. कंपनीने २०१२ मध्ये स्पेस लिफ्ट तयार करण्याची घोषणा करुन त्यासाठी  $१०० बिलियन तरतूदही ही केली. या प्रकल्पाचे बांधकाम २०२५ पासून सुरू करण्यात येईल. (Space Elevator)

तब्बल २५ वर्ष हे बांधकाम होईल. २०५० पासून स्पेस लिफ्ट कार्यरत होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  यासाठी मोठी गुंतवणूक लागणार आहे. त्यासाठी कंपनीने सगळे मार्ग खुले ठेवले आहेत.  काही देशांकडूनही गुंतवणूक स्विकारण्यात येणार आहे. जसजसे या स्पेस लिफ्टचे काम सुरु होईल, आणि ते पूर्णत्वास येईल, त्यातून या प्रकल्पातील गुंतवणूक वाढेल असाही विश्वास कंपनीनं व्यक्त केला आहे.  

आता अंतराळात मानव वा इतर कुठलिही वस्तू पाठवायची असेल तर रॉकेट हा एकमेव मार्ग आहे.  पण तो अत्यंत खर्चिक आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था, नासाच्या चंद्र मोहीमेसाठी $१६.४ अब्ज खर्च होणार आहे. या खर्चात सर्वात मोठा हिस्सा इंधनाचा आहे. स्पेस लिफ्टच्या उभारणीमुळे रॉकेट किंवा इंधनाची गरज संपुष्टात येणार आहे. स्पेस लिफ्टमुळे अंतराळात वस्तू वाहून नेण्याची किंमत $ ५७ प्रति पौंडपर्यंत कमी होणार आहे. (Space Elevator)

महत्त्वाचे म्हणजे, अंतराळात पाठवण्यात येणा-या रॉकेटच्या उड्डानप्रसंगी स्फोट होण्याची भीती असते.  पण या स्पेस लिफ्टमध्ये तसा धोका नाही. कार्बन नॅनोट्यूबपासून बनवलेल्या ९६००० किमी-लांब केबलने पृथ्वीला अंतराळाशी जोडण्यात येईल.  यातून २०० किमी प्रतितास वेगाने ३० प्रवाशांना घेऊन जाण्याची सोय असेल.  हे अंतराळवीर एका आठवड्यात अंतराळ स्थानकावर पोहोचतील. १९९१ मध्ये एका जपानी अभियंत्याने या संदर्भात अहवाल सादर केला होता. आता त्याच्यावर काम सुरु झाले आहे.  

=============

हे देखील वाचा : मेक्सिकोच्या राष्ट्रपती म्हणून एका महिलेची निवड

=============

अर्थात  स्पेस लिफ्ट तयार करणे हे वाटते तसे सोपे नाही, याची कल्पना कंपनीला आहे.  सध्या वायर किंवा ट्यूब कशापासून बनवायची हा शास्त्रज्ञांसमोर मोठा प्रश्न आहे.  या ट्यूबला खूप जास्त भार सहन करावा लागणार आहे.  हा  ताण सहन करण्यासाठी वायर किंवा ट्यूब स्टीलसारख्या सामान्य सामग्रीपेक्षा जास्त जाड करावी लागणार आहे. या प्रकल्पात व्यस्त असलेलल्या संशोधकांनी आतापर्यंत जास्तीत जास्त फूट लांबीच्या नळ्या बनवता आल्या आहेत. (Space Elevator)

अहवालानुसार, जिओसिंक्रोनस ऑर्बिटपर्यंत पोहोचण्यासाठी स्ट्रिंग किमान २२००० मैल लांब असणार आहे.  जपानमध्ये ही उभारण्यात येणारी स्पेस लिफ्टची कल्पना स्वप्नवत वाटली तरी  १८९५  मध्ये रशियन शास्त्रज्ञ कॉन्स्टँटिन त्सिओलकोव्स्की यांनी ती मांडली होती.  आता ती प्रत्यक्षात साकार झाल्यास मानवी विकासातील तो महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.