दूधाचे दर वाढल्यानंतर पुन्हा एकदा अमूल (Amul) कंपनी चर्चेत आली आहे. सध्या अमूल ही देशातील सर्वाधिक मोठी मिल्क प्रोडक्ट्सची कंपनी आहे. अमूल कंपनीचे दूध ते पनीर, आइस्क्रिम आणि अन्य काही मिल्क प्रोडक्ट तयार करते. परंतु तुम्हाला अमूल कंपनीची सुरुवात कशी झाली याबद्दल माहिती आहे का? खरंच या कंपनीची सुरुवात इंग्रजांच्या काळात झाली होता का? गुजरातमध्ये दूध विक्री करणारे शेतकरी आणि पशुपालन करणाऱ्यांच्या काही समस्यांसंदर्भात विरोध करण्यात आला पण काहीच झाले नाही. पण सरदार पटेल यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला की, त्यांनी स्वत:ची कंपनी उभारण्याच्या दिशेने काम करावे. सरदार पटेल यांच्या या सल्ल्यामुळेच अमूलचा पाया उभारला गेला.
ही गोष्ट आहे भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीची. इंग्रज भारतातून आपला कारभार आटोपण्याच्या तयारीत होते. दुसऱ्या बाजूला गुजरातील कैरा जिल्ह्यातील पशुपालन करणारे दूधाच्या दलालांमुळे त्रस्त होते. दूधाची विक्री करुन सुद्धा त्यांना योग्य त्याच्या मोबदला मिळत नव्हता. हे दलाल भरमसाट कमिशन मिळवत होते. हे दलाल कमी किमतीत दूध विकत घेत आणि त्यांचा मोठा नफा घेऊन दूध विकायचे.
बॉम्बे मिल्क स्कीममुळे पशुपालकांना मोठा फटका बसला
१९४५ मध्ये कैराच्या शेतकऱ्यांना कळू लागले होते की, त्यांना काहीतरी करावे लागणार आहे. शेतकरी त्रस्त होते की, त्यांच्यावेळी बॉम्बेच्या सरकारने बॉम्बे मिल्क स्कीमची सुरुवात केली होती. त्याअंतर्गत गुजरातच्या आनंदला दूध मुंबईत घेऊन जावे लागत होते. त्यावेळी ट्रांन्सपोर्टनुसार जेवढा वेळ लागत होता त्यामुळे दूध खराब व्हायचे. अशातच दूधाला पॉश्चराइज करण्याची बाब समोर आली होती.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बॉम्बे सरकारने पॉलसन लिमिडेट सोबत एक करार केला. या करारानुसार पॉलसन लिमिटेडच दूध पुरवठा करेल. दरम्यान, करारात दूध खरेदी करण्यासंदर्भात काहीच ठरवण्यात आले नव्हते. याचा फटका शेतकरी आणि पशुपालकांना झाला. मिळालेल्या दराने दूध खरेदी करुन तेच मुंबईत पाठवले जात होते.
सरदार पटेल यांनी कॉपरेटिव्ह बनवण्याचा सल्ला
गुजरातचेच असलेले सरदार पटेल यांनी त्या काळात देशातील एक मजबूत नेते होते. त्यांच्या काही आंदोलनांचे नेतृत्व सुद्धा केले होत. कैराच्या शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांच्याकडे मदत मागितली होती. सरदार पटेल यांनी त्या काळात कॉपरेटिव्ह म्हणजेच सहकारी समित्यांना प्रोत्साहन देत होते. अशातच सरदार पटेल यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला की, त्यांनी मिळून एक सहकारी समिती तयार करावी.आणि त्यांनी स्वत:चे पॉश्चराइजेशनचे प्लांट उभारावे. जेणेकरुन थेट बॉम्बे स्कीम मध्ये दूधाचा पुरवठा केला जाईल.
सरदार पटेल यांनी शेतकऱ्यांना असा ही सल्ला दिला की, त्यांनी कॉर्पोरेटिव्हसाठी सरकारची परवानगी मागावी परंतु ती न मिळाल्यास ठेकेदारांना दूध देणे बंद करा. शेतकऱ्यांना सरदार पटेल यांनी असे ही सांगितले की, आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांना आंदोलन आणि उपोषण करावे लागेल. मात्र यामध्ये नुकसान सुद्धा होईल. परंतु दीर्घकाळापासून नुकसान सहन करत असलेले शेतकरी आणखी नुकसान सहन करण्यासाठी तयार होते.
शेतकऱ्यांच्या समोर झुकली ब्रिटिशांची हुकूमत
सरदार पटेल यांनी त्यावेळी आपले साथीदार मोररजी देसाई यांना कैरा येथे पाठवत कॉर्पोरेटिव्ह बनवण्यासाठी मदत करण्या सांगितले. ४ जानेवारी १९४६ मध्ये एक बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत निर्णय झाला की, कैरा जिल्ह्यातील प्रत्येक गावात एक एक समिती तयार केली जाईल. या समित्या एक युनियनला दूधाचा पुरवठा करतील आणि सरकारला दूध खरेदी करण्यासाठी या युनियनसोबत कॉन्ट्रॅक्ट करावा लागेल. दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांना कॉर्पोरेटिव्ह बनवण्यासाठी परवानगी नाकारली. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले. (Amul)
हे उपोषण १५ दिवस सुरु राहिले. या पंधरा दिवसांमध्ये शेतकरी आणि पशुपालकांनी आपले दूध बाहेर पाठवलेच नाही. याचा परिणाम असा झाला की, मुंबई पर्यंत दूधाचा होणारा पुरवठा ठप्प झाला आणि बॉम्बे मिल्क स्किम धोक्यात आली. अखेर इंग्रजांना झुकावे लागले आणि शेतकऱ्यांची मागणी स्विकार करावी लागली. मागणी स्विकारल्यानंतर कैरा जिल्ह्यात कॉर्पोरेटिव्ह दूध उत्पादन संगठनेची निर्मिती झाली. तर १४ डिसेंबर १९४६ मध्ये याची अधिकृतरित्या रजिस्ट्रेशन झाले. १९४८ मध्ये याच संघटनेने बॉम्बे स्कीमसाठी दूधाचा पुरवठा करण्यास सुरुवात केली. तेव्हा दोन गावातील काही शेतकरी प्रतिदिनी जवळजवळ २५० लीटर दूध एकत्रित करत होते. अवघ्या कमी काळातच ४०० हून अधिक शेतकरी जोडले गेले. आता स्थिती अशी झाली होती की, दूध खुप प्रमाणात एकत्रित होत होते पण त्याचा खप मर्यादित होता. आता दूध खराब होण्याचा धोका उद्भवत होता.
हे देखील वाचा- स्वातंत्र्याच्या वेळी देशात किती राज्य होती? कधी आणि कसे झाले नवे प्रदेश
डॉ. वर्गीज कुरियन यांनी पालटले नशीब
येथे एन्ट्री झाली दुग्ध क्रांतिचे हिरो डॉ. वर्गीज कुरियन यांची. त्यांनी शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य कैरा जिल्ह्यातील कॉपरेटिव्हमध्ये लावले. वर्गीज कुरियन यांनीच कैरा जिल्ह्यातील कॉर्पोरेटिव्हचे नाव बदलून ”अमूल” (Amul) असे ठेवले. त्यांनी काही तंत्रज्ञानाच्या पैलूंवर काम केले. कुरियन यांनी फक्त शेतकऱ्यांचीच मदत केली नाही तर दूध मार्केटिंवर सुद्धा काम केले.
वर्ष १९५५ मध्ये कुरियन यांचा एक मित्र एच एम दलाया यांनी म्हशीच्या दूधापासून मिल्क पाउडर आणि कंडेक्ट मिल्क बनवण्यास सुरुवात केली. यापूर्वी ही पाउडर फक्त गाईच्या दूधापासून तयार करण्यात येत होती. आनंदमध्येच अमूलटा आपला पहिला मिल्क पाउडर प्लांट उभारले. पाहता पाहता गुजरात दूधाचे उत्पादन वाढू लागले. वर्ष १९५६ मध्ये अमूल प्रतिदन १ लाख लीटर दूधाची प्रोसेसिंग करु लागला होता. आजतच्या तारखेला गुजरात कॉर्पोरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिडेट देशातील सर्वाधिक मोठा फूड प्रोडक्ट मार्केटिंग संघटना आहे. वर्ष २०२१-२२ मध्ये याचा उद्योग ६.२ बिलियन डॉलर होता.